आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

टॅटूच्या वाढत्या क्रेझमुळे या तरुणाने चक्क डोळ्यात टॅटू बनवून घेतलाय..!


सद्ध्या जग प्रगतीच्या बाबतीत इतकं पुढे गेलय की क्वचितच एखादी अशी गोष्ट शिल्लक राहिली असेल जिथे मानवाचा हस्तक्षेप नाही. भरिस भर म्हणजे हौस म्हणून वेगवेगळे प्रयोग करत रहाणे हां माणसाच्या आवडीचा विषय .

त्यातच कधी कशाचा ट्रेंड येईल आणि कोण कधी एका रात्रीतून प्रसिद्धीच्या झोतात येईल याचा काही नेम नाही.
आता हेच बघा ना…आजकाल तरुणांमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागावर टॅटू करण्याबाबत सध्या खूप क्रेझ
आहे आणि त्यासाठी टॅटूचे अनेक प्रकार किंवा डिजाईन्स ट्रेंड मध्ये आहेत.

हात, पाय आणि शरीरावर टॅटू काढणे आजकाल एक सामान्य गोष्ट बनली आहे. पण आजवर तुम्ही एखाद्या व्यक्तीने डोळ्यात टॅटू काढल्याचं ऐकले का? किंवा डोळ्यातही टॅटू काढले जाऊ शकतात, हे ऐकायलाही जरासं अविश्वसनीय वाटतं, नाही का? तर मित्रांनो, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगू ज्याच्या डोळ्यात टॅटू
काढण्यात आला आहे आणि अर्थातच असे करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.

new google

दिल्लीचा रहिवासी असलेला करण सिद्धू , अशाप्रकारे डोळ्यात टॅटू करणारा पहिलाच भारतीय आहे. व्यवसायाने टॅटू आर्टिस्ट असलेल्या करणने अलीकडेच त्याच्या नेत्रगोलकांवर म्हणजेच आयबॉल्स वर टॅटू काढला आहे, जो माध्यमां प्रचंड हिट देखील झाला आहे. करणच्या आधी कोणत्याही भारतीयाने असे केले नाही.

टॅटू

डोळ्यात टॅटू करून घेणे म्हणजे काही साधेसुधे काम नाहिये. कारण हा टॅटू बनवण्यासाठी करणला खासन्यूयॉर्कला जावे लागले आणि हा टॅटू त्याच व्यक्तीने बनवला ज्याने नेत्रगोलक टॅटूचा शोध लावला. करणच्या म्हणण्यानुसार त्याला हा टॅटू बनवण्या अगोदर यावर खूप संशोधन करावे लागले होते.

अभ्यासानंतर करणने अगोदर त्याच्या कुटुंबाला आणि मित्रांना याबद्दल माहिती दिली आणि त्यांना खात्री दिली की ते पूर्णपणे सुरक्षित आहे. मग काय, यानंतर करणने टॅटू काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी न्युयोर्कला गेला. या आर्टिकल मधील करणचे फोटो बघून तुमच्या लक्षात येईल की त्याने संपूर्ण शरीरावर अनेक निरनिराळ्या डिजाईन्सचे अनेक टॅटू केलेले आहेत.

म्हणजे याआधी करणने त्याच्या शरीरावर बरेच टॅटू केले आहेत, ते एकूण किती आहेत हे करण स्वतः विसरला आहे. महत्वाचे म्हणजे करणने हा टॅटू बनवण्याच्या काही वेळापूर्वीच, एका कॅनेडियन महिलेने हा असाच डोळ्यातील टॅटू केल्याने तिचे डोळे खराब झाले आणि विशेष म्हणजे तिची दृष्टी गेली. आता या गेलेल्या दृष्टिसोबत तो डोळयांत टॅटू बनवण्यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च देखील गेला.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन बनला 21व्या शतकातील सर्वात महान गोलंदाज!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here