आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मार्शल आर्ट शिकलेला हा माणूस 256 वर्ष जिवंत राहिला होता….


हे ऐकून अचंबित झालात का? तुम्ही ऐकलेच असेल की पूर्वी काळचे लोक शंभर ते दीडशे वर्ष जगायचे, कारण तेव्हाच्या खाण्यापिण्यात शुद्धता व तंतोतंतपणा होता. पण चक्क २५० वर्षे माणूस जगला हे जरा विश्वास न बसण्यासारखंच आहे. पण ही गोष्ट खरी असून आज आम्ही तुम्हाला त्या अजब-गजब व्यक्तीबद्दलच्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा करू.

जगातील प्रसिद्ध व विश्वसनीय विकिपीडिया साईटवर या व्यक्तीबद्दल लिखित असून, तो चिनी माणूस सुमारे २५६ जगून मरण पावला ही माहिती मिळते. इतके जगण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी त्याने अनेक मंत्र शिकले व आजमावले होते.

जास्त काळ जिवंत असलेल्या या माणसाचे नाव ली चिंग यूएन असे होते. इतिहासकार सांगतात की, त्याचा जन्म १६७७ साली किजीयांग जिल्ह्यामध्ये झाला होता. पण काही लोक वेगळाच दावा करतात की तो १६७७ ला नव्हे तर १७३६ च्या सुमारास जन्माला होता.

new google

त्यानंतर आपले आयुष्य निरोगी जगत वयाच्या ७२ व्या वर्षी ते सैन्यात भरती झाले होते व मार्शल आर्ट्सही शिकले. सैन्यात येण्यापूर्वी ली चिंग हे आयुर्वेदिक डॉक्टर होते व स्वतः तंदुरुस्त राहणे, खाणे-पिणे याकडे ते खूप लक्ष देत असत आणि असे करत त्यांनी दीर्घकाळ जगण्याचा मंत्र शिकला.

माणूस

इथपर्यंत त्यांची कहाणी साधी सरळच वाटली असणार तुम्हाला, पण त्यांची कहाणी अभी बाकी दोस्त. हा! हा! असे म्हंटल्या जाते कि लि चिंग च्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी एकूण २३ बायकांवर अंत्यसंस्कार केले. बापरे! १९३० मध्ये, न्यूटॉर्क टाइम्स मध्ये प्रकाशित झालेल्या टाइम मासिकात चिनी इतिहासकार वू चिंग ची मुलाखत आली होती, त्यात १८२७ मध्ये चीनच्या शाही सरकारने ली चिंगना त्यांच्या १५० व्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिलेले सांगितले तसेच त्यांच्या २०० व्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन दिलेले कागदपत्र ही जाहीर करण्यात आले.

चक्क चार-पाच पिढ्याचे लोक बघत जगणारे ली चिंग शेवटी ६ मे १९३३ ला स्वर्गवासी झाले. त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य हे केवळ औषधी वनस्पती होत्या, त्यांच्या या जीवनप्रवासात ली चिंगने २४ लग्न केली तर त्यांना सुमारे २०० मुले होती. म्हणतात ना माणसाला खूप इच्छा असते, ली चिंग आपली इच्छा चांगलीच जगून गेले.

मला तर या लोंगेस्ट लिव्हड माणसाबद्दल लिहायला खूप मज्जा आली पण तुम्हाला आमचा हा लेख वाचून कसे वाटले हे आम्हाला कसे कळेल बरे? तर कमेंट करूनच पुढे जा.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:

झारखंडच्या या ‘जलपुरुषाने’ ने बदलले आपल्या परिसराचे चित्र, पद्मश्रीनेही केले गेले सन्मानित!

लहान मुलांचा लाडका मिकी माउस व त्याचे मित्र हातमोजे का घालतात? जाणून घ्या कारण..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here