आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

कॅप्टन चार्ल्स उपहम ज्यांच्या साहसापुढे जर्मन सैनिकांच्या गोळ्याही झुकल्या होत्या..


आज आम्ही तुम्हाला अशा एका साहसी पराक्रमी सैनिकाची गोष्ट सांगणार आहोत ज्याच्या पराक्रमाचे किस्से आज एखाद्याला आयुष्यात प्रोत्साहनपर गोष्ट म्हणून दाखवले जातात. तर हा व्यक्ती म्हणजे कॅप्टन चार्ल्स उपहम आणि या व्यक्तीपुढे एक प्रसंग इतका बाका उभा राहिला होता की, तुम्ही विचारदेखील करू शकणार नाही.

नाजी सैन्याच्या हल्यात चार्ल्स पुर्णत: जखमी झाला होता. त्याला स्वत:ला त्या अवस्थेत चालवल्यादेखील जात नव्हतं. नाजी सेनेचं आक्रमक रूप हळूहळू पुढे त्यांच्या दिशेने सरकत होतं. त्याचवेळी चार्ल्सने फार काही विचार न करता अंगात बळ आणून हातात बंदूक घेत नाजी सेनेच्या दिशेने जायला सुरूवात केली.

कॅप्टन चार्ल्स उपहम

new google

खरतर हा प्रसंग तसं पाहता एखाद्या दाखवल्या जाणाऱ्या सिनेमापेक्षा कमी नाही, पण हा खरा प्रसंग असल्याने अंगावर अक्षरशः काटा येतो.त्यामुळेच नाजी सेनेला एका बाजूने या लढ्यात काढता पाय घ्यावा लागला हे विषेश उल्लेखनीय म्हणावं लागेल.

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की, त्यावेळी जर्मनीच्या नाजी सैन्याच्या विरोधात असा पराक्रम करणारा बलाढ्य योद्धा नेमक्या कोणत्या देशात जन्माला आला तर त्याच उत्तर म्हणजे, तो न्यूजीलैंड येथील सैनिक होता. न्यूजीलैंडच्या एका सैनिकाने नाजींचे नाकी नऊ आणले ही गोष्टच अनेकांच्या रोमरोमात भरून जाते.

दुसर्‍या महायुद्धात झालेल्या लढाईतील हे अविस्मरणीय अनुभव आजही इतरांना नव्याने लढण्याची, शेवटपर्यंत हार न मानण्याची प्रेरणा देत उभे आहेत, हे फार महत्त्वाचं ठरतं. चार्ल्स उपहम हे देशसेवेसाठी एका शेतकऱ्यापासून थेट सैनिक बनले. त्यांनी अगोदरच्या आयुष्यात कधीच असा खास विचारदेखील केले नव्हता की, त्यांना त्यांच्या देशाकरता एखादी लढाई लढण्याची वेळ येईल.

साधारण राहणीमान, आपली शेती आणि एक सहजरित्या जगल्या जाईल असं आयुष्य त्यांना हवं होतं. शेतीच्या अॅग्रीकल्चरल विषयात डीग्रीच शिक्षण त्यांनी पुर्ण केलं. आणि महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर स्वत:चा एक पोल्ट्री फार्म सुरू केला.

चार्ल्स उपहम हे देशसेवेसाठी एका शेतकऱ्यापासून थेट सैनिक बनले. त्यांनी अगोदरच्या आयुष्यात कधीच असा खास विचारदेखील केले नव्हता की, त्यांना त्यांच्या देशाकरता एखादी लढाई लढण्याची वेळ येईल. साधारण राहणीमान, आपली शेती आणि एक सहजरित्या जगल्या जाईल असं आयुष्य त्यांना हवं होतं.

शेतीच्या अॅग्रीकल्चरल विषयात डीग्रीच शिक्षण त्यांनी पुर्ण केलं आणि महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर स्वत:चा एक पोल्ट्री फार्म सुरू केला. सुरूवातीला शेती करून त्यात म्हणावं असं यश न आल्याने नंतर चार्ल्सने शहरात जाऊन तिथे होम गार्डची नोकरी सुरू केली.

