या कारणामुळे शिखर धवनला टी-20 विश्वचषक संघात संधी मिळाली नाहीये….


बीसीसीआयने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये होणाऱ्या आयसीसी पुरुषांच्या टी 20 विश्वचषक 2021 साठी टीम इंडियाची निवड केली पण डावखुरा सलामीवीर शिखर धवनची या संघात निवड न होणे सर्वांसाठी अछार्याचा धक्का मानला जातोय.

जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यात धवनने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. पण यावेळी मात्र चक्क त्याला संघात स्थान सुद्धा मिळाले नाहीये. अगदी राखीव खेळाडूमधेही त्याचं नाव नाहीये. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्याच्या जागी 23 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला संधी दिल्याचं म्हटलं जातंय.

शिखर धवन

संघाच्या घोषणेसाठी आभासी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना धवनच्या नावावर चर्चा झाली आणि तो संघात का निवडला गेला नाही यावर स्वतः आता निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी खुलासा केला आहे.

ते म्हणाले, शिखर धवन हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे तो श्रीलंका दौऱ्यात कर्णधार होता. त्याच्यावर काय चर्चा झाली हे मी सांगू शकत नाही,परंतु तो भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.

new google

हेही वाचा:

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

या 3 भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत विश्व चषक स्पर्धेतील ‘गोल्डन बॅट’ जिंकलीय..!


टी -20 खेळाडू म्हणून वर्षानुवर्षे विशेषत: सातत्य आणि त्याच्या स्ट्राईक रेटमध्ये सुधारणा करणाऱ्या धवनने राष्ट्रीय टी -20 संघात नियमितपणे स्थान मिळवले नाही कारण केएल राहुल आणि रोहित शर्मा हे सर्वात कमी षटकाच्या फॉरमॅटमध्ये आवडते सलामीवीर झाले आहेत.

धवनला स्थान का मिळाले नाही याविषयी सविस्तर सांगताना शर्मा म्हणाले, दुसऱ्या खेळाडूकडे पाहणे आणि शिखर धवनला विश्रांती देणे ही काळाची गरज होती अन्यथा युवा खेळाडूंवर प्रेशर येईल. त्यांना संधी मिळणे गरजेचे होते. धवन लवकरच  भारतीय संघात पुनरागमन करेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केवळ धवनच नाही तर त्याचा दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहकारी श्रेयस अय्यरही विश्वचषक संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलाय. पण त्याला राखीव खेळाडूंमध्ये जागा बनवता आलीय.

जोपर्यंत गोलंदाजी विभागाचा संबंध आहे समितीने त्यांच्या स्ट्राइक गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली  तर चौथा सीम पर्याय म्हणून अष्टपैलू हार्दिक पंड्याची निवड केली.

शिखर धवन

याबद्दल बोलताना चेतन शर्मा म्हणाला की तीन वेगवान गोलंदाजांसोबत जाण्याचा निर्णय पूर्णपणे यूएईमध्ये त्यांनी मिळवलेल्या विकेटच्या संख्येवर आधारित होता.

जेव्हा विकेट्स मंद असे असतात (तुम्ही फक्त दोन वेगवान गोलंदाज खेळत असाल, त्यामुळे अतिरिक्त वेगवान गोलंदाज निवडून त्याला बेंचवर ठेवण्यात काहीच अर्थ नाही. त्याऐवजी तुम्ही फिरकीपटू किंवा अष्टपैलूसारखा उपयुक्त खेळाडू निवडा जो त्या परिस्थितीत अधिक उपयुक्त ठरेल.

टीम इंडियाने टी -20 विश्वचषकासाठी आपल्या संघात पाच फिरकी गोलंदाजांची निवड केली ज्यात रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

टी-२० विश्वचषकाची सुरवात 17ऑक्टोबर होत आहे..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here