आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आयएएस अधिकारी होण्याऐवजी शेती करून हा तरून वर्षाला 80 लाख कमावतोय..


भारतीय सर्वसाधारणपणे बऱ्याच प्रमाणात एखाद्या कुटूंबात जन्माला आल्यानंतर साहजिकचं मुलांवर एखादा चांगला अधिकारी किंवा सरकारी नोकरीला लागलेला व्यक्ती होण्याची घरच्यांकडून अपेक्षा ठेवली जाते. आज आपण ज्या व्यक्तीमत्वाबाबत बोलणार आहोत त्यांच्या वडीलांनाही त्यांनी एक चांगला आयएएस अधिकारी व्हावं अशी ईच्छा बाळगली होती. परंतु तसं न करता एक शेतकरी म्हणून आपलं काम निवडून अचूकपणे एक वेगळा आदर्श या व्यक्तीमत्वाने सर्वांना घालून दिल्याचा पहायला मिळतो.

तब्बल एक ना दोन तर पाच एकर शेती आणि तीदेखील अगदी कोरडवाहू सुधाशूंला त्याच्या वडीलांकडून मिळाली. आणि त्याने वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगत आपल्या जिद्दीच्या व चिकाटीच्या जोरावर त्या शेतीचं अगदी सोनं केलं असं म्हणता येईल. सुधाशूं जवळपास 1990 पासून शेतीत रमला आहे.

 शेती

एकीकडे आज तमाम भारत देशात शेती आणि शेतकरी यांची अवस्था फार दयनीय झालेली आपल्याला वारंवार पहायला मिळते. कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ, कधी पिकांवरचे विनाशी रोग तर कधी दुसरीच अडचण. परंतु विविध संकटांना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून सामोर जाऊन सुधांशू याने आज तमाम शेतकऱ्यांसाठी एक उदाहरण स्थापित केल्याच पहायला मिळतं.

मुळचे बिहार येथील रहिवासी असलेले सुधांशू कुमार हे नयानगर, समस्तीपुर येथील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे असलेल्या एकूण जमिनीच्या मोजक्याच भागावर ते आज शेती करताना पहायला मिळतात आणि त्यातही त्यांच उत्पन्न चक्क वर्षाला 80 लाख इतकं अफाट आहे.

एखाद्या आयएसएस अधिकारी वा इतर कोणत्याही सरकारी नोकरीपेक्षा तर कित्येक पटीने हे अधिकचं म्हणावं लागेल. शिक्षण पुर्ण केल्यानंतर टाटा टी गार्डन येथे काम करून ते सोडल्यानंतर गावात परत येऊन सुधांशू कुमार याने तरूण वयात शेती करायचा धाडसी निर्णय घेतला.

सुधांशू कुमार आज सांगताना सांगतात की, त्यांची जमीन फारच कोरडवाहू होती आणि तिथं काही पिकवणं फार अवघड गोष्ट होती. परंतु बऱ्याच गोष्टी प्रयोगशील पद्धतीने पार पाडल्यानंतर त्यांनी जमिनीची सुपिकता वाढवली. त्यांच्या आधुनिक पद्धतीच्या कामामधे महत्त्वाचा वाटा येतो तो म्हणजे सिंचन प्रक्रियेचा.

शेती

ड्रिप इरिगेशन अर्थात ठिबक सिंचन आणि मायक्रो स्प्रिंकलर चा योग्य पद्धतीने त्यांनी आपल्या शेतात वापर केला आहे. एका ठराविक पिकाच्या वाढिसाठी आवश्यक असलेल्या घटकाचा अर्थात तापमान समान ठेवण्याच्या प्रक्रियेचाही त्यांनी योग्य अवलंब केलेला पहायला मिळतो.

इतक्यावरच गोष्टी थांबलेल्या नाहीत तर वायरलेस इंटरनेटचा वापर शेतातले विविध भागात पसरवलेला पहायला मिळतो. यामुळे योग्यवेळी खत, पाणी व इतर रासायनिक खते यांची कधी कुठे किती प्रमाणात गरज लागणार आहे याची सर्व माहिती मिळवली जाते. अर्थात एका ठिकाणी बसूनदेखील ते आपल्या शेतीवर पुर्णत: लक्ष देऊ शकतात.

सध्याच्या घडीला त्यांनी शेतात फळांच उत्पादन अधिक घेण्यावर भर दिलेला पहायला मिळतो. केळी, आंबे, पेरू, चीकू व इतर फळे यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, या सर्व फळांवर निगराणीसाठी सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

सिसिटीव्हीच्या माध्यमातून ते आपल्या पिकांवर अगदी सहजरित्या नजर ठेवू शकतात. आपल्या कमाईच्या 80 लाख वाट्यापैकी काही वाटा हा लिची या पोषक फळाचा आहे. यातून वर्षाला 22 लाखांपर्यंतची कमाई ते करतात. इतर फळांमधे केळी जवळपास 30 ते 35 लाखांपर्यंतची कमाई करून देते. तर आंब्याचही उत्पन्न चांगल्या प्रमाणात निघतं. गेल्या वर्षी ते 13 लाखांपर्यंत गेलं होतं. तर मुळात अशा पद्धतीने सुधांशू कुमार यांची ही कहानी सर्वांना एकप्रकारे थकित करून सोडणारी आणि प्रेरणा देणारी ठरत असल्याची आहे.


हे पण अवश्य वाचा :

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलिस्ट:


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे हि आवडेल- निळ्या रंगाचा लावा ओकणारा ज्वालामुखी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here