पाच वर्षे सलग या नोकरीत घालवल्यानंतर एक काळ असा आला जिथे देशासाठी सैनिक म्हणून उभं राहण्याची गरज निर्माण झाली. होम गार्डच्या अनुभवावर थेट त्यांची भरती सैन्यात करण्यात आली. त्यावेळी सैनिकांचा तुटवडा निर्माण झाला होता कारण जागतिक स्तरावर युद्ध लढल्या जाणार याची अनेकांना धास्ती भरली होती.

कॅप्टन चार्ल्स उपहम

चार्ल्स यांच्या हातात 20 वी बटालियन तुकडी सोपवण्यात आली. नाजींनी ग्रीसच्या बेटावर कब्जा केला होता तो कब्जा उठवणं हे चार्ल्स यांच्या हाती सोपवण्यात आलं होतं. सगळ्या अॉर्डर मिळाल्यानंतर आपली तुकडी घेऊन चार्ल्स युद्धासाठी रवाना झाले. बेटावरील एयरफिल्डवरच्या नाजींना बाहेर काढायला गेल्यानंतर चार्ल्स यांना तब्बल तीनवेळा थांबून लढाई करावी लागली, तरीही कमी तुकडीच्या सहाय्यानेही त्यांनी आपल्या शत्रूवर हल्ला चालू ठेवत आगेकूच केली.

एकीकडे हातगोळे आणि रायफलसारखी छोटी साधणे तर दुसरीकडे थेट मशीनगन आणि मोटार यांमुळे बराच अडथळा चार्ल्स यांच्या तुकडीला होऊ लागला होता. मग त्यावर तोडगा काढण्यासाठी नाजींच्या हत्यारांच्या बंकरचा उद्ध्वस्त करायचा जिम्मा स्वत: चार्ल्स यांनी घेतला आणि हातगोळे बॅगेत भरून एका हातात पिस्तूल धरून थेट बंकरवर हल्ला बोल केला.

नाजींच्या कचाट्यातून वाचून त्यांनी बंकर उद्ध्वस्त केले आणि शिवाय त्या हातगोळ्याच्या हल्लात हत्यारे व 8 सैनिकदेखील जागीच मारल्या गेले. हळूहळू पुढे जात असताना स्फोटाने लागलेल्या आगीत चार्ल्स यांनी एंटीएयरक्राफ्टगनलाही आगीच्या हवाली केलं. यातचं थोड पुढे गेल्यावर त्यांना एक गोळी लागली. त्यांना जखम फार भळभळून झालेली दिसत होती, मेडिकल हेल्पसाठी वापस जाणं त्यांना बरोबर वाटलं नाही.

अशाच जखमी अवस्थेत पुढे सरकताना एक गोळी पायात येऊन लागली. त्या गोळीने त्यांनी पुढे आक्रमण करण्याची गती मंदावली. चार्ल्स यांच्या पाठोपाठच त्यांची तुकडी नाजींवर वार करत येत होती. आपल्यातील लढण्याची जिद्द न सोडता चार्ल्स यांनी हिमतीने आगेकूच चालू ठेवली.

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु या अवस्थेला आलेल्या त्या माणसाने बंदूक एका कडेला टेक लावत ठेवून सलग नऊ दिवस एका ठिकाणी ठाम राहून लढा दिला. आणि नाजींच्या बऱ्याच सैनिकांना ठार केलं. या लढ्यात ते जिवंत वाचले होते हे विषेश होतं. आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. त्यांची बहादुरी पाहून अनेकांना हैराण व्हायची वेळ आली होती.

या प्रकरणानंतरही चार्ल्स यांना थेट इजिप्त येथे नाजींविरूद्ध लढाईला पाठवण्यात आलं. जर्मनीच्या बेस कॅंम्पकडून इजिप्तच्याही हल्ल्यात गोळ्या अंगावर झेलूनदेखील चार्ल्स यांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत हार न मानता झुंज दिली. दोन्ही जबरदस्त युद्धात गोळ्यांनीही मृत्यू न पावलेला हा अफाट माणूस काही वेगळ्याच जिद्दीचा आहे. “2 वेळा विक्टोरिया क्रॉस” हा सन्मान मिळवलेले ते पहिलेच जिवंत व्यक्ती त्यावेळी ठरले होते. लढाईची शेवटपर्यंत हार न मानण्याची ही जिद्दीची अफाट गाथा काही वेगळीच म्हणावी लागेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

व्हिडीओ प्लेलिस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here