आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

हरनाम कौर: दाढी आणि मिशा असलेल्या या मुलीने स्वतःला समाजापुढे सिद्ध करून दाखवलंय..


जगात काहीतरी वेगळेपण घेउन जन्माला येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. काहीजण जन्मतः इतरांपेक्षा वेगळे काहीतरी असतात तर काही लोक स्वतःच्या कर्तुत्वाने आपले वेगळेपण सिद्ध करतात. थोडक्यात,जगात असे अनेक लोक आहेत जे इतर लोकांपेक्षा वेगळे असण्याच्या कारणांमुळे जगभरात चर्चेचा विषय बनतात.

आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलीबद्दल सांगणार आहोत जिचे नाव हरनाम कौर आहे. तसेच इतर लोकांपेक्षा वेगळी असल्या कारणाने तिचे नावगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले  गेले आहे.

कोण आहे हरनाम कौर?

ब्रिटन च्या बर्कशायरमध्ये राहणाऱ्या हरनाम कौर नावाच्या मुलीला वयाच्या 16 व्या वर्षी दाढी आणि मिशा यायला सुरुवात झाली. लहानपणापासूनच मॉडेलिंगच्या दुनियेत आवड असलेल्या हरनामला हे कुठे माहीत होते की तिच्या चेहऱ्यावर दाढी आणि मिशा आल्यावर तिला मॉडेलिंगपासून दूर जावे लागणार आहे…

new google

29 नोव्हेंबर 1990 रोजी जन्मलेल्या हरनामला वयाच्या 12 व्या वर्षी पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोमचे (पिसिओएस) निदान झाले. यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये अनेक बदल होतात. ज्यामुळे पुरुषांसारखे केस हरनामच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर येऊ लागले.

आता हा पिसिओएस नेमका के आहे याबद्दल थोड़े जाणुन घेउया.

पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम ही अंडाशयांशी संबंधित समस्या आहे, ज्यामुळे स्त्रियांच्या शरीरात हार्मोन असंतुलनाची स्थिती निर्माण होऊ लागते. अशा स्थितीत स्त्रियांच्या शरीरात स्त्री संप्रेरकांऐवजी पुरुष हार्मोन्स (अँड्रोजन) ची पातळी अधिक वाढू लागते. पीसीओएस मुळे अंडाशयात अनेक गाठी तयार होऊ लागतात. या गाठी लहान थैलीच्या आकाराच्या आणि द्रवाने भरलेले असतात. हळूहळू या गाठी मोठ्या होऊ लागतात आणि नंतर ते स्त्रीबिजांच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात.

हरनाम कौर

ओव्हुलेशन प्रक्रियेच्या अभावामुळे, पीसीओएस ग्रस्त महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता कमी असते. पीसीओएस असलेल्या
महिलांना टाइप -२ मधुमेह होण्याचा धोका देखील वाढतो. सुरुवातीला, मात्र इतर स्त्रीयांप्रमाणेच हरनामने या केसांपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते पण एक दिवस हिमतीने तिने हे रूप आनंदाने स्वीकारले.

यामुळे हरनामला अनेक वेळा प्रतारनेला सामोरे जावे लागले, किंवा अनेकांनी तिला त्रास देण्याचा आणि छलन्याचा प्रयत्न केला. परंतु घाबरण्याऐवजी हरनामने धैर्याने काम केले आणि शीख धर्माच्या मान्यतेनुसार दाढी आणि मिशा न कापण्याचा आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेतला.

तिच्या पुरुषांप्रमाणे पूर्ण दाढी आणि मिशांमुळे, हरनाम अनेक वेळा वर्तमानपत्रांच्या टीआरपीचा विषय बनली होती.ती अनेक वेळा टीव्ही चॅनेलवर देखील दिसली आहे. या सर्वांशिवाय फोटोग्राफी प्रदर्शनात हरनामचे फोटोज प्रदर्शित करण्यात आले आहेत.

डोक्यावर पगडी आणि चेहऱ्यावर दाढी आणि मिशा असलेली ही दबंग मुलगी जेव्हा कोणासमोर येते तेव्हा लोक स्तब्ध होतात. हार न मानता, हरनामने त्याच्या दाढी आणि मिशांसह मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता ती एक उत्तम व्यावसायिक मॉडेल बनली आहे.

मित्रांनो, हरनामचे हे फोटोज पाहिल्यानंतर तुम्ही तिच्या जिद्द आणि हिमतिला सलाम केल्याशिवाय राहणार नाहीत. हरनाम एक मिसाल आहे जिने निसर्गाच्या अन्यायाला न्यायाचे स्वरूप देऊन आपले जीवन यशस्वी केले. तिच्या उत्कटतेमुळे, आज पूर्ण दाढी असलेल्या मुलीच्या नावावर हरनामचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्येही नोंदले गेले आहे.

जगात लोकांना तुमच्या विषयी काय वाटते यापेक्षा तुमची आवड आणि कम्फर्ट कशात आहे हे खुप महत्वाच आहे. तुम्ही जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा, एक दिवस जग नक्कीच तुमचं कौतुक करेल हेच हरनाम च्या वेगळेपणाने सिद्ध केले आहे आणि जगासमोर एक उत्कृष्ट उदहारण ठेवले आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भगवान शंकरांचे हे प्रसिद्ध मंदिर जवळ-जवळ ४०० वर्ष बर्फाखाली गाढलेले होते..!

लोक पास होऊन विक्रम करायचं ठरवतात या महिलेनं मात्र नापास होण्याचा विक्रम रचलाय…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here