आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

कधीकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला ब्लैकबेरी फोन बाजरातून अचानक गायब कसा झाला?


फोनच्या जगामध्ये तसे आजपर्यत अनेक फोननी नाव कमावले. त्यात प्रत्येकाची विशिष्ट अशी ओळख आहे. काही फोन फोटो क्लिक करण्यासाठी चांगले तर काही त्याच्या विशिष्ट अश्या फिचर मुळे चर्चेत आले. पण या सगळ्यांमध्ये त्याकाळी आघाडीवर नाव होते ते म्हणजे ब्लैकबेरी.

ब्लैकबेरी मोबाईल तेव्हा ज्याच्याकडे असे त्याच्या थाट एखाद्या राजापेक्षा कमी नव्हता..

एक वेळ अशी होती की जेव्हा कॉर्पोरेटच्या लोकांना ब्लैकबेरी शिवाय चांगला असा कोणता फोनच मिळत नव्हता. ज्यांच्या कोणाच्या हातात ब्लैकबेरी फोन असतं होता त्यांची एक वेगळीच ओळख होती एके काळी ब्लैकबेरी चांगल्या प्रगतीपथावर होता. पण नंतर असे काही झाले की त्याचे साम्राज्य कोसळले अखेर कशा प्रकारे ब्लैकबेरीने आपले साम्राज्य गमावले त्याविषयी आजच्या या लेखात जरा सविस्तर जाणून घेऊया..

१९९० मध्ये फोन्स मध्ये क्रांती होत होती आणि इंटरनेटचे माध्यम देखील वाढत होते अशा मध्ये आधिकतर कंपनीनी कॉलिंग वाले फोन बनवण्याचा विचार केला. तर ब्लैकबेरीच्या डोक्यात वेगळचं काहीस होत ब्लैकबेरी फोन्सला इंटरनेटशी जोडू इच्छित होते जे की हा सगळ्यात मोठा आणि अवघड निर्णय होता.

new google

कित्येक वर्षांच्या मेहनतीनंतर सन २००० मध्ये ब्लैकबेरीने आपला पहिला फोन रीम ९५७ लाँच केला ,ह्या फोनने येताच सगळीकडे आपली ओळख निर्माण केली.  कोणालाही आशा नव्हती की हा फोन एवढा यशस्वी होईल.

छोटीशी स्क्रीन, वेगळ्या टाईपचा कीबोर्ड आणि सगळ्यात विशिष्ट म्हणजे ईमेल फंक्शनने ह्या फोनला इतर फोनपेक्षा वेगळे बनवले होते. जो बाकी फोन पेक्षा वेगळा होता रीम ९५७ च्या येताच ब्लैकबेरीने फोनला इंटरनेटशी जोडलं. कारण ह्यामध्ये ईमेलचा फंक्शन होता आणि आता ईमेल एक्सेस करायला फक्त संगणकाची गरज नव्हती. फोनवरून देखील ईमेल एक्सेस करता येत होत. ब्लैकबेरीचा पाहिला फोन यशस्वी ठरला आणि त्यानंतर ब्लैकबेरीने आपलेनवीन फोन्स बनवायला सुरुवात केली ज्यामध्ये त्यांचं सगळ्यात जास्ती लक्ष फोनच्या फंक्शन वर होते.

ब्लैकबेरीला समजलं होत की ,ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करायचे असेल तर त्याला आपल्या प्रत्येक नवीन फोन मध्ये काहीतरी नवीन फीचर द्यावे लागेल जेणेकरून ग्राहकांना फोन आवडेल आणि त्यानंतर ब्लैकबेरीने सुरू केला तो काळ ज्या काळात फोनला स्मार्ट फोन मध्ये बदलले, तर येणाऱ्या काळात ब्लैकबेरीने आपल्या प्रत्येक नवीन फोनमध्ये असे काही फीचर दिले की त्यानंतर परदेशात त्याचे नाव खूप मोठे झाले.

ब्लैकबेरी

तर दुसरीकडे भारतात देखील फोन मार्केट हळू हळू वर येत होते.

भारतामध्ये नोकियाने फोन मार्केट मध्ये चांगलाच कब्जा केला होता आणि खूप साऱ्या लोकांजवळ तेच फोन होते ब्लैकबेरी देखील भारतात स्वतःचे स्थान बनवू इच्छित होते त्यामुळे त्यांनी टेलिकॉम कंपनी एअरटेल सोबत डील केली त्यानंतर ब्लैकबेरीने आणि एअरलटेलने मिळून नवीन फोन भारतात लाँच केला आणि ह्यात पण त्यांना यश लाभले.

