आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या हुकुमशहाने घेतला होता १ कोटी नागरिकांचा जीव !


रशियाचा माजी हुकुमशहा जोसेफ स्टालिन हा रशियासाठी एक राष्ट्रीय आयकॉन होता की एक हत्यारा, हा प्रश्न गेली अनेक वर्षे चर्चेत आहे. व्लादिमिर लेनिनच्या नेतृत्वाखाली घडून आलेल्या रशियन राज्यक्रांतीनंतर काही वर्षांच्या काळानंतर रशियात स्टालिनचा उदय झाला.

त्याने आपल्या ताकदीच्या बळावर रशियावर आपली पकड मजबूत केली व हिटलरच्या जर्मनीला दोस्त राष्ट्रांच्या संगतीने धूळ चारण्यात देखील एक महत्वपूर्ण भूमिका बजावली. स्टालिनच्या इतिहासाचे असे अनेक विविधांगी पैलू आज आपल्या समोर उभे असले तरी आज त्याच्याबद्दल जगभरातील लोकांच्या मनात कुतुहल आहे.

स्टालिनचा जन्म १८ डिसेंबर १८७९ मध्ये रशियाच्या तत्कालीन जॉर्जिया प्रांतातील गोरी येथे झाला. स्टालिनचे बालपण हे अत्यंत गरिबीत गेले. स्टालिनची आई ही घरकाम करायची तर वडील चांभारकाम करायचे. वयाच्या सातव्या वर्षी स्टालिनला देवीचा आजार झाला होता आणि याचा परिणाम त्याच्या डाव्या हातावर झाला आणि तो हाट अंशत: निकामी झाला.

त्याला बालपणापासून आसपासच्या विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या त्रासाला तोंड द्यावे लागले. असं असलं तरी तो सदैव स्वतला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत राहिला. जसा तो मोठा होत होता तसा त्याच्या मनात रशियन झारशाहीच्या विरोधातील आक्रोश आकार घेत होता. जॉर्जियाच्या लोकांच्या मनातील स्वातंत्र्याची प्रेरणा त्याच्यात देखील अवतरली होती.

स्टालिनचा आईला त्याने एक धर्मोपदेशक व्हावे अशी इच्छा होती. यासाठी त्याची रवानगी तिने जॉर्जियाच्या राजधानीचे शहर असलेल्या टिफ्लीस येथे केली. परंतु तिथे जाऊन धर्माचराचे तत्वज्ञान वाचायचे सोडून स्टालिन मात्र साम्यवादाने भारावला. तो चोरून चोरून साम्यवादी लेखकांची पुस्तके वाचू लागला. मार्क्स एंगल्स यांच्या साम्यवादाच्या सिद्धांताने तो पुरताच भारावला.

पुढे तो रशियन झारशाहीच्या विरोधात बंड पुकारण्यासाठी सुरु असलेल्या क्रांतिकारी पर्वाचा एक भाग बनला. त्याच्या आईने त्याला धर्मोपदेशक व्हायला पाठवले होते मात्र तो एक कट्टर नास्तिक बनला जो सतत आसपासच्या धर्मोपदेशक आणि पुजारी वर्गासोबत वाद घालू लागला. १८९९ त्त्याच्या अशा गैरवर्तणूकीमुळे आणि सततच्या परीक्षेला गैरहजेरीमुळे त्याची महाविद्यालयातून हकालपट्टी करण्यात आली.

यानंतर स्टालिन एका हवामान खात्यात क्लर्क म्हणून काम करू लागला. इथे काम करत असतांना देखील त्यांनी क्रांतिकारी कारवायांमध्ये आपला सहभाग तसाच ठेवला. जेव्हा त्याच्या या उद्योगांची माहिती झारच्या पोलिसांच्या कानी पडली,तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

हुकुमशहा

याची चाहूल लागल्यामुळे स्टालिन लगेचच भूमिगत झाला. तो पुढे बोल्शेव्हिक पार्टीचा सदस्य बनला आणि त्याने गोरिला पद्धतीने झारच्या सैन्याचा मुकाबला करण्यास सुरुवात केली. १९०५ साली फिनलंडमध्ये तो बोल्शेव्हिक पार्टीचा सर्वेसर्वा असलेल्या व्लादिमिर लेनिनला जाऊन भेटला. लेनिन स्टालिनला भेटल्यानंतर फार प्रभावित झाला. स्टालिनचा करारीबाणा त्याच्या पसंतीस उतरला होता. पुढे स्टालिनने आपल्या काही साथीदारांच्या बळावर जॉर्जियाची राजधानी असलेल्या टीफ्लीस शहरात असलेल्या बँकेवर दरोडा घातला. त्याने तिथून २,५०,००० रुपयांची लुट केली.

