आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

राणी जिंदा कौर, एक अशी स्त्री जिची भिती खुद्द इंग्रजांनाही वाटायची!


इतिहासात अनेक राण्यांचे योगदान न विसरण्याजोगे आहे. आपल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे अश्या राण्या इतिहासात आमर झाल्या. आज आपण अशा एका क्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्या आयुष्याची सुरूवातच कठीण त्यागापासून झाली आहे. अर्थात एक अशी माता जिला राज्याच्या रक्षणाकरता तिच्या निरागस मुलापासून दूर जावं लागलं. तेदेखील अशा प्रसंगात जिथे त्या मुलाला या धरतीवर त्याच्या आईशिवाय इतर कोणताही आधार मिळणं शक्य नव्हतं.

वैयक्तिक फार प्रचंड वेदनांमधून जातानाही ही स्त्री इंग्रजांविरूद्ध मोर्चे आंदोलने करत राहिली. ज्या स्त्रीबद्दल आपण हे सारकाही आता जाणून घेणार आहोत ती म्हणजे, पंजाबचे महाराजा रणजीत सिंग यांची धाकटी पत्नी राणी जिंदा कौर.

या राणीने पतीच्या मृत्यूनंतर पंजाबची सत्तेची सुत्रे स्वत:च्या हातातचं घेतली नाही तर थेट इंग्रजांना तिने तिच्यासमोर झुकायला अगदी प्रवृत्त केलं. राणी फार हुशार आणि तडफदार होती, तिच्या युक्त्यांसमोर आपला निभाव लागणार नाही याची इंग्रजांना तीव्र जाणिव हळूहळू होऊन गेली होती. इंग्रज तिच्यापासून हातचं अंतर ठेवून राहू लागले होते.

new google

राणी जिंदा कौर ही महाराजांच्या सर्वात सुंदर पत्नींपैकी एक होती. तिने एका मुलाला जन्म दिला होता त्याचं नाव, दिलीप सिंह ठेवल्या गेलं. आपला उत्तराधिकारी तोच होणार याची महाराजा रणजीत सिंगांना शाश्वती होती. जेव्हा महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा राज्यात नेमकी अनागोंदी माजली. राजांच्या खास लोकांकडून विश्वासघाताची ठिणगी पडली. इंग्रजांना नेमकी हीच संधी हवी होती. परंतु ज्या प्रकारे राणी जिंदा कौर यांनी ही परिस्थिती हाताळली त्या गोष्टींना खरचं मानलं पाहिजे.

राज्यातली अनागोंदी थांबवण्याकरता राणीने 5 वर्षांच्या आपल्या मुलाला गादीचा वारसदार घोषित करत राज्यकारभार स्वत:च्या पुर्ण ताब्यात घेतला. हा प्रकार घडल्याने वातावरण थोडसं आटोक्यात आलं होतं. परंतु या घटनेने नक्कीच आपला मुलगा दिलीप सिंग याच्या जिवाला आपण धोका निर्माण करत आहोत ही जाणिव राणीला झाली होती.

ती आजवरच्या आयुष्यात एक कुशल आणि निपुण विरांगणा ठरली होती. इंग्रजांनी पहिलं युद्ध राणीविरूद्ध छेडलं, राणीला तिच्याच लोकांकडून विश्वासघाताची पहिली झळ यावेळी बसली. आणि राणीचा पराभव झाला.

ब्रिटिशांनी तिला विद्रोही राणी म्हणून घोषित केलं. याच काळात राणी इंग्रजांविरूद्ध छोटे छोटे कट स्थापन करून त्यांना पाडाव करण्याचे आतोनात प्रयत्नही करत राहिली. दुसर्‍या युद्धाच्या वेळी राणी जिंदा कौर हिच्याकडे नेतृत्व नसल्याने पंजाबचा पाडाव झाला आणि तिथे इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली.

राणी

पहिल्या युद्धानंतर राणी व तिचा मुलगा हे दोघेही चुनार किल्ल्यात नजरकैदेत ठेवल्या गेले होते. जसेतसे प्रयत्न करून राणी चुनार किल्ल्यातून बाहेर पडली. त्यानंतर नेपाळ येथे जाऊन काठमांडूमधे ती शरणार्थी बनून राहिली. यावेळी तिने आपल्या मुलाला लंडनला पाठवून दिलं.

राणी विक्टोरियाच्या दरबारात लंडनमधे राणीचा पुत्र वाढू लागला होता याची खबर इंग्रजांना नव्हती. राणी जिंदा कौर हीने कश्मिरच्या राजाला त्यांचं राज्य वाढवण्यासाठी आणि इंग्रजांना शमवण्यासाठी मदत करणं चालू केलं होतं. राणीने भारतात राहून इंग्रजांविरूद्ध दावे/प्रतिदावे व इतर छुप्या पद्धतीच्या युक्तीच्या लढाया चालूच ठेवल्या होत्या.

काही काळानंतर पहिल्यांदा जेव्हा राणी व तिचा मुलगा यांची भेट झाली, त्यानंतर इंग्रज सरकारचे खरे दाबे दणाणल्या गेले. आणि तिथून पुढे त्यांनी बराच काळ त्या दोघांच्या भेटी होऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू केले. राणीच्या मुलाने इसाई धर्माचा स्विकार केलेला होता. आपल्या जिवणातील काही काळ राणी लंडनला मुलाकडे जाऊन राहिली. आणि तिथेच तिचा मृत्यू झाला.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here