आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

“लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे”बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा!


हे ज्यांनी इतक्या विश्वासाने म्हणलं ते रणमर्द बाजीप्रभू देशपांडे , खरं तर आपणा सर्वांना छ्त्रपतींचे पराक्रम माहिती आहेत व त्यांचा इतिहास देखील माहिती आहे ,परंतु बहुधा काहीजणांना त्यांच्या मावळ्यांविषयी बरीचशी माहिती नसेल ते मावळे ज्यांनी स्वराज्यांच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. चला मग आज जाणून घेऊया की ,सरदार बाजीप्रभू देशपांडे कोण होते व त्यांनी घोडखिंडीचा लढा कसा लढवला.

बाजी प्रभूंचा जन्म साधारण १६१५ साली झाला असा अंदाज बांधला जातो. पुणे जिल्ह्यात भोर नावाचा तालुका येतो ,या भोर तालुक्याचे बाजीप्रभू हे पिढीजात देशपांडे होते व हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे ते दिवाण होते ,परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू मधील शौर्य , पराक्रम व प्रशासकीय कौशल्य पाहून या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला स्वराज्याच्या कार्याकरता त्यांना आपलंसं करून घेतलं, बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पिली.

बाजीप्रभू देशपांडे हे मराठा साम्राज्याचे लढवय्ये तर होतेच तसेच ते पराक्रमी ,त्यागी ,स्वामिनिष्ठ आणि करारी व कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व असे होते की कोणालाही त्यांचा अभिमान वाटेल. म्हणूनच आज इतिहास देखील बाजीप्रभू देशपांडेंचे नाव अत्यंत गौरवाने व आदराने घेत आहे.

• इतिहासातील अजरामर झालेली घोडखिंडीतील लढाई :- ( पावनखिंड )

new google

‌‌ इतिहासातील अजरामर झालेली घोडखिंडीतील लढाई, बाजीने आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या प्रकारे महाराजांचे प्राण वाचवले ते अतुलनीय होते. व त्यामुळे बाजींनविषयी वाटणारा अभिमान व आदर आणखी वाढला.

त्यावेळी सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला ,त्या वेढ्यातून महाराजांना सोडवण्यासाठी बाजींनी त्यांना विशाळगडाकडे घेऊन गेले, बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते. रायाजी बांदल व फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते.

त्यावेळी विजापुरी सैन्याना समजले होते की त्यांची फसवणूक झाली आहे त्यामुळे ते सैन्य राजेंचा पाठलाग करत होते. व पुढचा धोका बाजींच्या लक्षात आला व त्यांनी महाराजांना वडिलकीच्या अधिकाराने विशाळगडाकडे जाण्यास सांगितले. व बाजी व फुलाजी दोघे बंधू गंजापू्रच्या ( घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले , हजारोंच्या सैन्याला ३०० मराठा मावळ्यांनी रोखले होते.

सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढवली व पराक्रमाची शर्थ केली. छत्रपती शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोहचेपर्यंत बाजींनी शत्रू सैन्यानाला खिंडीत रोखून ठेवले.

बाजीप्रभू देशपांडे

सिद्दी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. बाजींचे लक्ष फक्त एकाच गोष्टी कडे लक्ष होते ते म्हणजे ,महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफाकडे. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते ,खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडली

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी – फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे.

तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे…खरचं इतका निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष मावळा स्वराज्याला लाभला हे स्वराज्यांचे भाग्यच , बाजीप्रभूच काय तर स्वराज्यासाठी ज्या ज्या मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ,ते मावळे सदैव आपल्या स्मरणात राहतील. घोडखिंडीचा लढा आणि बाजी प्रभू देशपांड्यांची स्वामिनिष्ठेची कथा मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवत आहे.

स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत: मृत्यूला सामोरे जायची तयारी असलेल्या बाजी आणि फुलाजी देशपांडेंसारख्या सरदारांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतु ही हिर्‍यांसारखी अमूल्य माणसे सोडून गेलेली पाहताना महाराजांना काय वाटत असेल हे सांगणे कठीणच.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here