आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

नाशिकमधील जिल्हास्तरीय वरुण थेट रणजी करंडकात खेळणारे ‘शेखर गवळी’ एकमेव खेळाड़ू होते..!


नाशिकच काय आज महाराष्ट्रात रणजी क्रिकेटच नाव घेतलं की एक नाव प्रामुख्याने पुढं येतं, ते शेखर गवळी. फ़क्त रणजी
क्रिकेट संघातील खेळाड़ू यापेक्षा फिटनेस ट्रेनर तसेच खेळाडूना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता
ते शेखर गवळी.

तर मित्रांनो, आजचा विषय तर तुम्हाला नक्कीच कळाला असेल. आज रणजी पटु, क्रिकेट प्रशिक्षक शेखर गवळी यांची पहिली जयंती! एखादा माणुस जेव्हा हे जग सोडून जातो तेव्हा असंख्य आठवणी मागे ठेवून जातो.

अगदी साधारण स्थितीतून क्रिकेट खेळायला सुरुवात केली पण कदाचित त्यावेळी त्यांना हे माहीत नव्हत की हा क्रिकेट
प्रवास त्यांना दुरपर्यंत साथ देणार आहे. शेखर गवळी म्हणजे शालेय जीवनात तुमच्या आमच्यासारखी क्रिकेट ची आवड
ठेवणारा एक सामान्य विद्यार्थी. क्रिकेटची आवड आहे प्ररंतु खेळन्यासाठी मोठा संघ नाही आणि आजकाल सगळ्याच
मुलांसमोर असतात तसा डोळ्यासमोर ठेवायला कोणी आदर्शही नाही.

new google

सर्वांच्या आयुष्यात एखादा का होईना टर्निंग पॉइंट येतो आणि गवळी यांच्या आयुष्यात देखील तो आलाच. कारण
महाविद्यालयीन स्तरावरील क्रिकेट त्यांनी बघितले आणि क्रिकेट खेळाविषयी असलेल्या त्यांच्या प्रेमाला इथेच ख़त-पाणी
मिळायला सुरुवात झाली. इथेच खरया अर्थाने क्रिकेट आणि शेखर गवळी एकमेकांना जोडले गेले. शेखर गवळी म्हणजे
एका खेळावर थांबणारे मुळीच नव्हते. एचपिटी कॉलेज मध्ये असताना बुद्धिबळ, टेबल टेनिस, हॉलीबॉल, अशा अनेक
खेळामध्ये ते एक चांगले खेळाड़ू होते.

गवळी हे जलदगती लेफ्ट हैण्ड बॉलर तसेच लेग स्पिनर होते. जिल्हास्तरावर जलदगती गोलंदाज अनेक आहेत आणि त्यामुळे आपल्याला इथे संधी लवकर मिळणार नाही हे वेळीच ओळखून जलदगतीऐवजी लेग स्पिन टाकण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर एक उत्तम लेग स्पिनर म्हणून जिल्हास्तरीय क्रिकेट संघात त्यांची निवड झाली.

आता शेखर गवळी यांना क्रिकेटने खेळाडू म्हणून चांगली ओळखही मिळवून दिली होती. त्यामुळे जसदनवाला,तानपुरे चषक, याठिकाणी चांगली कामगिरी करण्याची संधी गवळी यांनी सोडली नाही.

1995 मध्ये शेखर गवळी यांचा रणजी क्रिकेट मध्ये सामावेश करण्यात आला. त्यावेळी जिल्हास्तरीय वरुण थेट रणजी करंडकात खेळणारा नाशिक मधील एकमेव खेळाड़ू म्हणजे शेखर गवळी होत. आजतागायत त्यांचा हा विक्रम कुठल्याही खेळाड़ूला मोड़ता आला नाही.

