आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

गुजरातचा हा चोर सवय जात नाही म्हणून गाड्या चोरी करायचा आणि लोकांना वापरायला द्यायचा..


आजपर्यत तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील. काही सिनेमात सुद्धा हटके स्टाईलच्या चोरीच्या घटनाही पहिल्या असतीलच..परंतु आज आम्ही  तुम्हाला अश्या एका चोरबद्दल सांगणार आहोत ज्याची चोरी करण्याची पद्धत आणि कारण जानून तुम्हीही डोक्याला हात मारून घ्याल..

गुजरातमधील पंचमहाल येथील पोलिसांनी अरविंद नावाच्या एका चोराला अटक केली होती. त्याची चौकशी केली असता तो जवळपास 1996 पासून गाड्यांच्या चोऱ्या करत असल्याचं सिद्ध झालंय. महत्वाच म्हणजे यातील निम्या चोऱ्या ह्या त्याने टाईमपास म्हणून केल्या आहेत. त्याच्याकडून सध्या  19 दुचाकी जप्त केल्या गेल्या आहेत.

new google

 चोर

49 वर्षीय अरविंद याच भागात चोरी करतांना रंगेहात पोलिसांच्या हाती लागला होता..


हेही वाचा…

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक


1996 पासून तो दुचाकी चोरत असल्याचे चौकशीत उघडकीस आले. यापूर्वीही पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अरविंद याला दारूच्या सवयीचा तीव्र परिणाम झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी मेहसानाच्या या व्यक्तीवर अनेकदा खटले दाखल झाले पण तो त्यातून जामिनावर सुटला होता.

या चोराने गेल्या वीस वर्षांत 1,500 दुचाकींची चोरी केली आहे. पोलिस चौकशीत त्याने सांगितले की आपल्याला गुन्हेगारीचे जग सोडून जायचे आहे परंतु समाजाच्या वागण्याने त्याला या जगातून बाहेर येऊ दिले नाही.

पोलिसांनी सांगितले की, बुधवारी अरविंदकुमार जयंतीलाल दुचाकी चोरताना पोलिसांच्या हाती लागला.  गोध्रा येथे तपासणी दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली. तो महेसाना येथील लुणवा गावचा आहे. 1996 पासून तो दुचाकी चोरत असल्याचे त्याने चौकशीकर्त्यांना सांगितले. गेल्या वर्षी दिवाळीपासून त्याने 19 बाईक चोरी केल्या आहेत. यापूर्वीही त्याला अटक करण्यात आली होती.

चोर

आपल्या जबाबात बोलतांना अरविंदकुमार म्हणाला की, मला हे  चोरीच काम बऱ्याच दिवसापूर्वी सोडून द्यायचं होत. परंतु लोकांच्या काही गोष्टीमुळे मी हे काम सोडू शकलो नाही. मी नेहमीच स्वतःसाठी चोरी केलेली नाहीये असंही तो म्हणाला..

जेव्हा पोलिसांनी अधिक तपास केला तेव्हा त्यांना 19 गाड्या जप्त केल्या ज्या या चोरांनी लोकांना वापरण्यासाठी फुकट दिल्या होत्या. आपली चोरीची सवय जात नाही म्हणून तो गाड्या चोरायचा आणि ज्यांना गरज आहे अश्या लोकांना “माझी आहे तू वापर” असं सांगत त्यांना वापरण्यास द्यायचा. ज्यांच्याकड गाड्या सापडल्या त्यांनीही या गोष्टीला दुजोरा  दिला आहे..

त्यामुळे एकंदरीत त्याच्या मानसिक स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी पोलिसांनी पुढील हालचाली सुरु केल्या होत्या. परंतू  अलंग स्टाईलने आणि युनिक कारणामुळे चोरी करणारा हा चोर चांगलाच चर्चेचा विषय बनला होता..


आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here