आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

कोलकत्ताकडून मोठी हार मिळाल्याने आरसीबी भलतीच ट्रोल होतेय, पहा सोशल मिडियावरील भन्नाट मिम्स..


आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा  वाईट पद्धतीने पराभव केला. आणि पहिल्या टप्प्यातील पराभवाचा बदला घेतला. मात्र या सामन्यात विराट कोहलीची टीम कोविड आघाडीच्या कार्यकर्त्याच्या समर्थनार्थ निळ्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानावर आली आणि लोकांची मने जिंकली. चाहत्यांना अपेक्षा होती की संघ मैदानावरही चांगली कामगिरी करेल. पण हे घडले नाही आणि आरसीबीचे सर्व फलंदाज कोलकात्याच्या गोलंदाजांसमोर असहाय्य दिसले.


हेही वाचा…

new google

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक


 

नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीच्या संघातील एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि अवघ्या 92 धावा केल्यावर संपूर्ण संघ बाद झाला. अनुभवी फलंदाज डिव्हिलियर्स आपले खातेही उघडू शकला नाही मग तोच कर्णधार कोहली 5 आणि बिग शो ग्लेन मॅक्सवेल फक्त 10 धावा करू शकला. देवदत्त पडिकलने संघासाठी सर्वाधिक 22 धावा केल्या. तर वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी कोलकात्याच्या बाजूने 3-3 बळी घेतले.

आरसीबीचे गोलंदाजही काही चमत्कार करू शकले नाहीत

93 धावांचे लक्ष्य हे तसे मोठे लक्ष्य नव्हते. पण कोलकाताचे दोन्ही सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी त्यांच्या फलंदाजीने हे लक्ष्य अगदीच शुल्लक बनवून टाकले.  दोन्ही फलंदाजांनी मिळून बंगळुरूच्या सर्व गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला आणि पहिल्या विकेटसाठी 81 धावा जोडल्याआणि कोलकात्याने हा सामना फक्त 10 षटकांत 9 गडी राखून जिंकला. यजुवेंद्र चहलने संघासाठी एकमेव विकेट घेतली.

आरसीबी

यानंतर मात्र आरसीबी ट्वीटरवर चांगलीच ट्रोल झाली. लोकांनी अतिशय भन्नाट असे मिम्स शेअर करत आरसीबीच्या सर्वच खेळाडूंना ट्रोल केले.. त्यातील काही भन्नाट मिम्स खालीलप्रमाणे…

आरसिबी जुन्या फॉर्ममध्ये वापस….

आरसीबी  चाहते आरसिबी संघाला..

Buy 1 Get 1 offer.

 

 

 

====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here