आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

खरचं ओमप्रकाश मिश्रामुळे न्यूझीलंड संघाने पाकिस्तानचा दौरा रद्द केला?


जेव्हापासून न्यूझीलंड संघाने आयत्या वेळी क्रिकेट खेळण्यास नकार देत मालिका रद्द केली तेव्हापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा तिळपापड होत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अगोदार न्यूझीलंड बोर्डाला यासाठी जिम्मेदार धरत होते. त्यांच्यानुसार सुरक्षेच्या सर्व सुविधा आणि हमी देऊनसुद्धा न्यूझीलंडने मुद्दाम सिरीज रद्द केली.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही यावर आपले मत व्यक्त केले आहे.

 

पाकिस्तानने यानंतर बीसीसीआयवर आरोप केले आणि आता ओम प्रकाश मिश्रा नावाच्या भारतीय तरुणाला यासाठी जिम्मेदार ठरवले जात आहे.

पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, भारतीय तरूण ओमप्रकाश मिश्रा याने फेक मेलं आयडी  तयार करून मार्टिन गप्टिलच्या पत्नीला धमकीचे मेलं पाठवले. ज्यामुळे न्यूझीलंड संघाने घाबरून पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास नकार दिला.

न्यूझीलंड संघाला धमकीचे मेल पाठवण्यासाठी हमजा आफ्रिदी नावाचा बनावट आयडी तयार करण्यात आल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे. फवाद चौधरी म्हणाले, मेल सिंगापूरमध्ये त्याचे स्थान दर्शवत व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) द्वारे पाठवण्यात आले. डिव्हाइसवर आणखी 13 आयडी होते, त्यापैकी बहुतेक नावे ही भारतीय होते.


हेही वाचा…

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक


कोण आहे ओमप्रकाश मिश्रा?

फवाद चौधरी यांनी वक्तव्य केल्यापासून ओम प्रकाश मिश्राचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

2017 मध्ये आलेल्या “बोल ना आंटी आऊ क्या घंटी में बजाऊ क्या” या गाण्याने सोशल मिडीयावर चांगलच वातावरण तयर केलं होत. आता पाकिस्तान त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तान नागरिक सध्या सोशल मिडीयावर ओमप्रकाशच्या गाण्याचे जुने फोटो मेमे बनवून टाकत आहेत. महत्वाच म्हणजे ओमप्रकाशनेच मेलं केले असल्याचं पाकिस्तान सांगत आहे.

ओमप्रकाश मिश्रा

त्यामुळे न्यूझीलंड -पाकिस्तान मालिका खरच ओमप्रकाश मिश्रामुळे रद्द झाली का? असा प्रश उपस्थित होत आहे..

17 सप्टेंबर रोजी न्यूझीलंड संघाने पाकिस्तानमधील एकदिवसीय सामन्यापूर्वी पाकिस्तान दौरा रद्द केला. न्यूझीलंड संघाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाने नाणेफेक होण्याच्या काही वेळापूर्वीच मैदानावर जाण्यास नकार दिला होता आणि त्यानंतर दौरा रद्द केला जात असल्याचे वृत्त आले होते.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here