आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

आयपीएलमध्ये दिला जाणारा ‘ऑरेंज कॅप पुरस्कार’ खरचं मूर्खपणा आहे का?


जगातील नवख्या आणि जुन्या खेळाडूंना आपली कारकीर्द फुलवून इतिहास घडवण्याची संधी देणारी सर्वांत मोठी लीग कोणती तर आयपीएलचं नाव घेतल जात. आणि अस म्हणने वावग ही ठरणार नाही. आयपीएलने आजपर्यंत अनेक नवीन खेळाडूंना  ओळख  निर्माण करून दिली आहे. कित्येकांच्या करियरला  महत्वाच वळण येथूनच मिळालं आहे. त्याच यावर्षीचे जिवंत उदाहरण म्हणजेच ‘क्रिकेटर चेतन साकारीया’ आयपीएल अगोदर कोणालाही जास्त माहिती नसलेल्या या खेळाडूने एका आयपीएलच्या सामन्यात जगभरात आपली ओळख निर्माण केली.

चेतन असो व आणखी युवा खेळाडू आयपीएलने नेहमीच त्यांना संधी दिली आहे. आयपीएलमध्ये दिल्या जाणारा मानाचा एक पुरस्कार म्हणजे ‘ऑरेंज कॅप’ एका सिजनमध्ये सर्वांत जास्त धावा करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

नेमकं याच पुरस्काराबद्दल कोलकातानाईट रायडर्सचा पूर्व कप्तान आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू दिनेश कार्तिक याने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. दिनेश म्हणाला की, आयपीएलमध्ये दिला जाणारा ऑरेंज कॅप पुरस्कार हा  सर्वात मूर्ख पुरस्कार आहे. त्याच्या या वक्तव्याने आता क्रिकेट क्षेत्रात मोठ खलबत सुरु झालं आहे.

new google

 दिनेश कार्तिकच्या मते, टी 20 क्रिकेटमधील टॉप ऑर्डरपेक्षा फिनिशर आणि इम्पॅक्ट प्लेयर्स जास्त महत्त्वाचे आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप देण्यात येते. संपूर्ण हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार मिळतो. आतापर्यंत अनेक दिग्गज फलंदाजांनी हा पुरस्कार त्यांच्या नावावर केला आहे.

आकाश चोप्राला त्याच्या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान दिनेश कार्तिकने टी -२० क्रिकेटमध्ये फिनिशरचे महत्त्व सांगितले. या फॉरमॅटमधील डेटाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असेही तो म्हणाला.

ऑरेंज कॅप

माझ्या मते, ऑरेंज कॅप हा आयपीएल मधील सर्वात मूर्ख पुरस्कार आहे जो दिला जातो. आयोजक यापेक्षा चांगल्या गोष्टींचा विचार करू शकतात. किरोन पोलार्ड, आंद्रे रसेल ऑरेंज कॅप जिंकणार नाहीत कारण ते रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक किंवा इतर सलामीवीरांइतके धावा करू शकणार नाहीत त्यांना तितकीशी संधी नाही. जरी हे खेळाडू त्यांच्या फलंदाजीने सामन्यावर मोठा प्रभाव पाडतात. त्यांचा संपूर्ण हंगामात सलामीवीरांपेक्षा जास्त प्रभाव असतो. टी -20 मध्ये इम्पॅक्ट खेळाडूला जास्त महत्त्व असते.

कार्तिकन मांडलेला मुद्दा तसं पहायला गेल तर १००% योग्यच वाटतो. कारण  जर फक्त सर्वांत जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देत आलंय तर सहाजिकच गोष्ट आहे अष्टपैलू खेळाडू किंवा मिडल ऑर्डरचे खेळाडू कधीही जास्त

धावा करू शकणार नाहीत. आणि या जागी खेळायला येणारे अनेक खेळाडू हे अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. सर्वच संघामधील सुरवातीच्या दोन ते तीन फलंदाजापैकीच कोणीतरी हा ऑरेंज कॅप पुरस्कार जिंकत असतो. त्यामुळे दिनेश कार्तिक च्या मते हा अवार्ड ज्या निर्कषांवरून देण्यात येतो ते एकदम चुकीचं आहे यामुळे मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना नेहमीच या पुरस्कारापासून लांब रहावे लागले आहे.

दिनेश कार्तिकने टी -20 क्रिकेटमध्ये स्वतःला अनेकवेळा सिद्ध केले आहे. निदाहास करंडकातील त्याची चमकदार खेळी कोण विसरू शकेल. श्रीलंकेत 2018 च्या निदाहास ट्रॉफी फायनलमध्ये त्याने 8 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी 5 धावांची गरज असताना कार्तिकने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला.

कार्तिकने त्याच्या छोट्या डावात 3 षटकार आणि 2 चौकार मारले. दिनेश कार्तिक सध्या इंग्लंडमध्ये आहे जिथे तो भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत कॉमेंट्री करत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

(हेही वाचा..या देशात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाहीये)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here