आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

गुजरातचा हा पोलीसवाला नोकरी सोडून आलुच्या शेतीतून वर्षाला करोडो कमावतोय…


आजकाल आपण तरुण वर्ग सरकारी नोकरीच्या मागे धावतांना पाहतो. सरकारी नोकरी मिळाली म्हणजे आयुष्य सेट झाल असा अनेक जणांचा समज आहे. असायलाच हवा कारण सरकारी नोकरीतील फायदे पाहता कोणालाही सरकारी नोकरीच मिळावी अशी आशा निर्माण होने स्वाभाविक आहे.

पण जर आम्ही तुम्हाला अस सांगितल की एका युवकाने सरकारी नोकरी सोडून शेती करायला लागला तर तुम्हाला वाचून आच्छर्य वाटेल. हो हे सत्य आहे. गुजरातच्या या युवकाने आपली  पोलिसांची सरकारी नोकरी अर्ध्यावर सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला होता. आणि तो कसा योग्य होता हेही सिद्ध करून दाखवलं आहे.

आज शेतीच्याच माध्यमातून तो वर्षाला करोडो रुपये कमावतोय..

new google

ही व्यक्ती आहे पार्थिभाई जेठाभाई चौधरी, गुजरातच्या बनासकांठामधील दांतिवाडा येथील रहिवासी. पार्थीभाई पूर्वी गुजरात पोलिसात सेवेत होते, परंतु शेतीची आवड आणि काहीतरी वेगळे करून पुढे जाण्याची त्यांची इच्छा यामुळे त्यांनी सुमारे 18 वर्षांपूर्वी आपली सरकारी नोकरी सोडली. पार्थिभाईची 1981 मध्ये एसआय पदावर गुजरात पोलिसात निवड झाली होती.

त्याची सुरुवात अशा प्रकारे झाली की, पोलीस नोकरीच्या दरम्यान, पार्थिभाईंना एका परदेशी कंपनीकडून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली जिथे त्यांना दर्जेदार बटाट्यांच्या उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले. इथेच पार्थीभाईंनी बटाटा उत्पादनाशी संबंधित सर्व तंत्र शिकले आणि त्यानंतर बटाटा उत्पादन सुरू केले.

पार्थीभाईंसाठी बटाटा उत्पादनाची सुरुवात गुंतागुंतीची होती, कारण त्यांना पिकासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे व्यवस्थापन करणे कठीण होत होते, पण त्यावर उपाय म्हणून पार्थीभाईंनी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब केला. या तंत्राद्वारे, पिकाच्या थेंबामध्ये पाणी टाकले जाते, ज्यामुळे पिकाला कमीत कमी पाण्याच्या वापरासह आवश्यक पाणी सहज मिळते.

शेती

आज पार्थीभाई आपल्या 87 एकर जमिनीवर बटाट्यांची लागवड करत आहेत, जिथे ते प्रति हेक्टर सुमारे 1200 किलो बटाटे उत्पादन करत आहेत. या बटाट्यांची गुणवत्ता साधारणपणे चिप्स उत्पादनासाठी योग्य असते. पार्थीभाई सुरुवातीला मेकॅन कंपनीला बटाटे पुरवत असत, मात्र आता ते बालाजी वेफर्स या स्वदेशी कंपनीला चिप्स पुरवत आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर बटाट्याचे उत्पादन करणारे आणि कोट्यवधींचा व्यवसाय करणारे पार्थीभाई आपल्या कुटुंबासाठीही पुरेसा वेळ काढतात. बटाटे साधारणपणे ऑक्टोबरच्या सुरुवातीला पेरले जातात आणि डिसेंबरपर्यंत पीक तयार होते. यानंतर, पार्थीभाई आपले बटाटे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतात, तेथून मग मागणीनुसार बटाटे पुरवले जातात.

आज 15 पेक्षा जास्त लोक पार्थिभाई यांच्या शेतावर काम करत आहेत, तर दरवर्षी पार्थीभाई सुमारे 3.5 कोटी रुपयांचे बटाटे विकतात. बटाटे व्यतिरिक्त, पार्थीभाई एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात बाजरी, शेंगदाणे आणि टरबूज इत्यादी पिके देखील घेतात.

प्रति हेक्टर बटाटा उत्पादनाचा जागतिक विक्रमही पार्थिभाईंच्या नावावर आहे, जिथे त्यांनी 2011-12 मध्ये 87 मेट्रिक टन बटाट्याचे उत्पादन केले. आज बनासकथा हे बटाटा उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र बनले आहे, जेथे देशातील बटाटा उत्पादनाचे सुमारे 6 टक्के उत्पादन घेतले जाते आणि 1 लाखाहून अधिक शेतकरी या कामात गुंतलेले आहेत.


आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here