आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आपल्या सर्वांना नेहमीच दूरदर्शन पाहण्याची आवड आहे. बदलत्या जगामध्ये दूरचित्रवाणीचा आकार बदलला असला तरी आपल्या सर्वांच्या त्या दशकाशी संबंधित अनेक आठवणी आहेत. ज्या वेळी दूरदर्शन ब्लॅक अँड व्हाइटच्या युगातून बाहेर पडत होते आणि रंगांच्या जगात येत होते.

जुन्या टीव्हीवर लागल्या जाणाऱ्या सर्व जुन्या जाहिराती जरी जास्त प्रसिद्ध नसल्या तरी एक जाहिरात मात्र आजही लोकांच्या मनात घर करून आहे. ती म्हणजे वॉशिंग पावडर निरमा.

 ज्यामध्ये एक पांढरा फ्रॉक घातलेली मुलगी गोल गोल फिरताना दिसत असे.

new google

करसनभाई पटेल


 

जरी आजच्या काळात आपण आपले कपडे धुण्यासाठी महाग साबण महाग डिटर्जंट वापरत असलो  तरीपण एक काळ असा होता जेव्हा संपूर्ण भारतात डिटर्जंट पावडरचे वर्चस्व होते. निरमा पावडरचे संस्थापक करसनभाई पटेल ज्यांनी 1980 च्या दशकात निरमा पावडर लाँच केली ज्यामुळे ते भारतभर पहिली पसंती बनले होते.

त्याकाळी  हिंदुस्थान लीव्हर लिमिटेड (हिंदुस्तान युनिलिव्हर) चे डिटर्जंट ‘सर्फ’ संपूर्ण भारतभर डिटर्जंट पाऊटरच्या जगावर राज्य करत होते. गरीब ते श्रीमंत कुटुंबातील सर्वच लोक सर्फ वापरत असत ते आपले कपडे चमकवायला याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या डिटर्जंटची किंमत 10 ते 15 रुपये दरम्यान होती. म्हणूनच तो अत्यंत कमी काळात लोकांची पसंद बनला.


हेही वाचा:

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

या 3 भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत विश्व चषक स्पर्धेतील ‘गोल्डन बॅट’ जिंकलीय..!


हा डिटर्जंट हातांना इजा न करता कपड्यांवरील डाग काढून टाकण्यासाठी वापरला जात असे. तसेच त्यावेळी देशात चालणाऱ्या इतर साबणांपेक्षा तो सर्वांत चांगला होता.

त्या वेळी करसनभाई पटेल यांनी गुजरात सरकारच्या खाण आणि भूशास्त्र विभागात रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले होते.  नेहमी डिटर्जंटच्या जगात प्रवेश करावा अशी त्यांची इच्छा होती. शिवाय मध्यमवर्गीय लोकांना परवडेल अशे पावडर तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

याच कारणामुळे त्यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथील  घराच्या अंगणात डिटर्जंट पावडर बनवण्याचा निर्णय घेतला. त्याचे एकमेव कारण असे होते की त्या वेळी त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते शिवाय त्यांना त्या पावडरची किंमतही जास्त वाढवायची नव्हती म्हणून कमीत कमी खर्चात पावडर तयार करण्याचा त्यांचा माणस होता. या दरम्यान अंगणात काम करत त्यांनी पहिल्यांदा पिवळ्या कलरची डिटजेन्ट पावडर बनवली. जी बाजारात केवळ १० रुपयांना विकण्यास सुरवात केली.

स्वस्तात मस्त असलेल्या आणि कपड्यांवर असरदार ठरणाऱ्या पावडरला अत्यंत कमी काळातच लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला.

