आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या सनकी माणसाने 912 लोकांना एकसाथ आत्महत्या करण्यास मजबूर केले होते…


आपण नेहमीच म्हणतो की, अंधश्रद्धा बाळगून फक्त नुकसानच होते व असेच एक उदाहरण जिम जोन्स नावाच्या माणसाचे इतिहासाच्या पानावर नोंदल्या गेलेले आहे.

अतिशय दुष्ट व कपटी अशी या माणसाची ख्याती होती, फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभर त्याने लोकांवर केलेल्या छळाची चर्चा होती.

ही घटना दक्षिण अमेरिकेतील गयाना येथील जोन्सटाऊन मधील आहे. त्याचा हा पराक्रम एका हत्याकांडापेक्षा कमी नव्हता. घटना अशी की १८ नोव्हेंबर १९८७ रोजी जिम जोन्स या वेड्याने तब्बल ९१२ लोकांचा बळी घेतला व हा अमेरिकेसाठी काळा दिवस होता.

ह्या जिम चा जन्म इंडियाना येथे झाला. हे मुल लोकांचा मसीहा म्हणून ओळखल्या जाऊ लागले, नंतर याने लोकांसाठी मदतीची कार्य करत त्यांचा विश्वास जिंकला तसेच आपुलकी व बंधुता असा संदेश देत पीपल्स टेम्पल्स नावाचे मंदिर बांधून लोकांना अर्पित केले.

लोकही जिम जोन्स च्या वागण्या-बोलण्याने प्रभावित होते, तो त्यांना आपल्या गोड शब्दात अडकवायचा व लोक त्याच्यावर फार कमी वेळात विश्वास ठेवायचे. काही वेळाने जिमने तिथला चर्च कॅलिफोर्नियाला नेला.

जिम जोन्स ने अमेरिकेतील गयाना येथे आपल्या साथीदारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला, व अमेरिकी सरकार त्यावर विचारशून्य होते. लोकही हळू-हळू त्याचा कपटीपणा, षडयंत्र समजू लागले होते, जेव्हा जिमला याची भनक लागली तेव्हा तो लोकांना त्रास देई व त्यांना १२ तास काम करायला लावत होता.

अमेरिकी सरकार आता त्याच्यावर कारवाई करून त्याला हद्दपार करणार होता. पन जिम खूप षड़यंत्री होता. त्याने तेव्हा लोकांना असे मुठीत घेतले कि तो जो सांगायचा लोक ते निमूटपणे ऐकत होते.

आत्महत्या

तेव्हा जिम ने लोकांना सांगितले की आता अमेरिकी सरकार आपल्या सर्वाना गोळ्या घालून ठार करऱ्यांच्या तयारीत आहे, ते कधीही आपल्यावर हल्ला करू शकतात, पण मला तसे होऊ द्यायचे नाही म्हणून मी तुमच्या सुरक्षेसाठी हे पेय देतो, हे प्या म्हणजे तुमच्यावर गोळ्या जरी झाडल्या गेल्या तरी तुम्ही जिवंत राहाल.

तर बऱ्याच लोकांनी जिम ने प्यायला दिलेले विष घेतले व त्यांचा मृत्यू झाला, ज्यांनी विष घेण्यास नकार दिला त्यांना जबरदस्ती विष पाजविले व एकूण ९१२ लोक त्या दिवशी मरण पावले. तर बाकी काही लोक तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले व त्यांनी या वेड्या माणसापासून स्वतःला वाचविले.

त्यानंतर या पागल जिम ने स्वतःला आरामशीर खुर्चीत बसून गोळी मारून घेतली आत्महत्या केली.

जिम ही कहाणी खूप काही शिकवून जाते की समोरचा कितीही मोठा व ताकतवर असला तर भोळे आंधळे अनुयायी बनून जगणे म्हणजे स्वतःहून विष प्रश्न करणे होय. सतर्क राहून स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका नाहीतर या जगात जिम सारखे लोक कमी नाहीत.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here