आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

मुंबईतील साकीनाका बलात्कार माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार ठरलाय…


मुंबईत निर्घृण बलात्कार झालेल्या 34 वर्षीय महिलेची शेवटी प्राणजोत मावळली आहे. तिचे मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात निधन झाले आहे. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे आज (11 सप्टेंबर, शनिवार) दुपारी 12 वाजता मृत्यू झाला आहे. काल (10 सप्टेंबर, शुक्रवार) मुंबईतील अंधेरी येथे असलेल्या साकीनाका येथे मोहन चौहान नावाच्या नराधमाने बलात्कार केला आणि महिलेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घातला होता.

बलात्कार

new google

या निर्दयी आणि रानटी व्यक्तीला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक केली आहे. ज्या टेम्पोमध्ये बलात्कार झाला तो देखील जप्त करण्यात आला आहे.

कालच बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला. आरोपींविरुद्ध भादंवि कलम 307 आणि 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलीस (मुंबई पोलीस) आयपीसीच्या कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करणार आहे.


हेही वाचा:

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

या 3 भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत विश्व चषक स्पर्धेतील ‘गोल्डन बॅट’ जिंकलीय..!


या विषयावर बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  म्हणाले की, मुंबईसारख्या शहरात अशी घटना घडते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे? गुन्हेगारी मानसिकतेच्या लोकांच्या मनात कायदा आणि सुव्यवस्थेची भीती संपली आहे.

राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे आणि मनीषा कायंदे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. नीलम गोर्‍हे म्हणाल्या की, निर्भया प्रकरणानंतर कायद्यात कडकपणा आणला गेला अशी प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवण्याची व्यवस्था करण्यात आली पण तरीही अशा लोकांची मानसिकता बदलली नाही. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी  प्रतिक्रिया दिली आहे की लोकांमध्ये एवढी क्रूर मानसिकता कशी काय येऊ शकते हेच समजत नाहीये.

बलात्कार

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारासारखी घटना शुक्रवारी मुंबईच्या अंधेरीच्या साकीनाका परिसरात उघडकीस आली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोच्या आत 34 वर्षीय महिलेवर बलात्कार झाला. यासोबतच तिच्या प्रायव्हेट पार्टवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, महिलेसोबतची हिंसक घटना 2012 च्या ‘निर्भया’ प्रकरणाची आठवण करून देते. आरोपी मोहन चौहानला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी पोलिस नियंत्रण कक्षाला फोनद्वारे कळवण्यात आले की, खैरानी रोडवर एक पुरुष एका महिलेला निर्घृणपणे मारत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर घटनास्थळावरून रक्ताने माखलेल्या अवस्थेत महिलेला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासात महिलेसोबत बलात्काराची पुष्टी झाली. बलात्कारानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये निर्दयीपणे लोखंडी रॉड टाकण्यात आला यामुळे जास्त रक्तस्त्राव झाला. आज (शनिवार) महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

एकंदरीत या सर्व प्रकारामुळे राज्यात महिला किती सुरक्षित आहेत याबद्दल साशंकता उपस्थित केली जात आहे.. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी केली जातेय..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here