आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आपल्या फलंदाजीने सामने जिंकून देणाऱ्या सचिनने त्यादिवशी गोलंदाजीमध्ये कमाल केली होती..


जागतिक क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने आपल्या फलंदाजीने अनेक मोठे विक्रम केलेत. सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनला क्रिकेटच्या मैदानावर स्वत: ला गोलंदाज म्हणून पाहायचे होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि त्याने एक महान फलंदाज बनून मैदान सोडले.

सचिनमधील गोलंदाज त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याच्याशी जोडलेला राहिला आणि अनेक वेळा त्याने आपल्या गोलंदाजीने संघाला विजयाकडे नेले. आजच्या  लेखात आपण सचिनच्या त्या सामन्याची कहाणी पहाणर आहोत ज्यात त्याने फलंदाज म्हणून नाही तर गोलंदाज बनून संघाला विजय मिळवून दिला.

गोलंदाज म्हणून सचिनच्या महत्वाच्या खेळी.

4 विकेट 34 धावा, 1991 शारजाह: शारजाच्या मैदानावर सचिनचे सर्वोत्तम फटके अजूनही प्रेक्षकांना उत्साहित करतात. पण हे मैदान तेच होते जिथे सचिनला पहिल्यांदा त्याच्या गोलंदाजीमुळे सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने वेस्ट इंडिजविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिला बदल म्हणून सचिनला गोलंदाजीसाठी आणले. शानदार गोलंदाजी करताना सचिनने वेस्ट इंडिजसाठी अवघ्या 34 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजचा डाव 145 धावांवर थांबलाआणि भारताने सामना सहज जिंकला.

new google

सचिन
हिरो कप सेमीफायनल, 1993: सचिन जरी या सामन्यात विकेट घेऊ शकला नाही, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या शेवटच्या षटकाला भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. सचिन शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला होता ज्यामध्ये आफ्रिकन संघाला 6 धावा करायच्या होत्या. पण सचिनने घट्ट गोलंदाजी करत संघाला 2 धावांनी विजय मिळवून दिला.

3 गडी 36 धावा, 1994 चेन्नई: सचिनने पुन्हा एकदा 1991 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याच्या चमकदार गोलंदाजीची पुनरावृत्ती केली. ब्रायन लारा आणि कार्ल हूपर यांनी भारतीय गोलंदाजांना चेन्नईच्या मैदानावर विकेटची तळमळ ठेवली. अचानक कर्णधार अझरुद्दीनने चेंडू सचिनला दिला आणि त्याने प्रेक्षकांना निराश केले नाही. लारासोबत त्याने जिमी अॅडम्स आणि शेरविन कॅम्पवेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवून वेस्ट इंडिजचा डाव 221 वर थांबवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताने हा सामना चार गडी राखून जिंकला.

5 विकेट 32 धावा, 1998 कोची: सचिनसाठी या मैदानाला विशेष महत्त्व आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याने या मैदानावर दोन्ही वेळा पाच विकेट्स घेतल्या. पण 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची गोलंदाजी अशी होती की दिग्गज फलंदाजांनी सजलेला संघ पूर्णपणे चक्काचूर झाला. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. एवढेच नाही, यानंतर सचिनने नियमित गोलंदाजाप्रमाणे गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.

3 विकेट 31 धावा 2001 कोलकाता: कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेलेली कसोटी हरभजन सिंगची हॅटटीक आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या ऐतिहासिक 281 धावांची आठवण आहे. भारताच्या या अविश्वसनीय विजयात अनेक महान क्षण होते पण सचिनच्या छोट्या स्पेलने भारताच्या विजयाची कथा लिहिली. सचिनने संघासाठी 3 विकेट्स काढल्या जेव्हा सामना ड्रॉच्या दिशेने जात असल्याचे दिसत होते. तेव्हा सचिनने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन आणि शेन वॉर्नला लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवले होता.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here