आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

दुसऱ्या महायुद्धात शत्रूला पराभूत करण्यासाठी या देशाच्या सैनिकांनी भलत्याच युक्त्या वापरल्या होत्या..


असे म्हटले जाते की प्रेम आणि युद्धात सर्वकाही सामान्य आहे. कोणतेही नियम नाहीत, निर्बंध नाहीत. शत्रूला पराभूत करण्यासाठी किंवा हृदय जिंकण्यासाठी जे करावे लागेल ते कमी आहे. तुम्ही अनेक वेळा लोकांनी प्रेमात सर्व मर्यादा ओलांडल्याच्या कथा वाचल्या असतील. पण आज आम्ही इतिहासाच्या पानातील अश्या काही युद्धाबद्दल बोलणार आहोत जे लढतांना सुद्धा सैनिकांनी सर्व गोष्टींची मर्यादा ओलांडली होती. मग ते छळ करणे असो अथवा युद्धाच्या नियमाच्या बाहेर जाऊन युद्ध करणे असो.

भीषण युद्धात बहुतेक देशांच्या सैन्याने आपले लाखो सैनिक गमावले आहेत. प्रत्येक देशाचा इतिहास रक्ताने लिहिलेला आहे. तरीही यातील काही युद्धे अशे आहेत जे सैनिकांच्या चतुराईने जिंकेल गेले होते. युद्धादरम्यान शत्रूला भ्रमित करून सुद्धा काही देशाच्या सैनिकांनी युद्ध जिंकले होते. त्यातीलच हे काही उदाहरणे..

new google

युद्धा

 

युद्धभूमीत विमानाची प्रतिकृती तयार करून सैनिकांना केले भ्रमित..


हेही वाचा… करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक


जेव्हा फसवणूकीचा प्रश्न येतो तेव्हा बहुतेक उदाहरणे दुसऱ्या महायुद्धादरम्यानची दिसतात. या काळात जपान आणि अमेरिका यांच्यात युद्ध झाले. या दरम्यान दोन्ही देशांच्या सैन्याने एकमेकांची जोरदार फसवणूक केली होती.

तसेच जपानी सैन्याने जिंकण्यासाठी धूर्ततेची मदत घेतली. जपानी सैन्याने बनावट बॉम्बर विमानांचे मॉडेल युद्धभूमीत ठेवून अमेरिकेच्या सैन्यांना भयभीत केले होते. या विमानावर गवत टाकून ते युद्धभूमीत आणि जंगलात अनेक ठिकाणी ठेवण्यात आले होते ज्यामुळे अमेरिकी सैन्यांना त्या युद्ध विमानात खरोखर शस्त्रसाठ्यासह सैनिक आहेत असे वाटले. परिणामी अमेरिकन सैन्य त्या बाजूला पुढे जाण्यास भीती बाळगत होते.

शिवाय असे अनेक विमान आसपासच्या जागेत उभे केल्यामुळे अमेरिकेच्या वायुदलाला वाटले जपानने आपले युद्ध विमाने येथे जमा केली आहेत. आणि त्यांनी याच विमानावर आपले बॉम्ब टाकले परिणामी अमेरिकेच्या वायुदलाची जेथे गरज होती ते तिथपर्यत न पोहचता रिकामे होऊन माघारी पलटले.

The World War II “Wonder Drug” That Never Left Japan | Essay | Zócalo Public Square

दुसरी युक्ती म्हणजे रिक्त एअरफील्ड जमिनीवर अमेरिकन बी -29 विमानांचे मोठे चित्र रंगवणे.

एअरफील्ड जमिनीवर हे असे चित्र रंगवले गेले होते की जेव्हा आकाशातून पाहिले तेव्हा असे दिसायचे की टाकीच्या इंजिनला आग लागली आहे.

परिणामी, अमेरिकन  पायलटला अशे वाटायचे की त्यांच्या युद्धविमानाचा काही भाग खराब होऊन त्याला आग लागली आहे.

जपानच्या या योजना पाहता नंतर अमेरिकेनेही एक योजना आखली होती. ती म्हणजे फुग्यापासून बनवलेले हवाई गस्त पथके.

जपानी सैन्य जेथे आपली वाटचाल करत होती तिथे अमेरिका मागे कसे राहू शकले असते? जपानी लोकांकडून धडा घेत अमेरिकेनेही एक पाऊल टाकले आणि यूएस आर्मीच्या 23 व्या स्पेशल ट्रुप्स मुख्यालयाने एक योजना तयार केली.

त्यासाठी तोफ आणि हवाई पथकासारखे फुगे बनवण्यात आले. रेडिओ प्रसारण सुद्धा तयर करण्यात आले आणि  सैनिकांचा आवाज रेकॉर्ड केला गेला  आणि नंतर हे  संपूर्ण पथक जंगलात एका ठिकाणी ठेवण्यात आले. जिथे रेडीओ द्वारे सैनिकांचा आवाज चालू ठेवला.

