आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

6500रु महिन्याने काम करणारा गुजरातचा हा तरून आज वार्षिक10 कोटींची उलाढाल करतोय..


आज अनेक युवा नोकरीच्या मागे लागत आहेत. परंतु देशात काही असेही लोक आहेत ज्यांनी करोडो रुपयांच्या नोकऱ्या सोडून स्वतःचा व्यवसाय उभारला आणि त्यात यशस्वी झाले.आम्ही असं म्हणत नाहीयेत की सर्वच जन आपली नोकरी सोडून द्या पण जर तुमच्यातही काही स्कील असतील  तर त्यांना प्रोत्साहनही तुम्हालाच द्यावे लागेल.

अशीच काहीसी कहाणी आहे गुजरातच्या सुरत येथील रहिवासी असलेल्या कृणाल रयानी याची.’जिथे इच्छा असेल तिथे मार्ग आहे’, जर धैर्य असेल तर माणूस काय करू शकत नाही? याचच उत्तर देत कृणालने आपलं नाव कमावलं आहे.

Trending Story Krunal Raiyani c

सुरत येथील रहिवासी कृणाल रयानी यांनी आयुष्यात अशी नीतिसूत्रे खरी ठरवली आहेत जो एकेकाळी फक्त 6500ची नोकरी करायचा पण आज तो  10 कोटींची वार्षिक उलाढाल करणाऱ्या कंपनीचा मालक आहे.

2015 मध्ये, जेव्हा कृणाल 18 वर्षांचा होता तेव्हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने 6500 रुपयांमध्ये मार्केटिंगची नोकरी करण्यास सुरुवात केली. पण आज त्यांची कंपनी इतरांना यापेक्षा जास्त पगार देत आहे.


हेही वाचा…

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक


क्रुणालने बाजार व्यवसाय आणि नोकरीचा अनुभव त्याच्याकंपनीत उपयोगी आणला यानंतर त्याला वाटले की आपली ई-कॉमर्स कंपनी आणि व्यवसाय लहान स्तरापासून सुरू करता येतो. पण व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याच्याकडे निधी नव्हता. कृणाल सामान्य कुटुंबातून होता आणि कोणतेही मित्र ,जवळचे नातेवाईकही  त्याच्या मदतीसाठी येत नसत.

आयुष्याच्या त्या छोट्या टप्प्यात अनेक चढउतारांच्या दरम्यान कृणालच्या मामाचा पुतण्यावर विश्वास होता. यासाठी काका किरीट भाईंकडून मदत घेण्यात आली. अशाप्रकारे 2015 मध्ये 2 लाख रुपयांनी व्यवसायाची सुरुवात झाली ज्याचा परिणाम आज 6 वर्षानंतर 10 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या कंपनीच्या रूपात आहे.

कोटी

एका गुजराती न्यूज वेबसाईटनुसार यंग बिझनेसमन आणि अचीव्हर क्रुनाल यांनी चार जणांसह आपले काम अर्थात कंपनी सुरू केली. ज्यात एक तो स्वतः दुसरा त्याचे काका किरीट आणि इतर दोन लोक त्याच्या खाली काम पाहत असत. आज 110 कर्मचारी त्यांच्यासोबत काम करतात.

कृणाल यांच्या कंपनीने शेकडो लोकांना मोफत प्रशिक्षण दिले आहे. त्यांची कंपनी मेक इन इंडिय व्होकल फॉर लोकल सारख्या विषयांवर वेगाने काम करत आहे. कृणालच्या कंपनीचे दरवाजे प्रतिभावानांसाठी खुले आहेत. आज त्यांच्या कंपनीची देशातील अनेक राज्यांमध्ये गोदामे आहेत. त्याच्या कंपनीने बनवलेले कपडे परदेशात पुरवले जातात.

अचूक नियोजन आणि ठाम इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक संकटावर मात करत यशस्वी होता येत हेच कृणालने आज दाखवून दिले आहे. कृणाल म्हणतो जर मी स्वतःवर भरोसा केला नसता तर आज मीही कोणत्यातरी कंपनीत 10/12हजार रुपये महिन्यावर काम करत बसलो असतो.

स्वतःवर विश्वास ठेवायला शिका कारण तोच तुम्हाला जिंकण्याच्या जवळ नेत असतो असही कृणाल न चुकता सांगतो.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here