आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सल्वाडोर अल्वरेंगा 14 महिने समुद्रामध्ये अडकून सुद्धा जिवंत वाचला होता..


समुद्राविषयीच्या अनेक दंतकथा आपन लहानपणापासून ऐकत आलो आहोत. इंग्रजीत ‘द ओल्ड मैन & सी’ नावाची एक कादंबरी आहे ती देखील अनेकांनी वाचली असेल. समुद्रातील मोत्यांच्या कथा देखील आपण वाचल्या आहेत. महाभारतातील घटोत्कचने समुद्राच्या तळाशी असलेला कंचन मोती अर्जुनाला भेट म्हणून दिला हेही आपल्याला माहित आहे. पण सहसा कुण्या एकट्या माणसाने फार दिवस समुद्रात तग धरलेला आपण ऐकला नसेल.

खरं तर, बहुतेक लोकांना स्वतःमध्ये असलेली शक्ती ओळखता येत नाही. अशा शक्ती कधीकधी आलेल्या संकटानंतरच ओळखल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या अंतर्मनातील शक्तीने त्याला तब्बल ४३८ दिवस समुद्रात जिवंत ठेवले.

तर झाले असे की, २१ डिसेंबर २०१२ रोजी, सल्वाडोर नावाचा ३६ वर्षीय मच्छीमार आपल्या एका मित्रासोबत समुद्रात मासेमारी करायला जाण्यासाठी मेक्सिकोच्या किनाऱ्यावर तयारी करत होता. त्या दोघांनी जवळजवळ 70 गॅलन इंधन, 16 गॅलन पिण्याचे पाणी, 15 पौंड स्वतःसाठीचे अन्न, बादल्या, जीपीएस आणि मोबाईल फोन यांसारख्या सर्व गरजेच्या वस्तु सोबत घेतल्या होत्या.

new google

सुरुवातीला संथ गतीने प्रवास सुरू करणारया, या दोघांनाही सागरी मार्गांना येणाऱ्या अडचणीचे चांगले ज्ञान होते. बराच वेळ निघून गेला आणि हवामान खराब होऊ लागले. अशा परिस्थितीत, सल्वाडोरने स्वतःची काळजी घेतली आणि बोट योग्य दिशेने वळवण्याचा प्रयत्न करत राहिला, परंतु तेथे त्याच्या मित्राची स्थिती बिघडली. बोट थरथरल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या.

काही वेळानंतर वादळ थांबले आणि दोघांनी स्वतःला सांभाळले पण या वादळामुळे दोघेही किनाऱ्यापासून खूप दूर गेले होते. बोटीच्या इंजिनने काम करणे बंद केल्याचे जेव्हा दोघांना कळले तेव्हा खरी अड़चन वाढली. दुर्दैवाने त्यांच्या जीपीएसनेही काम करणे बंद केले होते.

अशा परिस्थितीत, सल्वाडोरने रेडिओद्वारे बचावकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, कठोर प्रयत्नांनंतर एका बचावकर्त्याने त्यांना बोट अँकर करण्याचा आणि बोट एकाच ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला, जेणेकरून ते त्यांना शोधू शकतील. परंतु त्यांच्याकडे अँकरही नव्हता, ज्यामुळे नुकत्याच शांत झालेल्या वादळाच्या लाटांनी त्यांची बोट किनाऱ्यापासून आणखी दूर ढकलली.

बोटीमध्ये सारखे पाणी भरत असल्यामुळे, बोटीचे वजन वाढत होते, ज्यामुळे बोट उलटू जाऊ नये, म्हणून त्यांनी पकडलेले 500 किलो मासे समुद्रात परत फेकण्याचा निर्णय घेतला. आता त्या दोघांनी जिवंत राहण्यासाठी सुमारे 14 दिवस जेलीफिश आणि कासवे पकडायला सुरुवात केली.सल्वाडोर

14 दिवसांनंतर झालेल्या पावसामुळे त्यांना पिण्याचे पाणी मिळाले. कसे तरी दोन महिने निघून गेले. अशा परिस्थितीत साल्वाडोरच्या मित्राने खराब कासव खाल्ले आणि त्याची तब्येत अजुनच बिघडली आणि यामुळे त्याने आपला जीव देखील गमावला.

सल्वाडोर आता पूर्णपणे एकटा होता आणि काही दिवसांपर्यंत तर त्याला असे वाटत होते की त्याचा मित्र अजूनही जिवंत आहे. काही दिवसांनी सल्वाडोरला खात्री पटली की त्याचा मित्र आता या जगात नाही, म्हणून सल्वाडोरने त्याचे सर्व कपडे काढले आणि त्याचा मृतदेह समुद्रात सोडला.

सल्वाडोरला दररोज त्याच्या समोरून अनेक मोठी मोठी जहाजे जाताना दिसायची, पण ती सर्व जहाजे त्याच्या आवाक्यापासून खूपच दूर होती. अशा परिस्थितीत सल्वाडोरला आणखी एका वादळाला सामोरे जावे लागले. पण या वादळाने साल्वाडोरला अशा ठिकाणी नेले जिथे त्याचा जीव वाचला. वादळ थांबल्यानंतर सल्वाडोरच्या डोळ्यांसमोर एक बेट होते. सल्वाडोरचे अवयव आणि शरीर, सुमारे ४३८ दिवस समुद्रात घालवल्यानंतर, पूर्णपणे अशक्त झाले होते. अशा स्थितीत न्यूझीलंडजवळील मार्शल बेटावरील लोकांनी सल्वाडोरचे प्राण वाचवले.

इतक्या दिवसांनंतर आपल्या कुटुंबाला भेटणे हे साल्वाडोरसाठी एका स्वप्नासारखे होते आणि सल्वाडोर त्यांच्यासमोर जिवंत उभा आहे यावर त्यांना देखील विश्वास ठेवणे कठीण झाले. जेव्हा साल्वाडोर त्याच्या मित्राच्या कुटुंबाला भेटला, तेव्हा त्याने संपूर्ण गोष्ट त्याच्या मित्राच्या कुटुंबाला सांगितली, पण त्यांनी साल्वाडोरच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि साल्वाडोरने त्याच्या मित्राला मारून त्याचे मांस खाल्ल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर केला.

पण या सगळ्या पलीकडे, सत्य काय आहे हे फक्त सल्वाडोरलाच माहित होते. नंतर साल्वाडोरचा खटला लढणाऱ्या त्याच्या वकिलांनी लोकांना सांगितले की त्याने त्याच्या लाय डिटेक्टर मशीनची चाचणी देखील यशस्वीपणे पार केली आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

बंगालच्या या नवाबाने 146 इंग्रज अधिकाऱ्यांना बंदी बनवले होते,तर बाकी भीतीनेच पळून गेले होते!

ताजमहाल नव्हे तर कवी रहीम यांनी बांधलेले ‘रहीमचा मकबरा’ हे प्रेमाचे पहिले प्रतीक होते..!

राजस्थानच्या या गावात शेतकरी शेती नाही तर अभिनय करतात..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here