अखेरीस १९९७ साली महाराष्ट्राच्या 16 खेलाड़ूमध्ये गवळी यांची निवाद करण्यात आली आणि महाराष्ट्राकडून खेळत पहिल्या गुजरात विरूद्धच्या सामन्यात त्यांनी पदार्पण केले. एका खेळाड़ूसाठी यापेक्षा मोठा आनंद तो काय असू शकेल?
क्रिकेट व्यतिरिक्त नाशिक मधील उत्कृष्ट फिटनेस ट्रेनर मध्ये देखील शेखर गवळी यांचे नाव मोठे होते. केदार जाधव,
ऋषिकेश कानिटकर, मुनाफ पटेल या खेळाडूना आज आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाड़ू म्हणून पाहतो.

पण यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यात आणि शारीरिक फिटनेस मेंटेन करण्यात शेखर गवळी यांचा मोलाचा वाटा आहे. एक खेळाड़ू म्हणून शेखर गवळी जेवढे प्रसिद्ध आहेत त्याहीपेक्षा एक मित्र म्हणून देखील ते आयुष्यात फार श्रीमंत होते. नाशिकच्या या सुपुत्राने महाराष्ट्रासाठी दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.

शेखर गवळी

गवळी हे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते आणि 2020 मधे ते 23 वर्षाखालील महाराष्ट्र रणजी संघाचे फिटनेस प्रशिक्षक देखील होते. महाराष्ट्र रणजी संघाचे फिटनेस ट्रेनर म्हणून त्यांनी 3 वर्ष काम बघितले. रणजी
सामने खेळत असताना पुणे क्लब,विजर क्लब, आरसीएफ, गोव्याचे वास्को इलेव्हन, त्रिपुरा अशा अनेक संघांकडून
खेलन्याची संधी गवळी यांना मिळाली होती. २००१ मध्येच अखेरचा रणजी सामना त्यांनी सौराष्ट्रविरुद्ध खेळला.

खेळात पुढे होते म्हणून शिक्षणात त्यांनी दिरंगाई कधी केली नाही. कारण एम.कॉम नंतर एमपीडी आणि मग एम फिल
असे उच्चशिक्षण घेउनही त्यांना कधी गर्व झाला नाही. अगदी कुणालाही सहज हेवा वाटावा असे साधे जीवन जगत
असंख्य मित्र त्यांनी कमावले.

जो आवडतो सर्वाना, तोचि आवडे देवाला| अगदी याच उक्तीप्रमाणे त्यांनी अचानकच या जगातून घेतलेली एक्सिट
सर्वांच्या मनाला चटका लावून गेली ती कायमचीच. पर्यटनाची आवड असलेले गवळी सप्टेम्बर 2020 मध्ये मंगळवारी मित्रांबरोबर इगतपुरी भागात ट्रेकिंगसाठी गेले असता अर्थातच फोटो घेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.

नेमका याच फोटोने त्यांचा घात केला. सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास मोबाइल मध्ये फोटो घेत असतानाच ओल्या
मातिवरून त्यांचा पाय घसरला आणि तोल सावरता न आल्याने गवळी सरळ २५० फूट खोल दरीत कोसळले.
नाशिक ग्रामीण पोलिसांना तातडीने रिपोर्ट केल्यानंतर इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन गवळी यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन त्यांनी सुरु केले. परंतु दुर्दैवाने त्यानंतर अवघ्या दोनच तासांमध्ये हे सर्च ऑपरेशन अंधार झाल्या कारणाने बंद करावे लागले.

मात्र बुधवारी सकाळी पोलिस आणि काही ट्रेकिंग ग्रुप्स च्या सहाय्याने शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे 250 फुट खोल दरीत गवळी यांचा मृतदेह पोलिसांना मिळाला आणि महाराष्ट्राचा माजी रणजी खेळाडू शेखर गवळी यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे. त्यांच्या जाण्याने क्रिकेट विश्वात एक कधीही न भरून निघणारी पोकळी तयार झाली आहे.

 

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  जाणून घ्या कडू कारले खाण्याचे फायदे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here