आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

चहा विकण्यासाठी सोडली युपीएस्सीची तैयारी, 65 पेक्षा अधिक शहारांमधे चालू केला स्वत:चा व्यवसाय!


आयुष्यात एखादी जोखमेची गोष्ट करायची झाली तर काय आणि कशा पद्धतीने ती करता येईल याची प्रचिती ती जोखिम पत्कारल्याशिवाय येत नाही हेच खरं. तुम्हाला आज आम्ही अशा एका व्यक्तीमत्वाबद्दल सांगणार आहोत ज्याने जीवणाच्या महत्वाच्या टप्प्यावर अचानक एक वेगळा निर्णय घेतला आणि आयुष्यातली पुढची सारी गणितचं बदलून टाकली.

अर्थात या व्यक्तीच नाव आहे, अनुभव दुबे. अनुभव आपल्याला आयएएस अधिकारी व्हायचं आहे या इच्छेने युपीएस्सीची परीक्षा देण्याच्या वाटेवर उभा राहिला होता. परंतु एका टप्प्यावर त्याने हा निर्णय अर्धवट सोडत एक वेगळीच वाट शोधली आणि आज तो त्या वाटेवर यशस्वी उद्योजक म्हणून प्रस्थापित झाला आहे असं म्हणता येईल.

21 वर्षाच्या वयात आपण भारतीय सेवेत रूजू होऊन काहीतरी चांगला अधिकारी बनून आयुष्य जगू हे स्वप्न बाळगणारा अनुभव आज एक उद्योजग कसा झाला? हे जाणणं फार उत्सुकतेच ठरतं. तरूणपण फार महत्वाचं असतं आणि याच वयात मित्र निवडणंही तितकचं महत्वाचं असतं. अनुभवला त्याच्या मित्राचा चांगलाच पाठिंबा मिळाला आणि तो पुढे उभा राहत गेला. एके दिवशी अनुभवला आनंद नायक या मित्राचा फोन आला. दोघांच व्यवसाय करण्यावर बोलणं झालं दोघांनी तयार केलेल्या एका जुन्या युक्तीवर काम करायचं त्यावेळेस ठरवलं.

new google

अनुभव आपला मित्र आनंद याच्यासोबतच चहा विकायची स्वप्ने पाहू लागला होता कारण त्याला चहा या पदार्थाचा लोकांमधील उत्साह आणि त्याची आवड किती प्रचंड प्रमाणात आहे, याची जाणिव होती.

चहा

आपल्या उद्योग करण्याच्या युक्तीच्या सुरूवातीच्या दिवसांमधे अनुभवने आनंदला सल्ला दिला की आपण सुरूवातीला आपले सर्वाधिक ग्राहक हे विद्यार्थी असले पाहिजेत यावर लक्ष देऊ.

3 लाख रूपयांची जमापुंजी एकत्र करून दोघांचा बिझनेस हा सुरू झाला. आनंद यादय याचा आधी गारमेंट्सचा बिझनेस होता त्यातून कमावलेले पैसे त्याने इकडे वळवले होते. सुरूवातीच्या दिवसांमधे कमी पैशांमधून सुरूवात केल्याने काही कालावधीच लवकर व्यवसाय वाढीला लागणं गरजेचं होतं याची जाणिव झाल्यावर अनुभव याने आपल्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीवर लक्ष देण्यास सुरुवात केली आणि याचा खास फायदादेखील त्या दोघांना लवकर जाणवला.

हळूहळू ग्राहकांना त्यांच्या क्वालिटीचा आणि योग्य किमतींचा विश्वास मनात बसू लागला. चहा केवळ 7 पासून 10 पर्यंत मिळतच होती परंतु चहाची क्वालिटी इतकी आवडू लागली होती की सर्वांना याच चहाची तलप लागली. अनुभवच्या या बिझनेसचा पुढे चाय सुट्टा बार तयार झाला.

आणि आज पाहता पाहता देशभरात 60-65 पेक्षा अधिक इतर शहरांमधे यांची फ्रॅन्चायझी सहज पोहोचली आहे. चाय सुट्टा बारमधील स्टफ, नियोजन, खबरदारी अगदी चोखपणे सर्व गोष्टींना हाताळल्या जात असताना आज पहायला मिळतं. इथे बऱ्याचदा संगीत कार्यक्रमांचे आयोजनदेखील केल्या जाते.

अनुभवने एकूणच सुरूवातीपासून जसा या व्यवसायात फोकस केला तसा एकूण एक बारीकसारीक गोष्टी त्याने ध्यानात ठेवून आपल्या कामाला रोख बनवलं. आणि आयएएस अधिकाऱ्याऐवजी एक वेगळीच वाट शोधली. देशभरात आज विविध आउटलेट्स चाय सुट्टा बार यांचे उभे आहेत, ते केवळ एका जिद्दीच्या आणि योग्य विचारांच्या दिशेत आखल्या गेलेल्या योजनांच्या जोरावर.

अनुभव सारखे आज इतरही काही तरूण भारतातल्या तमाम इतर तरूणांना आदर्श म्हणून प्रेरणादायी ठरत आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो.


हे पण अवश्य वाचा :

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलिस्ट:

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे हि आवडेल- निळ्या रंगाचा लावा ओकणारा ज्वालामुखी!

आयएएस अधिकारी होण्याऐवजी शेती करून हा तरून वर्षाला 80 लाख कमावतोय..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here