आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

विराट कोहलीनंतर या तीन खेळाडूपैकी एकजन कर्णधार बनून आरसीबीला जिंकून देऊ शकतो आयपीएलचे जेतेपद.


आजपर्यंत एकदाही आयपीएलचा खिताब आपल्या नावावर न करू शकलेल्या संघांपैकी एक असलेला आरसीबी संघ आपल्या वाईट वेळातून जात आहे. आयपीएलच्या सुरवातीपासूनच विराट कोहलीच्या हातात कमान असलेल्या या संघाची कामगिरी अतिशय सुमार राहिली आहे. विराटच्या नेतृत्वात संघाला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आले नाहीये.

इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या  हंगामानंतर कोहलीने   आरसीबी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. तेव्हा विराट कोहलीनंतर आरसिबीची कमान कोणाच्या हातात येणार? कोण करेल संघाचे नेतृत्व असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत..

new google

हेही वाचा…

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक


भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकरांना असे वाटते की किरोन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि डेव्हिड वॉर्नर हे असे खेळाडू आहेत ज्यांना आरसीबी विराट कोहलीचा उत्तराधिकारी म्हणून पाहू शकतो. येणाऱ्या ऑक्शन मध्ये हे तिन्ही खेळाडू जवळपास बोली लावण्यासाठी उपलब्ध असतील त्यामुळे आरसीबी यांच्यापैकी एकावर बोली लावून त्यांना आपल्या संघात दाखल करून घेऊ शकते. असं झालं तर विराटच्या नेतृत्वात सुमार कामगिरी करणाऱ्या संघाला एक नवा कर्णधार मिळेल ज्याच्याकडून संघाला खूप अपेक्षा असतील..

विराट कोहली

किरॉन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव हे मुंबई इंडियन्सच्या सेटअपचे प्रमुख सदस्य आहेत आणि बऱ्याच काळापासून फ्रँचायझीसोबत आहेत. पाच वेळा चॅम्पियन असलेली मुंबई त्यांच्या प्रमुख खेळाडूंना फ्रँचायझी सोडू देईल अस वाटत नाही . त्यामुळे नक्कीच मुंबईऑक्शन मध्ये पोलार्ड आणि सूर्यावर बोली लावणार. त्यामुळे या दोघांना कोण आपल्या संघात घेत हे पाहणेही रंजक ठरणार आहे.

जर पोलार्ड आणि सूर्या दोघेही आरसीबीमध्ये सहभागी होऊ शकले नाही तर डेव्हिड वॉर्नर हा आणखी एक पर्याय असू शकतो. वॉर्नरला अलीकडेच सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून काढून टाकण्यात आले आणि फ्रँचायझी त्याला कायम ठेवणार नाही अशी शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावर बोली लावून आरसीबी त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद देऊ शकते.

विराट कोहली

अनुक्रमे केकेआर आणि सीएसकेविरुद्ध पराभूत होऊनआरसीबीने संयुक्त अरब अमिरातीच्या लेगमध्ये खराब सुरुवात केली आहसीएसकेविरुद्धच्या पराभवानंतर कोहलीने गोलंदाजांना सातत्य नसल्याबद्दल फटकारले.

आजूनही आरसीबीच्या प्लेऑफ साठीच्या आशा संपल्या नाहीयेत. चांगली कामगिरी करून  पुढील 2/3सामने सलग जिंकल्यास आरसीबी नक्कीच प्लेऑफमध्ये पोहचू शकते पण त्यासाठी त्यांच्या कामगिरीत सातत्य हवं आहे..


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here