आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

अंगावर पाणी पडल्यावर तब्येत बिघडते म्हणून गेल्या 67 वर्षापासून या माणसाने अंघोळच केली नाही..


हे जगही विचित्र लोकांनी भरलेले आहे. काही लोकांचे केवळ छंदच नाहीत, सवयी देखील विचित्र आणि गरीब असतात.आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहोत ज्याने 1 किंवा 2 नाही तर गेल्या 67 वर्षांपासून आंघोळ केली नाही.

आंघोळ करणे तर दूरच त्याने आपल्या शरीरावर पाण्याचा थेंबही टाकला नाही. आमौ हाजी असे या व्यक्तीचे नाव आहे. इराणमध्ये राहणाऱ्या 87 वर्षीय हाजी यांना जगातील सर्वात घाणेरडा माणूस असेही म्हटले जाते.

आमो हाजीसमोर 1 मिनिट थांबणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे इतका तो घान दिसतो.

अंघोळ

new google

निरोगी राहणे मानवासाठी खूप महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. पण आमो हाजीसाठी स्वच्छता हे मृत्यूसारखे आहे. त्याचे म्हणणे आहे की जर त्याने त्याच्या शरीरावर पाण्याचा एक थेंब टाकला तर तो लगेच गंभीर असा आजारी पडतो.

वाचायला थोडस अवघड वाटत पण त्याचे हे बोलणे खरे आहे.अमौ हाजीला पाण्याची भीती वाटते, म्हणून त्याने असे जीवन निवडले ज्यात घाण वगळता काहीच नाही. अंगावर घाणेरडे कपडे, काळा चेहरा आणि अतिशय दुर्गंधीयुक्त शरीर अश्या अवतारात तो गेली अनेक वर्ष जगत आहे.

या व्यक्तीला पाहून लोक त्याच्या जवळ जाण्यासही कचरतात. हेच कारण आहे की तो लोकांपासून दूर इराणच्या वाळवंटात एकटाच राहतो. आमोला स्वतःचे घरही नाही. त्यामुळे तो गावाबाहेरच्या वाळवंटात तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये राहतो.


हेही वाचा:

शीतयुद्ध भडकण्यापासून वाचवणारा हा गुप्तहेर पुढे सीआयएचा सर्वात मौल्यवान एजंट बनला होता.

बॉस्टन टी पार्टीविषयीचे हे 7 आच्छर्यकारक तथ्ये प्रत्येकांना माहिती असायलाच हवे…


कुजलेले मांस खाण्याची सवय आहे.

दक्षिण इराणमधील देजगाह गावाच्या वाळवंटात राहणारा आमो हाजी आंघोळ करत नाही, तर दिवसातून 5 लिटर पाणी पितो. विश्रांतीसाठी स्वच्छ ठिकाणाऐवजी त्याला सर्वात दुर्गंधीयुक्त आणि घाणेरडी जागा आवडते. तो रात्री कोणत्याही खड्ड्यात झोपतात. हाजी ताज्या खाद्यपदार्थांचाही तिरस्कार करतो  म्हणूनच त्याला फक्त मृत प्राण्यांचे कुजलेले मांस खाण्याची सवय आहे.

आमो हाजी स्वतःला थंडीपासून वाचवण्यासाठी जुने हेल्मेट वापरतो. युद्धाच्या वेळी याचा वापर केला जात असे. अनेक वर्षांपासून हाजीच्या अंगावर एकच कपडा आहे. जो कोणी त्याला कपडे देतो तो त्याच्या जुन्या कपड्यांवर घालतो. यामुळे, त्याच्या शरीरावर कपड्यांचे जाड थर तयार झाले आहेत, जे त्याला थंडीपासून वाचवण्याचे काम करतात.

अंघोळ

आमो हाजीला धूम्रपान करायला आवडते. गावात कोणी सिगारेट दिली तर तो एकाच वेळी 5-5 सिगारेट ओढतो. पण जेव्हा हाजीकडे सिगारेट किंवा तंबाखू नसते तेव्हा तो प्राण्यांच्या विष्ठेतून धूम्रपान करणे पसंत करतो. यासाठी तो गंजलेला पाईप वापरतो.

आमो हाजी म्हणतो की, त्याने गेल्या 67 वर्षांपासून आंघोळ केली नाही. अगदी पाण्याला स्पर्शही केलेला नाही. जर त्याने  आंघोळ केली तर तो आजारी पडतो. जरतो इतके दिवस जगू शकला तर याचे कारण ते स्वतःला घाणेरडे ठेवतो म्हणूनच अस त्याचं म्हणण आहे.

आमो हाजीच्या आधी भारतातील कैलास सिंह यांच्याकडे जगात सर्वात जास्त काळ आंघोळ न करण्याचा विक्रम होता. कैलाशने 38 वर्षे आंघोळ केली नव्हती.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गंडा

सावधगिरी बाळगा जेव्हा तोंडामध्ये अशी लक्षणे दिसतील, तोंडाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो!

व्हीडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here