आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीने चक्क एयरफोर्सचे 6 हेलीकॉप्टर विकत घेतलीत…


प्रसारमाध्यमांमधे सध्या झळकत असलेल्या काही ठराविक बातम्यांमधे प्रामुख्याने एक गोष्ट चर्चेचा तुफान विषय ठरत असल्याची पहायला मिळते आहे. ती म्हणजे चक्क हेलीकॉप्टरची नीलामी 72 लाख रूपयांना झाली आणि तीदेखील एका भंगार गोळा करणाऱ्याने एयरफोर्सचे हेलीकॉप्टर्स विकत घेत केली.

एयरफोर्सचे हे काही हवाईजहाज बऱ्याच दिवसांपासून सेवेत नव्हते आणि ते बरेच खराबदेखील झालेले होते. नव्या दिल्लीत स्थित असलेल्या एयरफोर्सच्या कार्यालयाकडे या सदर गोष्टीचा अहवाल पाठवण्यात आला आहे. आपल्या नजरेस आजवर एवढचं पडलं आहे की, एखादा भंगारवाला फार फार तर घरातल्या किरकोळ खराब झालेल्या वस्तूंना विकत घेऊन तो त्या विकत असतो.

परंतु लहानमोठ्या गोष्टी आणि थेट हेलीकॉप्टरची विक्री करणं यात फारच मोठा फरक आहे. तर हा भंगारवाला एक ना दोन तब्बल सहा हेलीकॉप्टर विकत घेऊन चर्चेचा विषय ठरला आहे. हे सहा हेलीकॉप्टर भंगारच्या यादीत जमा झाल्याचे शासनाकडून घोषित केल्या गेले आणि त्यामुळे नंतर त्यांची निलामी करण्यात आली.

हेलीकॉप्टर

पंजाब येथील मानसा या जिल्ह्यातील भंगारचा व्यवसाय करणारे मिठ्ठू अरोरा व डिंपल अरोरा यांनी हा पराक्रम केल्याचा पहायला मिळतो. यांच्याकडून आपला भंगारच्या व्यवसाय असलेल्या ठिकाणी हेलीकॉप्टर्सना नेण्यात आलं आहे. पुर्ण अख्खा एक दिवसभर हेलीकॉप्टरची व्यवस्था लावण्यात येत होती.

हेलीकॉप्टरची खरेदी केलेल्या डिंपल यांनी नुकतच सांगितल की, ते सरकारकडून केल्या जाणाऱ्या ऑनलाईन निलामीवर नजर ठेवून असतात. आणि यावेळी त्यांना अधिक रूची आली ती म्हणजे चक्क हेलीकॉप्टर्स निलामीत दिसल्याने. एमआय 17 या जुन्या मॉडेल्सचे हे सगळे हेलीकॉप्टर्स होते. उत्तर प्रदेश येथील सरसावा या एयरफोर्सच्या स्टेशनवरून त्यांनी हे हेलीकॉप्टर्स खरेदी केले.

निलामीत घेतल्या गेलेल्या या हेलीकॉप्टर्सचं प्रत्येकी वजन 10 टनांच्या आसपास इतकं आहे. काही प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार यां हेलीकॉप्टर्सची खरेदी एकूण 72 लाखांना झाली आहे. हेलीकॉप्टर्स उपयोगात आले त्याला बराच काळ निघून गेला होता आणि पुन्हा त्यांना रिपेअर करून वापरणं फार प्रमाणात सोयीचं नव्हतं.

हे जाणून घेतल्यानंतरच दिल्लीतील एयरफोर्स मुख्यालयाने यांंना निलामीत काढायचा निर्णय घेऊन टाकला. सध्याच्या घडीला या सहापैकी तीन हेलीकॉप्टर्स हे डिंपल यांच्याकडूनही विकले गेले आहेत. उरलेल्या तीन हेलीकॉप्टर्सनाही सुरक्षित पद्धतीने डिंपल यांच्या ताब्यात पोहचवण्यात येत आहे. निलामीत हे हेलीकॉप्टर्स विकत घेतल्यानंतर आता हेलीकॉप्टर्सची ने-आण करण्यात जो खर्च झाला आहे तो खर्चदेखील डिंपल यांनाच करावा लागणार आहे.

ज्यात प्रत्येकी एका हेलीकॉप्टरसाठी 75 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. डिंपल यांनी विकलेले तीन हेलीकॉप्टर्सपैकी एक चंढीगड येथे रेस्टॉरंटमध्ये वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे. एक मुंबईतल्या शुटींगकरता उपलब्ध करण्यात येत आहे. तर उर्वरित एकाला लुधियानात पाठवलं जातं आहे. सध्याच्या घडीला तरी हे सारे निलामीत निघालेले हेलीकॉप्टर्स एकप्रकारे सर्वांच्या चर्चेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना पहायला मिळतं आहेत.


हे पण अवश्य वाचा :

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here