आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?


क्रिकेट संघात केवळ ११ खेळाडूंनाच संघात खेळण्याची संधी मिळते. अश्या परिस्थितीत जो चांगला खेळ दाखवेल त्यालाच अंतिम संघात स्थान दिले जाते. सध्या जरी भारतीय संघात अनेक युवा खेळाडू आपलं वर्चस्व गाजवत असले तरी याआधी अनेक खेळाडूंना संधी न मिळाल्यामुळे आपल्या करियरला पूर्णविराम द्यावा लागला होता.

 धोनी

यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने याच गोष्टीचा खुलासा करत आपली व्यथा मांडली आहे.तो म्हणाला की, महेंद्रसिंग धोनीच्या आगमनाने त्याची कारकीर्द संपली. दिनेश कार्तिकने सांगितले की महेंद्रसिंग धोनी आल्यापासून त्याला माहित होते की त्याला भारतीय संघात परतण्याचे मार्ग कधीच उघडणार नाहीत.

new google

दिनेश कार्तिकने एका यूट्यूब चॅनेलवर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राला याबद्दल सांगितले. दिनेश कार्तिकने सांगितले, ‘भारतीय क्रिकेट संघात महेंद्रसिंग धोनी आल्यानंतर टीम इंडियाचे सर्व दरवाजे माझ्यासाठी बंद झाले.  धोनी आल्कायानंतर कार्तिक संघातून बाहेर पडला तो संघात आपले स्थान कायमचे कधीही करू शकला नाही.

धोनी संघात सामील होण्याआधी दिनेश कार्तिकने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि त्याला टीम इंडियामध्ये स्वतःसाठी स्थान मिळवण्याची संधीही अनेक वेळा मिळाली, पण या संधींचा तो फायदा घेऊ शकला नाही.

महेंद्रसिंग धोनी जेव्हा टीम इंडियाचा एक भाग बनला तेव्हा त्याने त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आपले स्थान पक्के केले होते.

धोनी
दिनेश कार्तिक म्हणाला की, त्याला माहीत आहे की भारतीय संघात यष्टीरक्षक-फलंदाजाचे स्थान आता पुढील 10 ते 12 वर्षांसाठी बंद आहे. कार्तिक पुढे म्हणाला की, बऱ्याच वर्षांनंतर टीम इंडियाला एक उत्तम यष्टीरक्षक मिळाला होता.

कार्तिक संभाषणात म्हणाला, ‘मला स्वतःला सतत प्रश्न पडला होता की पुढे माझे काय होणार? मला एक चांगला फलंदाज होण्याची संधी मिळाली असती तर त्या वेळी भारतीय संघात मधली फळी आणि सलामीचा फलंदाज अशी दोन ठिकाणे होती. धोनीसह काही लोक मला म्हणाले, ‘तू फलंदाज म्हणून खूप प्रतिभावान आहेस. ‘त्यानंतर मला खूप आत्मविश्वास मिळाला.

धोनीने अनेक यष्टिरक्षकांची कारकीर्द संपवली.

भारतामध्ये, जिथे क्रिकेटपटू आपले संपूर्ण आयुष्य उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी घेतात, तिथे धोनी वेगळा होता. त्यांचा भारतीय संघातील प्रवास अवघ्या 5-6 वर्षात पूर्ण झाला. धोनीने 23 डिसेंबर 2004 रोजी बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकताच अनेक यष्टिरक्षकांची कारकीर्द संपली. जेव्हा त्याला कर्णधारपद मिळाले तेव्हा कोणत्याही यष्टीरक्षकाला धोनीची जागा घेण्याची संधी नव्हती.असं कार्तिकने स्पष्ट केलं आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here