भारतात ब्लैकबेरीने बिझनेस क्लास लोकांनाच आपला टार्गेट बनवला. त्यानंतर यांनी इथे असे काही बिझनेस फोन लाँच केले ज्यांनी येताच लोकांची मने जिंकली हे फोन बाकी फोन पेक्षा महागडे तर होतेच पण ज्या ज्या लोकांना हा फोन आवडायचा ते लोक या फोनसाठी कोणतीही किंमत द्यायला तयार असायचे. त्यानंतर ब्लैकबेरीचा भारतातील प्रवास सुरू झाला जो कंपनीला प्रगतीपथावर घेऊन गेला.


हेही वाचा:

शीतयुद्ध भडकण्यापासून वाचवणारा हा गुप्तहेर पुढे सीआयएचा सर्वात मौल्यवान एजंट बनला होता.

बॉस्टन टी पार्टीविषयीचे हे 7 आच्छर्यकारक तथ्ये प्रत्येकांना माहिती असायलाच हवे…


 

सुरुवातीच्या वेळी इंटरनेट आणि ईमेल सारख्या फीचर्सने ब्लैकबेरीला मार्केट मध्ये खूप प्रसिद्ध केलं होत.

पण आता गरज होती काहीतरी नवीन आणण्याची जेणेकरून ,आणखी वापरकर्त्यांना ब्लैकबेरी कडे आकर्षित केले जाईल. भारतात येताच २००४ आणि २००५ मध्ये ब्लैकबेरीने आपला इन्स्टंट फोन मेसेजिंग सर्व्हिस बीबीएम लाँच केली. बीबीएम येताच फक्त बिझनेस क्लास नाही तर युवावर्गदेखील ह्या फोनचा वेडा झाला ब्लैकबेरीच्या इन्स्टंट फोन मेसेजिंग सर्व्हिसने चॅटिंगच्या विश्वालाही एक वेगळं रूप दिले. त्यानंतर लोकांनी ह्याचा खूप आनंदही घेतला आपल्या नवीन फंक्शन मुळे ब्लैकबेरी इतका प्रसिद्ध झाला होता की दरवर्षी लाखो ब्लैकबेरी सेट विकले जात होते.

ब्लैकबेरीने ज्या स्पीडने मार्केटमध्ये आपले स्थान निर्माण केले जवळपास त्या स्पीडनेच ते मार्केटमधून गायबही झाले.

कित्येक वर्षांपासून ब्लैकबेरी एकाच डिझाईन वर काम करत होता ,तो आपले फंक्शन्स तर बदलत होता पण डिझाईन एकच होती. कुठे ना कुठे तरी ब्लैकबेरीची डिझाईन त्याची सगळ्यात मोठी कमजोरी बनली.

सन २००७ मध्ये आयफोन लाँच झाला आणि संपूर्ण जग टच स्क्रीन फोन कडे वळले. आणि ईथुनच सुरू झाली ब्लैकबेरीची अधोगती. ब्लैकबेरीने आयफोन आल्यानंतर कित्येक वर्ष स्वतःचे मार्केटमधील स्थान पक्के करण्याचा प्रयत्न केला परंतु, फोनची तिचं ती डिझाईन आणि आयफोनची वाढती क्रेझ यामुळे ब्लैकबेरी मार्केटमध्ये जास्त दिवस तग धरू शकली नाही.

त्यातच ब्लैकबेरीला आणखी खाली ढकलले ते अँड्रॉइड स्मार्टफोनने. मार्केटमध्ये अँड्रॉइड फोन  येताच ब्लैकबेरी पूर्ण पणे उध्वस्त झाला त्यानंतर कोणीही ब्लैकबेरी फोनला चालवू इच्छित नव्हता लोकांना तर नवीन टच स्क्रीन फोन हवा होता. ग्राहकांच्या मागणीला पाहून ब्लैकबेरीने आधी टच स्क्रीन आणि नंतर अँड्रॉइड व्हर्जन फोन काढले पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती ब्लैकबेरीचा पूर्ण मार्केट आता आयओएस आणि अँड्रॉइड ने हिसकावून घेतले होते.

काही नवीन हँडसेट काढून देखील ब्लैकबेरी स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकला नाही आणि ह्या सोबतच हळू हळू ब्लैकबेरी पूर्णपणे मार्केटमधून नष्ट झाली.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गंडा

सावधगिरी बाळगा जेव्हा तोंडामध्ये अशी लक्षणे दिसतील, तोंडाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here