आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

रँडचा वध करत इंग्रजांविरुद्ध पुण्यातून क्रांतीची सुरवात चाफेकर बंधूनी केली होती..


चाफेकर बंधू हे आद्यक्रांतिकारी होते. वासुदेव चाफेकर व त्यांचे बंधू भारतीय क्रांतिकारकामध्ये गणले जातात. इतिहासात बरेच असे क्रांतिकारक होऊन गेले त्या पैकीच एक वासुदेव चाफेकर आणि त्यांचे बंधू वासुदेव चाफेकरांचा जन्म १८८० ला झाला तर दामोदर चाफेकर यांचा जन्म २४ जून १८६९ ला झाला व बाळकृष्ण चाफेकर यांचा जन्म १८७३ मध्ये या तीनही भावांचा जन्म कोकणात एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला.

 चाफेकर बंधू

त्यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला. वासुदेव चाफेकर यांनी दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.

new google

पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणार्‍या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती.

या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. त्याच वेळी पुण्यात १९व्या शतकाअखेरीस पुण्यात प्लेगने थैमान घातले होते प्लेगला आळा घालण्याच्या निमित्ताने विल्यम चार्ल्स रॅन्ड या बिटिश अधिकार्‍याने लोकांचा छळ केला. लोकांची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद्र वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे अशा त्याच्या क्रूर आणि अमानवी कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. चाफेकर बंधूंच्या मनात या अन्यायामुळे मनात सूडाची ठिणगी पडली आणि आग धगधगू लागली.

• रँडचा वध

राष्ट्र आणि धर्मप्रेमाच्या या जाज्वल्य भावनेतूनच चाफेकरबंधू रॅंडच्या विरोधात पेटून उठले. रॅंडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रॅंडवर जवळून गोळ्या झाडल्या. रॅंड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेले.

कित्येक दिवस ब्रिटिशांना मारेकऱ्यांचा शोध लागत नव्हता. शेवटी पंचमस्तंभि द्रविड बंधूनी या कटाची बातमी केवळ आर्थिक लाभपोटी (20,000रु च्या) सरकारला दिली. वासुदेव चाफेकर व महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंना ठार केले. तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले व तीनही चाफेकर बंधू शहीद झाले.

चाफेकर बंधू

दामोदर चाफेकरांच्या फाशीपूर्व अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चाफेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्यांनंतर सावरकरांनी चाफेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :

भक्ष्य रॅंड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥

ही कविता लिहिली त्यावेळी सावरकरांचे वय १५ वर्षे होते.

चाफेकर बंधू एका सामान्य कुटुंबातील तीनही भाऊ ज्यांना राष्ट्र आणि धर्मा विषयी अत्यंत निष्ठा व प्रेम आहे. जे आपल्या राष्ट्र व धर्माचे रक्षण करण्यासाठी पुढे चालून आले व त्यांनी कोणताही विचार केला नाही. याचे परिणाम काय होतील व त्यांचं पुढे काय होईल, त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या राष्ट्राचा आणि धर्माचा विचार केला व राष्ट्रासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. सगळ्यांना आपल्या ह्या बलिदानातून प्रेरणा देणारे हे तीनही भाऊ “चाफेकर बंधू “जे आपल्या कायम स्मरणात राहतील.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यरच्या जागी ‘या’ अष्टपैलू  खेळाडूला निवडलय….! 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here