चांगला प्रतिसाद पाहून त्यांनी पावडरचे नाव ‘निरमा’असे  ठेवले. पावडरच्या पॅकिंगवर असलेले मुलीचे छायाचित्र हे त्यांच्या स्वतःच्या मुलीचे होते. त्यांच्या मुलीचे नाव निरुपमा होते. जिचा  एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता याच कारणामुळे करसनभाई पटेल यांनी आपल्या डिटर्जंटला ‘निरमा पावडर’ नाव देण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीच्या काळात कार्सभाई पटेल त्याच्या पावडरचा प्रचार करण्यासाठी त्याच्या घराच्या आजूबाजूच्या घरात जात असत. तिथल्या लोकांना पावडर वापरण्यासाठी वाटले जात असे. यासह ते लोकांना  हमी देखील देत असत की जर पावडर काम करत नसेल तर त्यांचे पैसे परत केले जातील.

परवडणाऱ्या दरात उत्तम दर्जाची ही निरमा पावडर काही दिवसात अहमदाबादमध्ये ब्रँडेड वॉशिंग पावडर बनली. हेच कारण होते ज्यामुळे करसनभाई पटेल यांनी नोकरी सोडली आणि पावडरचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी एक योजना बनवली.

लोकांची पसंती बनलेल्या निरमा पावडरने संपूर्ण अहमदाबादची पसंत ठरलेला निरमा हळूहळू संपूर्ण भारताच्या बाजारपेठेत आपला ठसा उमटवू लागला.

या दरम्यान त्यांनी “सबकी पसंद निरमा” नावाची एक जाहिरात तयार केले. ज्यामध्ये पांढऱ्या फ्रॉक असलेल्या मुलीने देशातील प्रत्येक दूरदर्शनवर वर्चस्व गाजवले. भारतीय बाजारात हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची स्पर्धा होती. मात्र जेव्हा करसनभाई पटेल यांची बाजारपेठ वाढू लागली त्याचवेळी त्यांनी बाजारात आपल्या उत्पादनाचा पुरवठा बंद केला.

एकीकडे मागणी वाढत होती. दुसरीकडे निरमा पावडरने बाजारात येणे बंद केले होते. जेव्हा जेव्हा लोक दुकानात   डिटर्जंट पावडर घेण्यासाठी जात असत  तेव्हा तेव्हा त्यांना रिकाम्या हातानी वापस यावे लागत असे. यामुळेच किरकोळ विक्रेत्यांनी स्वतः करसनभाई पटेल यांना त्यांच्या उत्पादनांचा बाजारात पुरवठा पुन्हा सुरू करण्याची विनंती केली.

करसनभाई पटेल

त्यांची ही मागणी लक्षात घेत करसनभाई पटेल यांनी पुन्हा उत्पादन सुरु केले आणि लवकरच निरमा पावडर भारतातील प्रत्येक घरात पोहोचली मागणी इतकी वाढली की निरमा पावडरने विक्रीच्या बाबतीत सर्व जुन्या कंपन्यांना मागे टाकले. वाढत्या मागणीमुळे करसनभाई पटेल यांनी डिटर्जंट पावडर सोबतच टॉयलेट साबण, टूथपेस्ट, साबण बाजारात आणले.

या काळात त्यांची काही उत्पादनेच यशस्वी होऊ शकली. पण निरमा पावडरची विक्रीच्या बाबतीत कुणीही बरोबरी करू शकले नाही. हेच कारण आहे आजही या साबणाचा वाटा 20% आणि डिटर्जंट पावडर 35% टक्क्यांपर्यंत आहे.

या सर्व घडामोडींमध्ये करसनभाई पटेल यांनी 1995 मध्ये अहमदाबादमध्ये त्यांची कंपनी सुरू केली. या कंपनीचे नाव निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असे ठेवले गेले. त्यानंतर फक्त आठ वर्षांनी 2003 मध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि निरमा युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची स्थापना केली.

या सगळ्याशिवाय अनेक संस्थांकडून पटेल यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जिथे 2010 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्याचबरोबर फोर्ब्स मासिकाच्या 2009 आणि 2017 मध्ये भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले.

त्यांनी सिद्ध केले की, एक ब्रँड बनण्यापूर्वी, एक गरज बनणे आवश्यक आहे. जर तुम्ही गरज बनलात तर स्वतः लोकच तुम्हाला ब्रँड बनवतील.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here