१९०६ साली स्टालिनने केटेव्हन स्वनिद्झ नावाच्या एका अल्पसंख्यांक व गरीब घरातील महिलेशी विवाह केला. पुढे तो तिच्यासह अझरबैजानला जाऊन पोहचला. त्याच्या मागावर पोलीस असल्याने त्याला पळ काढावा लागला होता. १९०७ साली टायफोईडने त्याच्या पत्नीचे निधन झाले. यानंतर त्याने स्वतला कसेबसे सावरले व तो स्वतला स्टालिन म्हणजेच लोहपुरूष असे म्हणवून घेऊ लागला.त्याला दरम्यानच्या काळात अटक करण्यात आली आणि त्याची रवानगी रशियन कारागृहात करण्यात आलीई यानंतर त्याला १९१० साली सायबेरियामध्ये अज्ञातस्थळी हलवण्यात आले.

१९१७ पर्यंत स्टालिन हा भूमिगत होता, यानंतर लेनिन रशियात परतला आणि त्याने वंचित शोषितांच्या हक्कांसाठी संपूर्ण क्रांतिचा नारा दिला. या काळात बोल्शेव्हिक विचाराचे प्रावदा नामक वृत्तपत्र चालवून स्टालिनने क्रांतीच्या विचारांचा प्रसार करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले होते.

लेनिनला पुन्हा फिनलंडमधून झारच्या सैन्याची दृष्टी चुकवत रशियात आणण्यात स्टालिनचा मोठा वाटा होता, त्याच्या कार्यकुशलतेच्या बळावर त्याला बोल्शेव्हिक पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये गणले जाऊ लागले. पुढे लेनिनच्या नेतृत्वात रशियन राज्यक्रांति घडून आली आणि बोल्शेव्हीकांचे राज्य रशियावर आले. लेनिन स्टालिनचा एकूण कारभार बघून फारच प्रभावीत झाला. त्याने स्टालिनला कम्युनिस्ट पक्षाचा जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त केले. पुढे त्याने कम्युनिस्ट पक्षावर आपली मजबूत पकड निर्माण केली.

१९२४ मध्ये लेनिनच्या मृत्युनंतर सोव्हिएत संघाचा गाडा कोण हाकणार हा प्रश्न निर्माण झाला. अनेकांना वाटले लेनिनचा मित्र असलेला ट्रोट्स्की हा सोव्हिएत संघाचा सर्वेसर्वा होणार पण स्टालिनने आपल्या ताकदीच्या बळावर कम्युनिस्ट पार्टीची सत्ता हस्तगत केली. ट्रोट्स्की हा जागतिक समाजवादाचा पुरस्कार करत होता तर स्टालिन राष्ट्रीय रशियन समाजवादाचा,या दोघांच्या वादात स्टालिनने बाजी मारली आणि त्याने ट्रोट्स्की व त्याच्या समर्थकांना देशातून हद्दपार केले.

रशियाची संपूर्ण सत्ता हाती आल्यानंतर स्टालिनने आपले संपूर्ण लक्ष रशियाच्या विकासावर आणि औद्योगिकीकरणावर केंद्रित केले, त्याने पंचवार्षिक योजनेची घोषणा केली, त्याच्या या योजनेतून त्याने मोठ्या प्रमाणात कारखानदारीला व शेतीला चालना दिली. पण याचे त्याला अनेक परिणाम देखील भोगावे लागले. त्याची ही योजना पुढे फसत गेली याचा परिणामस्वरूप रशियात कृत्रिम दुष्काळ पडला. अन्नधान्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले. तिथे लोकांना अक्षरशः प्राण्यांना मारून खावे लागले. तब्बल ५० लाख लोक अन्नावाचून मृत्युमुखी पडले. १९३० नंतर काही प्रमाणात परिस्थिती बदलली आणि रशिया स्वयंपूर्ण झाला.