असे करण्यामागे एकच योजना होती ती म्हणजे जपानी सैन्यांना असे वाटावे की त्याठिकाणी अमेरिकी सैन्याची मोठी तुकडी तैनात आहे. ज्यामुळे जपानी सैनिक त्यांच्या दिशेने हल्ला करण्यास जातील आणि  नंतर लपून बसललेले अमेरिकी सैनिक त्यांच्यावर बॉम्ब टाकतील.

अमेरिकेची ही योजनाही चांगलीच यशस्वी झाली होती..

सैन्याच्या या छद्म स्वरूपाला इतिहासात ‘घोस्ट आर्मी’ असे म्हटले गेले.

बनावट शहरे बनवून वाचवली खरे शहरे.

दुसऱ्या महायुद्धात घडलेल्या ‘ऑपरेशन स्टारफिश’बद्दल अनेक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु या ऑपरेशनचा सर्वात मनोरंजक भाग म्हणजे सैनिकांचा विश्वासघात. ज्याद्वारे ब्रिटिश सैन्याने आपली अनेक शहरे आणि गावे शत्रूंच्या नजरेपासून वाचवली. ऑपरेशन स्टार फिश अंतर्गत साऊथ सिटी फिल्म स्टुडिओचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.

फिल्मसिटीमध्ये बनावट टाक्या,तोफ, दारुगोळा,  तयार करण्यात आला. इमारती आणि मुख्यालयाचे संच तयार करण्यात आले. हे सर्व फिल्मसिटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे जमले होते की दर्शकांना वाटेल की हे देशातील मुख्य शहर आहे.

सेट तयार करणाऱ्या कलाकारांनी विमानतळ, जहाजे आणि अशी बनावट वाहने तयार केली होती जी पूर्णपणे मूळ दिसत होती. विशेषतः हवाई दलासाठी त्यांना जमिनीवर ओळखणे अशक्य होते.

शत्रू सैन्याची विमाने आकाशात तरंगताना दिसताच कलाकारांनी स्वतःचे सेट पेटवून दिले. शत्रूंना वाटले की इथे आधीच युद्ध सुरू आहे. आणि ते तिथे हल्ला करण्याएवजी समोर निघून गेले.

असे म्हटले जाते की या बनावट शहरामुळे अनेक खरी शहरे वाचवण्यात यश आले होते..

नौदल सैनिकांनी केला होता दक्षिण भाषेचा उपयोग.

सैनिकांच्या बुद्धिमत्तेबद्दल बोलतांना भारतीय सैन्याचा उल्लेख न करणे हे कसे होऊ शकते? भारतीय सैनिकांच्या मानसिक जादूचे उत्तम उदाहरण म्हणजे 1971 चे भारत-पाकिस्तान युद्ध. यादरम्यान भारतीय नौदलाने पाण्याच्या युद्धात पाकिस्तानी सैन्याला पराभवाचा चेहरा दाखवला होता. तेही जेव्हा पाकिस्तानी नौदल भारतीय सैन्यापेक्षा अधिक शक्तिशाली होते.

हे युद्ध नौदलाने आपल्या सामर्थ्यापेक्षा अधिक मनाने जिंकले. खरे तर कराचीवर बॉम्बस्फोट करताना भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्र नौका एकमेकांशी रशियन भाषेत संवाद साधत होत्या.

युद्ध

असा असायचा की पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याचा संवाद पकडला असता पण ते समजू शकले नाही. पाकिस्तानी सैन्याला वाटले की हा सिग्नल दुर्गम अरबी समुद्रातील रशियन नौदलाचा आहे जे अमेरिकन सैन्याविरुद्धच्या रणनीतीवर चर्चा करत आहेत.

या व्यतिरिक्त भारतीय लष्कराने दक्षिण भारतीय रेडिओ प्रसारण कर्मचाऱ्यांना ठिकठिकाणी तैनात केले. दक्षिण भारतीय भाषांमधील सैनिकांचे संवाद पाकिस्तानी सैन्याला समजले नाहीत.

परिणामी, भारतीय लष्कराने आपल्या शत्रूंचे अड्डे सहज नष्ट केले.

तसे पाहता युद्धात गोंधळ  निर्माण करणे आणि शत्रूंना पराभूत करणे हा भारतीय सैन्यासाठी नवीन प्रयोग नव्हता. मराठा सैन्याने या ज्ञानाचा भरपूर वापर केला. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखान विरुद्धच्या  युद्धात एक विशेष युक्ती स्वीकारली होती. बैलांच्या शिंगांना बांधलेल्या मशाल घेऊन ते रात्री निघून गेले. ज्यामुळे शत्रूंना मराठ्यांची प्रचंड फौज असल्याचा भ्रम झाला.

विजापूर आणि कुतुब शाहीच्या लढाई दरम्यान, मराठ्यांनी डोंगरात वेगवेगळ्या बाजूंनी छोट्या गटात हल्ला केला. ज्यामुळे शत्रूंना वाटले की मराठ्यांच्या जड सैन्याने त्यांना चारही बाजूंनी घेरले आहे.

मेवाडच्या सैनिकांनीही  मराठ्यांच्या दोन पावले पुढे जाऊन असाच पराक्रम गाजवला होता. त्यांच्याकडे बैलाएवजी घोडे होते..


आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here