आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

बिहारच्या दोन विद्यार्थ्यांच्या खात्यात आलेल्या 960 करोड रुपयांचं आणि सोनू सूदचं खरचं काही कनेक्शन आहे का?


काहीच दिवसापूर्वी बॉलीवूड स्टार अभिनेता सोनू सूदच्या घरावर व इतर मालमत्तेवर आयकर विभागाकडून तपासणी केली गेली होती. यामागे महत्वाचा मुद्दा म्हणजे सोनू सूदने लॉकडाऊन मध्ये  लोकांच्या मदतीसाठी वापरलेला पैसा. सोनू सूद कडे किती आणि कुठे पैसा आहे व तो कसा वापरतो व वेळोवेळी सरकारला टॅक्स भरतो का नाही हे पाहण्यासाठीच छापा टाकण्यात आका होता. ज्यात केल्या गेलेल्या चौकशी अंती सोनू सूद ने 20 करोडहून अधिक रुपयांचा टॅक्स घोटाळा केल्याच म्हटलं गेलं आहे.

त्यानंतर आता सोनू सूदचे नाव आणखी एका प्रकरणात घेतले जात आहे. ज्यामुळे कदाचित सोनूच्या अडचणी वाढू शकतात.

new google

सोनू सूद

बिहारमध्ये दोन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अचानक 960 कोटी रुपये जमा झाल्याच्या प्रकरणानंतर भूतकाळात बराच गदारोळ झाला होता. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील आजमनगरमधील पास्टिया गावातील दोन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये अचानक 960 कोटी रुपये जमा झाले. गुरुचरण विश्वास आणि असित कुमार 15 सप्टेंबर रोजी त्यांच्या इंडसइंड बँक खात्याची तपासणी करण्यासाठी गेले होते जेव्हा त्यांना याची माहिती मिळाली. त्याचवेळी आयकर विभागाने मुंबईतील अभिनेता सोनू सूदच्या घरावर  छापा टाकला.


हेही वाचा…

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक


बिहारच्या कटिहारमध्ये राहणारे दोन विद्यार्थी जेव्हा इंडसइंड बँकेच्या लोकसेवा केंद्रात गेले आणि त्यांची खाती तपासली, तेव्हा त्यांना आढळले की स्पाइस मनी कंपनीच्या पोर्टलचा वापर त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जात आहे. अभिनेता सोनू सूद या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

या कंपनीत सोनू सूदची मोठी भूमिका आहे म्हणूनच प्रश्न निर्माण झाला आहे की सोनू सूदचा मुंबईपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या कटिहारच्या बँक खात्याच्या व्यवहाराशी काही संबंध नाही? या संपूर्ण प्रकरणात जिल्हा दंडाधिकारी उदयन मिश्रा यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

दोन्ही विद्यार्थ्यांच्या खात्यात अचानक झालेल्या या व्यवहारामध्ये सायबर क्राईमशी संबंधित प्रकरण बनवले जाते अशी शंका बँक व्यवस्थापक एम के मधुकर यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणी बँकेने स्पष्टीकरणही दिले आहे. आता इंडसइंड बँकेशी संबंधित लोकांचीही चौकशीमध्ये चौकशी केली जात आहे. मात्र सध्या हे प्रकरण सोनू सूदशी संबंधित असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

सोनू सूद

दरम्यान सोनू सूदला कानपूरच्या श्रीमंत गटाशी कनेक्शन मिळण्याची चर्चा ऐरणीवर आली आहे. जिथे असे म्हटले जात आहे की बनावट कर्ज घेऊन सोनू सूदवर पैसे गुंतवण्याचे प्रकरण समोर आले आहे. आयकर विभागाचे अधिकारी श्रीमंत समूहाच्या परिसरात सतत छापे घालत आहेत. अशा स्थितीत सोनू सूदशी संबंधित आर्थिक तपास देखील सध्या जोरात सुरू आहे. या छापे दरम्यान,आयकर विभागाला बोगस पावत्या देण्याचे आणि ते विकण्याचे संकेत मिळाले आहेत आणि कंपनीने संचालक म्हणून स्वतःच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचाही पर्दाफाश केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीमध्ये तीन भाऊ आहेत ज्यांची नावे तात्वेश अग्रवाल, आशेश अग्रवाल आणि शाश्वत अग्रवाल आहेत. छापेमारी दरम्यानआयकर टीमला कळले आहे की आणखी 15 कंपन्या देखील त्याच्याशी संबंधित आहेत. ज्या पूर्णपणे बनावट आहेत.

एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरून अभिनेता सोनू सूद याचा काही संबंध आहे का? मुलांच्या खात्यात आलेले 960 कोटी कोणाचे आहेत?  सोनू सूद ब्रांड अम्बेसीटर असलेल्या कंपनीतूनच हे पैसे कसे काय ट्रान्सफर करण्यात आले. अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या शोधली जात आहेत.

या प्रकरणामुळे मात्र गरीबांचा मसीहा समजल्या जाणारा सोनु सूद थोडासा तरी अडचणीत सापडलाय हे मात्र खर..


आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here