आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

हा रोबोट कुत्र्याला खाऊ-पिऊ घालतो व त्याची सगळीच काळजी घेतो असे म्हणायला हरकत नाही.


गेल्यावर्षीपासून कोरोना सुरुवातीपासून लॉकडाऊन हे सर्वांसाठीच कठीण काळ गेला. अशा परिस्थितीत लाखो मजूर कामे ठप्प पडल्याने घाबरून गावी स्थलांतरित होत होते कारण उपजीविकेसाठी पुरेल तेवढे अन्न व पैसे मिळवणे कठीण झाले होते. त्यामुळे बरेचजण स्वतःजवळ पाळलेली आणि रस्त्यावरची पोसलेली कुत्रे या संसर्गजन्य रोगाला भिऊन त्या कुत्र्यांना रस्त्यावर तसेच सोडून गेले, आणि नंतर अशा सर्व मुक्या जीवांचे लॉकडाऊनमध्ये काय बेहाल झाले ते सर्वानाच ठाऊक आहे. कितीतरी लोक कुत्र्यांपासून संसर्ग पसरेल म्हणून वा सहजच आपल्या कुबुद्धीमुळे म्हणा त्यांच्यावर अत्याचार, गैरवर्तन करताना दिसले.

अशीच एक कहाणी जोजो नावाच्या कुत्र्याची आहे. कोणीतरी रस्त्यावरच्या जोजो कुत्र्याला एव्हढे मारले होते की तो जखमा होऊन अंध व बहिरा झाला. त्यावेळी सुदैवाने एका शिक्षित माणसाने जोजोला पाहिले व त्याला घरी नेऊन पूर्णपणे निरोगी बनवण्याची जबाबदारी स्वीकारली. ह्या उदार माणसाचे नाव मिलिंद राज आहे व रोबोट डेव्हलप करणे ही त्यांची आवड.

या रोबोट उत्साही राज यांनी एक असा रोबोट बनवला की जेव्हा ते घरी नसतील तेव्हा जोजोच्या सर्व गरजा हा रोबोट पूर्ण करेल.

new google

हे पण अवश्य वाचा :

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?


द लॉजिकल इंडियन च्या म्हणण्यानुसार, जोजो इतका गंभीर जखमी झाला होता की तो कुणाच्या जवळ जाण्यासही घाबरत होता, तेव्हा मिलिंद यांनी जोजोला पशुवैद्यकीय डॉक्टर कडे नेले तर डॉक्टरानी सांगितले, कुत्र्याची खूप काळजी घ्यावी लागेल.

मिलिंद यांनी नंतर जोजोसाठी एक अनुरूप रोबोट बनवला जो जोजोला खायला घालेल व दुरून त्याची निगराणी ही करेल. मिलिंद एएनआए शी बोलताना म्हणाले की, त्यांना हा कुत्रा लॉकडाऊन चालू असताना भेटला , पशुवैद्यकीय डॉक्टर कडे नेल्यावर डॉक्टरांनी कुत्र्याच्या गंभीर जखमा व वेदनाबद्दल ची माहिती मिलिंदला करवून दिली. म्हणून मिलिंदने जोजोसाठी रोबोट बनवला जो त्यांच्या गैरहजरीत जोजोची काळजी घेईल.

रोबोट
मिलिंद पुढे सांगत होते की, त्यांना जोजोसाठी रोबोट तयार करण्याची गरज वाटली कारण जोजो त्याला मारहाण झाल्यापासून माणसांना खूप घाबरत होता, आणि रोबोट जोजोसाठी खाऊ घालण्यापासून ते त्याची पूर्ण काळजी घेण्यावर लक्ष देऊ शकतो.

जवळपास सात महिने जोजोचा हा रिकव्हरी प्रवास चालू होता, या सात महिन्यात जोजोच्या जखमा भरत गेल्या व त्याला दिसूही लागले होते. यावरून रोबोटने त्याची चांगलीच काळजी घेतलेली घेतलेली कळते. मिलिंद राज यांची असे रोबोट बनवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती तर यापूर्वीही त्यांनी अनेक रोबोट व ड्रोन बनविले आहेत. एवढेच काय तर त्यांना भारताचे ‘ड्रोन मॅन’ म्हणून देखील ओळखल्या जाते व माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी मिलिंदचा पुरस्कार देऊन सत्कारही केला आहे.


हे पण अवश्य वाचा :

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here