आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

या गावातील लोक चालत चालत कुठेही झोपतात, कारण वाचून सगळेच होताहेत हैराण…


हे जग विचित्र आणि अकल्पनीय गोष्टींनी भरलेले आहे. जर तुम्ही जगातील विविध देश आणि समाजांचा अभ्यास केला तर तुम्हाला बऱ्याच नवीन आणि मनोरंजक गोष्टी कळतील.आज आम्ही तुम्हाला जगातील अशा अनोख्या आणि विचित्र गावाबद्दल सांगणार आहोत, जिथे लोक कधीही आणि कुठेही झोपतात. तसेच एकदा झोपल्यानंतर ते अनेक दिवस उठतही नाहीत. नक्की हे अस का होत? कोणते आहे हे गाव? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

या विचित्र गावाचे नाव कलाची आहे, जे कझाकिस्तानमध्ये आहे. या गावाबद्दल असे म्हटले जाते की या गावातील लोक कधीही आणि कुठेही झोपायला जातात आणि एकदा झोपल्यानंतर तर पुन्हा कधी उठतील याबद्दल कोणालाही अंदाज बांधता येत नाही.

sleeping village

new google

खर तर या सगळ्यामुळे एका आजाराचा प्रभाव असल्याचं म्हटलं जात. त्या आजारामुळेच गावातील लोकांना कधीही कुठेही झोप येते आणि ते झोपतात. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार या गूढ आजाराने कलाची तसेच क्रास्नोगोर्स्क नावाच्या एका गावाला वेठीस धरले आहे. या आजाराने ग्रस्त व्यक्ती सुमारे 6 दिवस झोपतात. ही दोन गावे उत्तर कझाकिस्तानमध्ये येतात.

या अहवालानुसार, या गूढ रोगाने दोन्ही गावांच्या 140 हून अधिक लोकसंख्येला वेठीस धरले आहे. येथे सुमारे 810 लोक राहतात, त्यापैकी बहुतेक रशियन आणि जर्मन आहेत.


हेही वाचा:

शीतयुद्ध भडकण्यापासून वाचवणारा हा गुप्तहेर पुढे सीआयएचा सर्वात मौल्यवान एजंट बनला होता.

बॉस्टन टी पार्टीविषयीचे हे 7 आच्छर्यकारक तथ्ये प्रत्येकांना माहिती असायलाच हवे…


या विचित्र आजाराने ग्रस्त व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपते. प्रभावित व्यक्ती बोलत किंवा चालतही नाही. त्याच वेळी जेव्हा एखादी व्यक्ती उठते तेव्हा त्याला काय झाले ते आठवत नाही.  त्याला अशक्तपणा जाणवतो आणि डोकेदुखी होते.

पीडित दिवसात 6 वेळा झोपू शकतो किंवा एकदा झोपल्यानंतर 6 दिवसांनी तो उठू शकतो.

हा रोग कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला प्रभावित करू शकतो. यामुळेच शाळेत शिकत असताना मुले झोपू लागतात. त्याचबरोबर असे देखील म्हटले जाते की झोपेच्या वेळी वाईट स्वप्ने देखील येतात. जसे की अंथरुणावर साप असणे किंवा कीटकांनी हात खाणे.

गाव

युरेनियमच्या खाणींमुळे हा सोन्याचा आजार पसरला असे मानले जाते. या प्रकरणाबाबत कझाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने सुमारे 7,000 घरांमध्ये रेडिएशन आणि हेवी मेटल चाचणी केली. काही घरांमध्ये रेडियमची पातळी दिसून आली, परंतु हे रोगाशी जोडले जाऊ शकत नाही असा अहवाल त्यांनी मांडला..

या रोगाचे कारण युरेनियमच्या खाणी नाहीत असे संशोधकांचे मत आहे. हा स्लीप डिसऑर्डर हवेत कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रोकार्बनच्या उच्च पातळीमुळे होऊ शकतो असा अंदाज त्यांनी बांधला परंतु नक्की कारण त्यांना आजूनही शोधता आलेलं नाहीये.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गंडा

सावधगिरी बाळगा जेव्हा तोंडामध्ये अशी लक्षणे दिसतील, तोंडाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो!

व्हीडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here