आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

बॉलिवूडचे हे सुपरस्टार व सर्वोत्तम मित्र एकाच तारखेला आणि एकाच आजाराने जग सोडून गेले.


जगात योगायोग प्रत्येक दोन दिवसाला घडतो अस म्हटल जात  पण असा योगायोग कदाचितच कधी घडला असावा. १९८० मध्ये कुर्बानी हा चित्रपट चांगलाच गाजला होता त्या चित्रपटातील हे तीन दिग्गज कलाकार फिरोज खान, अमजद खान आणि विनोद खन्ना योगायोगाने एकाच तारखेला हे जग सोडून अनंतात विलीन झाले.

बॉलिवूड

या तीन ताऱ्यांपैकी सर्वात आधी अमजद खानचे निधन झाले, त्यानंतर फिरोज खान व शेवटी विनोद खन्ना. आपल्या दमदार अभियानाच्या जोरावर या तिन्ही हिरोनी कुर्बानी चित्रपटातून लाखो-करोडो लोकांची मने जिंकून आपली छाप सोडली.

new google

शोले चित्रपट तर तुम्ही पहिला असणारच! त्यातील नावाजलेला विलेन गब्बर, ‘इस गब्बर को कौन नाही जाणता साब!’ अस म्हणायला हरकत नाही,आणि कुर्बानी मध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करणारे अमजद खान हे २७ जुलै १९९२ रोजी मुंबई येथे शेवट्चा दिवस जगले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला होता.

 

आपली अप्रतिम शैली, आवाज आणि कामगिरीने लोकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या फिरोज खान यांना कोणी ओळखत नाही अस क्वचितच कोणी सापडले. दीर्घकाळ फुफुसाच्या कॅन्सरला लढा देत फिरोज खान यांनी २७ एप्रिल २००९ ला बंगलोर येथे शेवटचा श्वास घेतला.

बॉलिवूड

तर बॉलीवूडला ‘कुर्बानी’ नंतर ‘पर्वरीश’ आणि ‘दयावान’ असे हिट चित्रपट देणारे विनोद खन्ना २७ एप्रिल २०१७ रोजी दीर्घकाळ आजारपणाने आपल्याला सोडून गेले. या तिन्ही मित्रांमध्ये कट्टर मैत्री होती आणि हा योगायोग त्यांच्या मैत्रीची शोभा वाढवणाराच आहे. खरंच मैत्री असावी तर अशी!

अशा या तिन्ही जिगरी मित्रांची शेवटची तारीख एकच म्हणजे २७ होती, हे तिन्ही दिग्गज कलाकार त्यांच्या चाहत्यांच्या मनावर आजही राज्य करतात हा मात्र योगायोग नसून सत्य आहे हे आपण जाणून आहोत.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here