आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

या 5 कारणामुळे पुढच्या हंगामात राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनला संघाच्याबाहेर काढू शकतो….


राजस्थान रॉयल्सने जेव्हा आयपीएल लिलावापूर्वी कर्णधार स्टीव्ह स्मिथला सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांना बेन स्टोक्स किंवा जोस बटलर संघाच्या नव्या कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारण्याची अपेक्षा होती. एका तासाच्या आत त्यांचा नवा कर्णधार निवडला गेला आणि भारतीय युवा फलंदाज संजू सॅमसन कर्णधार झाला..

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सॅमसनची निराशाजनक खेळी श्रीलंकेविरुद्धच्या सर्वात अलीकडच्या टी -20 मालिकेत सुरू राहिली जेव्हा तो तीन सामन्यांमध्ये 27, 7 आणि 0 धावसंख्या करून परतला.

new google

 संजू सॅमसन

तो मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यात अयशस्वी झाला. आयपीएलमध्येहीत्याचा फॉर्म तेवढा विशेष नाहीये… जर सॅमसनला पुढील लिलावात कायम ठेवले नाही तर ते धक्कादायक ठरणार नाही.


हेही वाचा…

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक


आजच्या लेखात आपण त्या 5 कारणाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे कदाचित येणाऱ्या हंगामात राजस्थान रॉयल्स संजू सॅमसनला संघातून बाहेर काढू शकतो..

खराब फॉर्म: सॅमसनची फलंदाजी बऱ्याच काळापासून साधारण आहे. श्रीलंका विरुद्ध आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये, त्याने संघर्ष केला. आयपीएलमध्ये तो तितकाच दमदार होता. अनेक समर्थकांना वाटले की त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली आहे तर काहींनी असा अंदाज लावला की त्याच्या विसंगतीमुळे त्याला वारंवार हानी पोहचली ज्यामुळे त्याला त्याची जागापक्क्की करता आलेली नाहीये..

कर्णधार म्हणून अपयश: हंगामाच्या सुरुवातीपासून राजस्थान रॉयल्सचा चांगला खेळ झालेला नाही फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही ठिकाणी संघ खराब खेळत आहे. संघाच्या खराब कामगिरीला कारणीभूत ठरत असलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे कर्णधाराची योग्य निर्णय घेण्याची क्षमता. लोकांच आणि क्रिकेट परीक्षकांची मत जाणून घेतले तर बहुतांश लोकांच म्हणने आहे की, संजू सॅमसन योग्य त्या वेळी योग्य तो निर्णय घेण्यास अपयशी ठरल्याच म्हटल गेल.

कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात अपयशी: संजू सॅमसनची कथा नेहमी सारखीच राहिली आहे कारण आयपीएल 2021 मध्ये शानदार सुरुवात केल्यानंतर तो खेळाडू लुप्त होतो. तो त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात अपयशी ठरला आणि कुप्रसिद्ध सॉफ्ट डिसमिसलचा बळी ठरला. गौतम गंभीर आणि सुनील गावस्कर सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी अलीकडेच सॅमसनच्या कामगिरीमध्ये सातत्य राखण्यात अपयशी ठरण्याबद्दल बोलले जात आहे..

संजू सैमसन

राजस्थान रॉयल्सला नवीन स्टारची गरज : बर्‍याच चाहत्यांना आणि तज्ञांना वाटते की राजस्थान रॉयल्सला नवीन भारतीय नेतृत्वाची गरज आहे. त्यांच्याकडे राहुल तेवाटिया आणि रियान परागसारखे काही युवा खेळाडू आहेत पण ते पुरेसे नाहीत. त्यांचा सध्याचा कर्णधार संजू सॅमसन आपल्या खेळात सातत्य राखण्यात अपयशी ठरतोय. त्यामुळे सध्या रोयल्सला आपल्या खेळाने गेम बदलणारा एक तरून खेळाडूची गरज आहे.. त्याच्या शोधातच राजस्थान रॉयल्स संजूला पुढील हंगामात कायम कऋ शकत नाही.

दबाव हाताळू शकत नाही: हे स्पष्ट आहे की संजू सॅमसन दबाव हाताळू शकत नाही. तो राष्ट्रीय संघासाठी आणि आयपीएलमध्ये मोठ्या प्रसंगी फलंदाजीत अपयशी ठरला आहे. तो त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत विसंगत होता. एक कर्णधार म्हणून त्याची निर्णयक्षमता बर्‍याच वेळा खराब राहिली ज्यामुळे त्याच्या संघाला किंमत मोजावी लागली.

त्याच्या खेळ योजना संशयास्पद आहेत आणि अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी त्यावर टीका केली आहे. राजस्थान रॉयल्सला नुकसानीच्या विहिरीत बुडण्यापासून वाचवण्यासाठी सॅमसनला खेळात लवकरात लवकर सुधारणा करण्याची गरज आहे अन्यथा रॉयल्स संजूला कर्णधार पदावरून तर काढूच शकतो शिवाय संघातून बाहेर होण्याचीही वेळ येऊ शकते.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here