आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

गुजरातच्या शेतकऱ्याची ही मुलगी देशातील सर्वांत तरुण कॉमर्शियल पायलट बनलीय…


आजच्या घडीला स्त्री कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी राहिलेली नाहीये. जगभरात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताहेत आणि आपलनाव कमवत आहेत.

विविध क्षेत्रात आपलं नाव कमावणाऱ्या महिलांच्या या यादित आता आणखी एका मुलीचे नाव जोडले गेले आहे.जिने अविश्वसनीय अशी कामगिरी केली आहे.या मुलीच नाव आहे मैत्री पटेल.

new google

गुजरातच्या सुरतमधील राहणारी असलेली मैत्री पटेल ही सर्वांत तरून वयाची विमान  पायलट बनली आहे. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी तिने ही कामगिरी करत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे..

Maitri Patel: पिता किसान हैं, बेटी ने देश की सबसे कम उम्र की कमर्शियल पायलट बनकर रौशन किया नाम

हे यश मिळवल्यापासून मैत्री पटेलच्या चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहेत. मैत्री पटेल ही एका शेतकरी कुटुंबातील आहे. आणि लहानपणापासूनच तिने स्वत: ला वैमानिक म्हणून तयार करण्यास सुरुवात केली होती. यासाठी तिने अमेरिकेत प्रशिक्षण घेतले आणि 18 महिन्यांचा कोर्स अवघ्या 11 महिन्यांत पूर्ण केला. त्यानंतर मैत्री पटेलला विमानाचा परवाना मिळाला.


हेही वाचा…

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक

रागाच्या भरात खेळाडूच्या कानाखाली मारल्यामुळे मांजरेकरांना आपली नोकरी गमवावी लागली होती.

कोण आहे मैत्री पटेल?

सुरतमध्ये राहणारी मैत्री पटेल ही अवघ्या 19वर्षाची आहे. मैत्री पटेलला लहानपणापासूनच पायलट व्हायचे होते. तिने मेटास अॅडव्हेंटिस्ट स्कूलमधून शिक्षण घेतले. येथे मैत्री पटेलने 12 वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतरच पायलट होण्याचे प्रशिक्षण घ्यायला सुरवात केली होती.

मैत्री पटेलच्या वडिलांबद्दल बोलायचं झालं तर ते एक शेतकरी आहेत आणि सुरत महानगरपालिकेतही काम करतात. याशिवाय मैत्री पटेलची आई सुरत महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करते.

पायलट

मैत्री पटेल जेव्हा फक्त 8 वर्षांची होती तेव्हा तिने विमान पाहिले आणि तेव्हापासून ती पायलट होईल हे तिचे स्वप्न होते आणि शेवटी तिने हे स्वप्न पूर्ण केले. मैत्री पटेलच्या वडिलांचे नाव कांतीलाल पटेल आहे. त्यांनी मैत्रीला एवढे मोठे स्वप्न पाहण्यापासून कधीही रोखले नाही आणि फ्लाइट ट्रेनिंग स्कूलमध्ये तिला प्रवेश मिळवण्यासाठी आपली जमीन विकली.

आता मैत्री पटेलने पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करून तिच्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिला बोईंग विमान उडवायचे आहे आणि यासाठी तिचे प्रशिक्षण लवकरच सुरू होईल.

ज्या वयात तरुण तरुणी विमानात बसण्याचे स्वप्न पाहतात त्याच वयात मैत्रीने विमान उडवण्याचे स्वप्न पहिले होते जे आता लवकरच साकार होणार आहे. मैत्रीच्या या कामगिरीमुळे अवघ्या देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे..


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here