आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

रामी रेड्डी: भल्या भल्या हिरोंना धूळ चारणाऱ्या या विलनचा मृत्यू मात्र मनाला चटका देऊन गेला होता..!


बॉलिवूडच्या युगात, चित्रपटांमध्ये एक परिचित चेहरा असायचा, ज्याला दहशतीचे दुसरे नाव म्हटले जात असे. त्याचे नाव रामी रेड्डी होते, तो असा खलनायक होता ज्याने पडद्यावर सगळ्यांना खूप धमकावले, पण त्याच्या शेवटच्या काळात त्याचा चेहरा देखील ओळखणे खूप कठीण झालेले.!

रामी रेड्डी यांचे पूर्ण नाव गंगासामी रामी रेड्डी होते. १ जानेवारी १९५९ रोजी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात जन्मलेल्या रामी रेड्डी यांनी हैदराबादच्या प्रसिद्ध उस्मानिया विद्यापीठात शिक्षण घेतले, आणि पत्रकारितेची पदवी प्राप्त केली. हैदराबादमध्येच ‘एमएफ डेली’ या वृत्तपत्रासाठीही त्यांनी दीर्घकाळ काम देखील केले.

पत्रकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, जिथे त्यांना खूप यशही मिळाले. ८०-९० च्या दशकाचा, हा तो काळ होता जेव्हा खलनायकासाठी खलनायकासारखे दिसणे अत्यंत महत्वाचे होते. या दशकात, खलनायकाच्या पात्राचा बहुतांश सर्व चित्रपटांमध्ये फक्त एकच उपयोग असायचा, ज्यात एक हैवाना सारखा माणूस हिरो आणि हिरोईनच्या मागे सतत कारवाया करत लागलेला असायचा या पात्रासाठी रामी रेड्डी एकदम फिट होते. त्याला मिळालेली पहिली भूमिका, त्याने त्याच चित्रपटात मैलाचा दगड रचलेला!

new google

१९८९ च्या तेलुगू अॅक्शन चित्रपट ‘अंकुशम’ मध्ये त्याला मेन खलनायकाची भूमिका मिळाली, ज्याचे नाव ‘स्पॉट नागा’ असे होते. हाच चित्रपट होता ज्याने तेलुगू सुपरस्टार राज शेखरच्या कारकिर्दीला जबरदस्त चालना दिली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस मध्ये आग लावली होती.

या चित्रपटाच्या यशामागे जितका अभिनेता राज शेखर होता, तितकाच या चित्रपटाचा खलनायक रामी रेड्डी होता. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना भुरळ पाडत होता. त्यांचा भीतीदायक चेहरा आणि अदाकारीमुळे लोक थिएटरकडे आकर्षित झाले. हा चित्रपट इतका यशस्वी झाला की हा चित्रपट नंतर हिंदी, तामिळ आणि कन्नड भाषेत पुनर्निर्मित करण्यात आला.

प्रत्येक रिमेक चित्रपटात अभिनेता बदलला पण खलनायक तसाच राहिला, अभिनयाचा तो एक मोहरा होता, जो रामीने साकारला होता. जेव्हा हा चित्रपट हिंदीमध्ये बनला होता, तेव्हा तेलगू सुपरस्टार चिरंजीवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे नाव ‘प्रतिबंध’ आणि रामी रेड्डीच्या पात्राचे नाव स्पॉट नाना असे होते.

त्यानंतर १९९३ मध्ये ‘वक्त हमारा है’ हा बॉलिवूड चित्रपट आला, ज्यात त्याने सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार सारख्या कलाकारांसोबत काम केले. या चित्रपटात रामी रेड्डी कर्नल चिंकाराच्या भूमिकेत दिसले होते.

रामी रेड्डी

त्यांचा पुढील चित्रपट ‘आंदोलन’ १९९५ साली आला. रामी रेड्डी यांनी या चित्रपटात गोविंदा आणि संजय दत्त सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले. या चित्रपटात दिलीप ताहिल, दीपक शिर्के आणि मोहन जोशी सारखे खलनायकही होते, पण प्रेक्षकांना रामी रेड्डीने साकारलेले एकच पात्र आठवले, ज्याचे नाव बाबा नायक होते.

कामगिरी आणि यशाचा असा काळ चालू असतानाच रामी रेड्डी यांना एका असाध्य रोगाने जखडले… आणि रोग ही असा भयंकर होता की ज्याने त्यांची ओळखच मिटवून टाकली! पहिल्यांदा त्यांना यकृताच्या कर्करोगाचे निदान झाले, म्हणून त्याने घराबाहेर जाणे बंद केले. यकृताचा आजार झाल्यावर मूत्रपिंड निकामी झाले. त्यानंतर त्याची तब्येत खूप वेगाने बिघडू लागली.

जेव्हा रामी रेड्डी त्यांच्या शेवटच्या दिवसात तेलुगू पुरस्कार सोहळ्यात दिसले, तेव्हा प्रत्येकजण त्याला पाहून स्तब्ध झाला आणि कोणी त्यांना ओळखू ही शकले नाही की हा बारीक दिसणारा माणूस एकेकाळी धोकादायक खलनायक रामी रेड्डी होता.

त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये, रामी रेड्डी केवळ हाडांचा सापळा दिसू लागलेले.

शेवटी, खूप त्रास सहन केल्यानंतर, १४ एप्रिल २०११ रोजी हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयात रामी रेड्डी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला तेलुगु चित्रपटसृष्टीतील अनेक लोक उपस्थित होते. ही पहिली आणि शेवटची वेळ होती जेव्हा दक्षिण भारतीय स्वरात आपले संवाद बोलणारा खलनायक बॉलिवूडवर देखील वेगळी छाप सोडून गेलेला.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

नेहमी कुल असणारा कर्णधार धोनी मात्र या घटनेवेळी मैदानावर चांगलाच तापला होता…

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here