आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या तीन बड्या खेळाडूंना विश्वचषक संघात न निवडून निवड समितीने सर्वांनाच आच्छर्यचकित केलंय…


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी संध्याकाळी भारतीय टी -20 विश्वचषक संघाची घोषणा केली. 2017 मध्ये भारतासाठी शेवटचा वनडे सामना खेळणारा वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा सूर्यकुमार यादव, इशान किशन, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीसह टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 15 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

सूर्यकुमार यादव, किशन आणि चक्रवर्ती यांना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल आणि त्यांना भारतीय संघाकडे असलेल्या काही संधींचे सोने करण्यासाठी संधी देण्यात आली आहे.मात्र असे काही खेळाडू आहेत ज्यांना संघात स्थान द्यायचे होते पण त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. शिखर धवन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हे काही खेळाडू आहेत जे टी-20 विश्वचषक स्पर्धेत संघाचा सदस्य होण्याचे दावेदार होते परंतु निवड समितीने त्यांच्याकडे साफ  दुर्लक्ष केलय.

चला तर जाणून घेऊया नक्की या खेळाडूंची निवड का करायला हवी होती.


हेही वाचा:

new google

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

या 3 भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत विश्व चषक स्पर्धेतील ‘गोल्डन बॅट’ जिंकलीय..!


युझवेंद्र चहल: भारतीय फिरकीपटू, युझवेंद्र चहलला 2021 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संघातून वगळण्यात आले आहे. युझवेंद्र चहलला या वर्षी टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघातून वगळणे हे केवळ चाहत्यांनाच नाही तर स्वतः चहलसाठीही मोठे आच्छर्य बनले आहे. आजूनही त्याचा या निर्णयांवर विश्वासच बसत नाहीये.

2018 पासून मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारताचा नंबर 1 फिरकीपटू असलेल्या चहलला टी 20 विश्वचषक 2021 साठी 15 जणांच्या संघात स्थान मिळाले नाही. उलट रविचंद्रन अश्विन अक्षर पटेल आणि राहुल चहर यांची निवड झाली. एक पर्याय म्हणून फिरकी गोलंदाजीत रवींद्र जडेजासह वरुण चक्रवर्तीचीही निवड करण्यात आली.

खेळाडू

भारताच्या टी -20 विश्वचषक संघातून युजवेंद्र चहलला वगळण्यामागचे कारण मुख्य भारतीय निवड समितीने उघड केले. निवड समितीच्या मते संघात वेगवान गोलंदाजांची आवश्यकता होती त्यामुळे आम्ही चहलच्या जागी राहुल चाहरला संघात संधी दिलीय.

हे जरी काही प्रमाणात खर असलं तरीही चहलच्या चाहत्यांना मात्र हा निर्णय आजीबात पटलेला नाहीये.

शिखर धवन: धवनने अलीकडेच श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व केले जिथे भारताने एकदिवसीय मालिका जिंकली पण टी -20 मालिका गमावली. भारतीय मंडळाने असेही निरीक्षण केले की रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली हे संघातून सलामीवीर म्हणून निवडण्यासाठी पुरेसे पर्याय आहेत आणि त्यांनी घरच्या इंग्लंड मालिकेदरम्यान फक्त एक टी -20 खेळलेल्या धवनचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला.

शिवाय नियमित रित्या सध्या रोहित आणि राहुल संघाची सुरवात करतात त्यांना चांगला अनुभव असून त्यांच्याकडून धावाही निघत आहेत त्यामुळे निवड समितीने त्यांनाच निवडले आणि धवनची संधी थोडक्यात हुकली.

असं असलं तरी अंतरराष्ट्रीय  मालिकेसाठी कर्णधार असलेल्या धवनची संघात निवड न होणे त्याच्या चाहत्यांना आवडले नाहीये.

असेही एक कारण असू शकते की श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचे नेतृत्व करणारा नियमित सलामीवीर शिखर धवन लहान फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही, ज्यामुळे त्याची निवड झाली नाही.

कुलदीप यादव: चहलसोबत कुलदीप यादवची भारताच्या टी -20 विश्वचषक संघात निवड झाली नाही. अलीकडच्या काळात मिस्ट्री स्पिनरचा आत्मविश्वास खरोखरच कमी झाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये संघासोबत असूनही कुलदीप सातत्यपूर्ण क्रिकेट खेळलेला नाही.

त्याच्या आयपीएल फ्रँचायझी केकेआरनेही त्याला त्याच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी अनेक सामने दिले नाहीत. चहल आणि कुलदीप दोघांनाही न निवडल्यामुळे 2017पासून चालत आलेली ही जोडी आता मैदानावर पुन्हा एकत्र दिसणार का नाही हा एक मोठा प्रश्न बनला आहे..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here