आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

===

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत जलद षटक टाकत रवींद्र जडेजाने नव्या विक्रमाला गवसणी घातलीय..


भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा चौथा कसोटी सामना अजूनही बरोबरीत आहे, भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स घेतल्या पण इंग्लंडच्या फलंदाजांनीही वेगवान धावा केल्या नंतर भारतीय सलामीवीर फलंदाजांनाही धावा मिळाल्या पण दरम्यान रवींद्र जडेजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

रवींद्र जडेजाने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात वेगवान गोलंदाजी केली आहे. होय, त्याने 50 वे षटक फक्त 64 सेकंदात पूर्ण केले.

रवींद्र जडेजा

new google

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा फिरकीपटू अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात वेगवान षटक फेकले आहे. जडेजाने खेळाचे 50 वे षटक ज्यात एकही धाव न देता फक्त 64 सेकंदात पूर्ण केले.

असे मानले जाते की फिरकीपटू षटक पटकन पूर्ण करतात पण जडेजाने याबाबतीत मात्र नवीन विक्रम बनवला आहे. ही त्याची ओव्हर मेडेन होती आणि मोईन अली समोर उभा होता जो एकही धाव करू शकला नाही.


हेही वाचा:

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

या 3 भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत विश्व चषक स्पर्धेतील ‘गोल्डन बॅट’ जिंकलीय..!


 

रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजाने आतापर्यंत मालिकेतील चारही सामने खेळले आहेत. ज्यात त्याने अर्धशतकासह 143 धावा केल्या आहेत आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यात आतापर्यंत जडेजाने फक्त एक विकेट घेतली आहे आणि ती होती मोईन अली. मालिकेत संघ व्यवस्थापनाने रविचंद्र अश्विनच्या आधी रवींद्र जडेजाला संघात संधी दिली आहे.

होय हे आश्चर्यकारक आहे, परंतु हे खरे आहे की आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये अश्विनला बेंचवर बसावे लागले आहे कारण संघ 4 वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू अर्थात जडेजासह मैदानावर आला आहे. वास्तविक, जडेजा फलंदाजीतही उत्कृष्ट कामगीरी करतोय जे त्याला प्राधान्य देण्याचे एक मोठे कारण आहे.

दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाकडे  171 धावांची आघाडी आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

व्हिडीओ प्लेलिस्ट:

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here