आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

तुम्हाला डिस्ने कॅरेक्टर्स म्हणजेच आपला मिकी माउस व त्याचे मित्र हातमोजे का घालतात हे माहित आहे का?


मिकी, मिन्नी, डोनाल्ड डक, पिनोचियो आणि दुसरी अनेक डिस्ने पात्रे कोणा एकाला आवडत नाहीत असे कधी ऐकले आहे का? अजिबात नाही.आपण याना लहानपणापासून पाहतो आणि आनंद लुटतो. पण ह्यासर्वानीच एक सारखे हँडग्लोव्हस घातलेले आपल्याला दिसते, याचा आपण आजवर कधी विचारच केलेला नाही. हो ना? पण या सगळ्याच ऍनिमेटेड मिकी माउसना हँडग्लोव्हस घालण्यामागे एक तार्किक चाल आहे जी आजपर्यंत कोणीच पकडू शकले नाही आणि आज आम्ही ते सिक्रेट तुम्हाला सांगू.

या सर्वानीच ग्लोव्हस घालण्यामागे एक गहण विचार व क्रिया आहे. आपल्याला माहिती असलेले व डोळ्यासमोर गोजिरवाणे दिसणारे पात्र बनवण्यासाठी खूप सारी मेहनत व अचूकता लागते. असे ऍनिमेशन त्या काळी बनविणे म्हणजे बऱ्याच जणांसाठी काल्पनिक व ज्यांना बनवून दाखविले त्यांच्यासाठी नवलाची गोष्ट होती. तेव्हा ऍनिमेटर्स त्यांचे काम सोपे बनविण्यासाठी अनेक हॅक्स आणि टूल्स चा वापर करत असत. व्हॉक्सच्या मते, यामध्ये अशी विचार पद्धती होती कि हात बनवण्यासाठी अँगेल्स ऐवजी राऊंड अनिमेशन बनविले जावे व ते सोपे ही होते.

तरीही, काळ्या आणि पांढऱ्या व्यंगचित्राच्या त्या काळात काळे शरीर व पांढरे हात असे वेगवेगळे बनवणे खूप कठीण होते. आणि हाताला ग्लोव्हस घातले म्हणजे त्यांचा हात वेगळ्या रंगाचा दाखवणे हा सोपा उपाय होता. त्यानंतर जसजसं ऍनिमेशन काळ्या आणि पांढऱ्या रंगापासून पुढे-पुढे जात गेलं, मिकी आणि त्याच्या मित्राने आपल्या ग्लोव्हसची ओळख जगासमोर ठेवली.मिकी माउस

new google

अनिमेशन साधे व सोपे ठेवण्याव्यतिरिक्त, वॉल्ट डिस्ने यांनी त्यांचे चित्रकार थॉमसला सांगितले होते की ग्लोव्हस हे मिकी माउसचे मानवीकरण करण्यासाठी आहेत, ज्याने की मिकी हसत-खेळत जगणारा वाटावा. नुरोर्क टाइम्स नुसार, १९५७ मध्ये डिस्ने यांनी थॉमस ला सांगितले की,”मिकी ला हात असावेत असे मला आवडतच नाहीये, कारण या छोट्याश्या आकृतीवर पाच बोटे खूप जास्त वाटतील, म्हणून आपण मिकीला चारच बोटे ठेऊन त्याला हातमोजे घालुयात.”

तर आपल्या लाडक्या मिकी माउस व त्याच्या मित्रांना पाच नव्हे तर चारच बोटे आहेत आणि याकडे आपले कधी लक्ष गेले नाही ही खरंतर मिकी माउसच्या सादरीकरणाची जादू आहे हे आपण मान्य करू.

तर तुम्हाला मिकी व त्याच्या मित्रांचे ग्लोव्हस आवडतात का? आणि आम्ही सांगितली ही सिक्रेट गोष्ट कशी तुम्हाला कशी वाटली ते कंमेंट करूनच पुढे जा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:

झारखंडच्या या ‘जलपुरुषाने’ ने बदलले आपल्या परिसराचे चित्र, पद्मश्रीनेही केले गेले सन्मानित!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here