स्टालिनने आपल्या सत्तेचा गैरवापर करण्यात सुरुवात केली आणि १९३४ ते ३९ च्या काळात आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यास सुरुवात केली. त्याने त्याच्या पक्षातील १३९ सदस्यांना आणि ८१ सैन्याधिकाऱ्यांना मारले.त्याचे अनेक विरोधक जे परदेशात वास्तव्यास होते, ते एकाएकी मृत्यूमुखी पडले. त्याच्या विरोधकांना बंदिस्त करून त्याने सायबेरियातील गुलाग या शहरात असलेल्या कॉन्सट्रेशन कॅम्पमध्ये रवाना केले. त्याने अनेक चित्रपट प्रदर्शित केले ज्यातून त्याने त्याचा हिंसाचार वैध ठरवला. त्याने शेकडो विरोधकांच्या कत्तली केल्या, असं म्हणतात की स्टालिनच्या अत्याचाराने तब्बल साडे सात लाख लोकांचा जीव घेतला होता.

१९१९ साली स्टालिनने दुसरा विवाह केला,. नादेझा असे त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव होते. त्याने तिच्यावर प्रचंड अत्याचार केले, त्याचा अत्याचारामुळे तिचा १९३१ साली मृत्यू झाला पण स्टालिन अत्यंत कुशलपणे ही बाब जगासमोर येणार नाही, याची काळजी घेतली. त्याने तिचा नैसर्गिक मृत्यू झाला असेच चित्र निर्माण केले होते. पुढे त्याच्या मुलीमुळे याचा खुलासा झाला होता. स्टालिनचा पहिल्या बायकोपासून असलेला मुलगा दुसऱ्या महायुद्धात मृत्युमुखी पडला होता. त्याला वाचवण्याची संधी असताना देखील स्टालिनने त्याला वाचवले नव्हते.

सुरुवातीच्या काळात स्टालिनची आणि हिटलरची चांगली मैत्री होती. दोघांमध्ये सामंजस्य करार देखील झाला पण पुढे हिटलरने १९४१ मध्ये रशियावर चढाई केली, त्याने पार मास्कोच्या वेशीवर येऊन धडक दिली. स्टालिनचे नाव असलेल्या स्टालिनग्राड शहराला हिटलरने बेचिराख केले. हिटलरच्या कारवाईने भेदरलेल्या स्टालिनने लगेचच प्रखर प्रतिकार केला आणि मोठ्या संख्येने रशियन सैनिकांना जर्मन सैन्याच्या मागावर पाठवले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रनिर्मिती सुरु केली.

१९४३ पर्यंत स्टालिनने युद्ध हिटलरवर पालटले.त्याने आपल्या सैन्याच्या बळावर जर्मनीच्या बर्लिनला धडक दिली, यामुळे संपूर्ण पूर्व युरोपवर त्याचे साम्राज्य निर्माण झाले. सर्व पूर्व युरोपातील देशात साम्यवादी राजवट लागू करण्यात आली. त्याच्या या कामगिरीमुळे सोव्हिएत रशिया एक महासत्ता म्हणून आकारास आला. १९४९ साली स्टालिनने अणु चाचणी केली. यामुळे रशिया हा अमेरीकेच्या ताकदीचा देश बनला.

स्टालिनचा ५ मार्च १९५३ मध्ये अति मद्यपान केल्यामुळे मृत्यू झाला. तो जितका काळ सत्तेत होता तितका वेळ त्याची सर्व प्रशासनावर एक वज्रमुठ होती. त्याचा सर्वत्र एक दरारा होता. त्याच्या मृत्यूने एका युगाचा अंत झाला होता. बलाढ्य रशियाच्या निर्मितीत त्याने महत्वपूर्ण योगदान दिले होते पण त्या बदल्यात तब्बल १ कोटी निष्पाप लोकांचे जीव देखील घेतले होते.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here