आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
‘बहुत हुआ इंतजार, अब आर या पार’ म्हणत चेतेश्वर पुजाराने वादळी खेळीचे संकेत दिलेत..!
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर दोन्ही संघांच्या नजरा दुसऱ्या कसोटीतील विजयावर असतील. चेतेश्वर पुजारा दुसऱ्या कसोटीत भारतासाठी अँकरची भूमिका बजावू शकतो.
मात्र, चिंताजनक गोष्ट म्हणजे तो गेल्या दोन वर्षांपासून फॉर्मात चालला नाहीये. पण, लॉर्ड्सची लढाई जिंकण्यासाठी पुजाराने खूप मेहनत घेतली आहे. त्याने नेटमध्ये खूप घाम गाळला आहे.
तसेच, इन्स्टाग्रामवर एक चित्र पोस्ट करून त्याने लिहिले आहे – रेडी फॉर गेम म्हणजे मॅचसाठी तयार.
सामन्याच्या पूर्वसंध्येला पुजारा म्हणाला होता की, आता खूप झाले आता आर या पार करायचं आहे. त्यामुळे पुजारा खरच आता काही विशेष रणनीतीसह खेळतांना दिसेल यात शंका नाही. शिवाय नेटमध्येही त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.
चेतेश्वर पुजाराचे शेवटचे कसोटी शतक जानेवारी 2019 मध्ये ठोकले होते. तेव्हापासून त्याने 19 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 27.64 च्या सरासरीने 857 धावा केल्या आहेत आणि या काळात त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त 81 धावा आहे. पुजाराचा सध्याचा इंग्लंड दौरा धावांच्या दृष्टीने चांगला राहिला नाही. पण ज्याप्रकारे त्याने लॉर्ड्सपुढे आपली बॅट तीक्ष्ण केली आहे आणि नेटमध्ये घाम गाळला आहे, तो आता फॉर्ममध्ये परतण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसतयं.

मात्र, लॉर्ड्सवर पुजाराची कामगिरी काही विशेष राहिली नाही. येथे खेळलेल्या 2 कसोटींमध्ये त्याच्या खात्यात फक्त 89 धावा आहेत, ज्यामध्ये 43 धावा त्याच्या सर्वोत्तम आहेत. यामध्ये त्याने 2014 च्या दौऱ्यावर एक कसोटी खेळली आणि दुसरी 2018 च्या दौऱ्यावर. इंग्लंडमधील पुजाराची एकूण कसोटी सरासरी देखील फार चांगली नाही. पुजाराने 11 कसोटीत 26.95 च्या सरासरीने केवळ 595 धावा केल्या आहेत.
आता आजपासून सुरु होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पुजारा कसा खेळ दाखवतो याबद्दल लोकांच्या उत्सुकता वाढल्या आहेत. ज्या पद्धतीने त्याने सराव केलाय त्यावरून तर नक्कीच पुजारा आपला खेळ चांगला करेल अशी क्रिकेटप्रेमींना आशा लागलीय..
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा:
कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!
या दोन देशभक्त बाबांनी इंग्रजांशी लढण्यासाठी लाखो सैनिक तयार केले होते..!