आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

11/9 च्या दहशतवादी हल्ल्यात क्रिकेटपटू नेझम हाफिजला जीव गमवावा लागला होता…


जगभरात आजपर्यंत अनेक दहशदवादी संघटनांनी अनेक शहरांवर अतिरेकी हल्ले घडवून आणले आहेत. ज्यात प्रामुख्याने अमेरिकेवरील ११ सप्टेंबर 2001साली झालेला दहशदवादी हल्ला येतो. हा हल्ला एवढा भयंकर होता की याचे पडसात देशभरात उमटले  गेले होते, ज्यामुळे देशभरातूनदहशदवाद्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली होती..

हजारो नागरिक मृत्युमुखी पडलेला हा हल्ला आठवताच आजही अमेरिकन नागरिकांच्या काळजाचा थरकाप होतो. या हल्ल्यात सामान्य नागरिकांसह अनेक मोठे व्यक्तीही मृत्युला सामोरी गेले होते.

new google

नेझम हाफिज

ज्यात अमेरिकन क्रिकेट संघाचा उपकर्णधार असलेल्या नेझम हाफिजला देखील आपला जीव गमवावा लागला होता.. हाफिजने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवर वनच्या 94 व्या मजल्यावर मार्श आणि मॅक्लेनन कंपनीसाठी काम केले होता..


हेही वाचा:

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

या 3 भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत विश्व चषक स्पर्धेतील ‘गोल्डन बॅट’ जिंकलीय..!


हाफिजने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत सहा आणि लिस्ट ए मध्ये तीन सामने खेळले.

हाफिजचा जन्म 21 एप्रिल 1969 रोजी गयाना येथे झाला. कनिष्ठ स्तरावरील क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर तो 1988 मध्ये नॉर्दर्न टेलिकॉम युवा स्पर्धेत गयाना अंडर -19 संघाचा कर्णधार बनला. संपूर्ण वेस्ट इंडिजमधील अनेक संघ या स्पर्धेत खेळत होते.

त्याच्या नेतृत्वाखाली गयानाचा पहिला सामना त्रिनिदाद आणि तबॅगो विरुद्ध होता आणि त्या संघाचा कर्णधार ब्रायन लारा होता. हाफिजने 8 आणि 25 धावा केल्या होत्या तर लारा 0 धावांवर बाद झाला होता.

नेझम हाफिज

1992 मध्ये हाफिज त्याचे आईवडील आणि दोन मोठ्या बहिणींसोबत न्यूयॉर्कला गेला. पण तिथेही त्याचे क्रिकेटवरील प्रेम कमी झाले नाही. तो अमेरिकन क्रिकेट सोसायटी क्लब संघात (ACS) सामील झाला आणि राष्ट्रकुल क्रिकेट लीगमध्ये खेळला. जे अमेरिकेतील सर्वात मोठ्या लीगपैकी एक आहे आणि त्यात 60 पेक्षा जास्त संघ खेळतात. त्याच्या संघात असताना एसीएस संघ पुढील 9 हंगामात सात वेळा चॅम्पियन बनला.

त्याच्या क्लबसाठी उत्कृष्ट कामगिरीमुळे हाफिज अमेरिकन क्रिकेट संघाचा उपकर्णधार बनला. वर्ष 2001 मध्ये कॅनडा दौऱ्यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. अमेरिका त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धाव घेण्याच्या अगदी जवळ होती आणि हाफिज अमेरिकेचा कर्णधार होण्याच्या दावेदारांपैकी एक होता.

अमेरिकेने 2004 मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पात्रता मिळवली होती ज्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या मजबूत संघांशी स्पर्धा केली होती.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here