आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

अयोध्यामधील या मुलाने वयाच्या 12 व्या वर्षी चक्क 135 पुस्तके लिहून काढलेत…!


बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आपल्या इकडे लहानपणापासूनच प्रसिद्ध आहे. अर्थात तो मुलगा कसा असेल किंवा समोर जाऊन कसा वागेल याबद्दल केलेल्या निरीक्षणावरून हे बोलले जाते. म्हणजेच आशादायक मुलाची चिन्हे लहानपणापासूनच दिसतात.

असेच एक आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय प्रकरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. एका मुलाने अगदी लहान वयात 135 पुस्तके लिहिली आहेत.

new google

होय, हे खर आहे. ज्या वयात इतर मुले पुस्तके वाचण्यास सुद्धा कंटाळा करतात. त्या वयात या मुलाने हा पराक्रम करून प्रसिद्ध लेखक बनण्याची इच्छा दर्शवली आहे.

12 साल की उम्र में इस बच्चे ने लिखी 135 किताबें, सीएम योगी की जीवनी भी शामिल

वयाच्या 12 व्या वर्षी त्याने एक नव्हे,दोन नव्हे तर तब्बल 135 पुस्तके लिहली आहेत. मुख्य म्हणजे या पुस्तकांत उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथजी यांच  चरित्र सुद्धा समाविष्ट आहे.

आजकाल मीडियांनी उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्याचे हे प्रकरण चांगलेच व्हायरल केले आहे.वयाच्या 12 व्या वर्षी या मुलाने विश्वविक्रमात आपले नाव नोंदवले आहे. यूपीच्या या 12 वर्षांच्या मुलाच्या कारनाम्यांनी प्रत्येकजण हैराण झाला आहे. अयोध्येत राहणाऱ्या 12 वर्षीय मृगेंद्र राजाने हा पराक्रम केला आहे. जो लेखक म्हणून ‘आज का अभिमन्यू’ हे नाव वापरतो. म्हणजेच त्याचे खरे नाव मृगेंद्र आणि लेखक म्हणून अभिमन्यू हे नाव आहे.


हेही वाचा:

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

या 3 भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत विश्व चषक स्पर्धेतील ‘गोल्डन बॅट’ जिंकलीय..!


12 वर्षीय मृगेंद्र उर्फ ​​अभिमन्यूच्या कारनाम्यांमुळे संपूर्ण लेखक जगतात खळबळ उडाली आहे. या मुलाचे आश्चर्यकारक कारनामे पाहून बड्या लेखकांनाही आच्छर्य वाटत आहे.एवढेच नाही तर मृगेंद्र उर्फ ​​अभिमन्यूने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांचे चरित्र लिहून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता मृगेंद्रकडे एकूण चार विश्वविक्रम आहेत.पुस्तक

मृगेंद्र याने माध्यमांच्या संवादात सांगितले की त्याने वयाच्या 6 व्या वर्षी पुस्तके लिहायला सुरुवात केली. त्याचे पहिले पुस्तक म्हणजे कवितासंग्रह. तो ‘आजचा अभिमन्यू’ हे नाव आपल्या पुस्तकावर वापरतो. त्याच्या नावावर आधीच चार विश्वविक्रम आहेत. सुलतानपूरच्या एका खासगी शाळेत शिकवणाऱ्या त्याच्या आईने सांगितले की तिच्या मुलाने लहानपणी अभ्यासामध्ये रस दाखवला होता ज्यामुळे तिने त्याला प्रोत्साहन दिले.

मृगेंद्रचे वडील राज्यातील साखर उद्योग आणि ऊस विकास विभागात काम करतात. मृगेंद्र म्हणाला की तो मोठा झाल्यावर त्याला लेखकच बनून राहायचे आहे आणि विविध विषयांवर अधिकाधिक पुस्तके लिहायची आहेत. मृगेंद्र उर्फ ​​अभिमन्यू म्हणाला मी रामायणातील 51 वर्णांचे विश्लेषण केल्यानंतर पुस्तके लिहिली आहेत. माझे प्रत्येक पुस्तक सुमारे 25 ते 100 पानांचे आहे. मला लंडनमधील वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ रेकॉर्ड्सकडून डॉक्टरेटसाठी ऑफर देखील मिळाली आहे.

मृगेंद्रने लहान वयात केलेली ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. येत्या काही वेळात तो नक्कीच एक प्रसिद्ध लेखक बनेल  असा त्याला आत्मविश्वास आहे..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here