आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सांगलीच्या बाळू लोखंडे यांची खुर्ची इंग्लंडच्या रेस्टोरंटपर्यंत कशी पोहोचली?


मराठी माणसाने अटकेपार झेंडे रोवले हे वाक्य महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांनी ऐकले आहे. इतिहासातील या पराक्रमाची प्रेरणा घेत अनेक मराठी माणसांनी साता समुद्रापार परदेशातही आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. सध्या सोशल मीडियावर सांगलीचे बाळू लोखंडे यांची चर्चा सुरू आहे. मात्र, ही चर्चा वेगळ्या कारणांनी सुरू आहे. बाळू लोखंडे यांची लोखंडी खुर्ची मँचेस्टर येथील एका रेस्टोरंटबाहेर दिसून आली. सांगलीतील ही खुर्ची इंग्लंडमध्ये गेली कशी, याबाबत नेटकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे.

ज्येष्ठ पत्रकार सुनंदन लेले यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. सुनंदन लेले हे मँनेस्टरमधील अल्ट्रिक्म भागात फिरत असताना त्यांना एका रेस्टोरंटच्या परिसरात एक लोखंडी खुर्ची दिसली. ही खुर्ची पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला असल्याचे लेले यांनी सांगितले. या खुर्चीच्या मागे ‘बाळू लोखंडे, सावळज’ असं मराठीत लिहिण्यात आले होते. त्यामुळे चक्क मराठी माणसाची खुर्ची इंग्लंडमध्ये कशी पोहचली, याबाबत नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

बाळू लोखंडे

कोण आहेत बाळू लोखंडे?

ओमकार माळी या ट्विटर युजरच्या माहितीप्रमाणे, बाळू लोखंडे हे त्यांच्या मूळ गावातील मंडप डेकोरशनच्या व्यवसायात आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. सांगलीच्या सावळज गावातही ही खुर्ची इंग्लंडमध्ये कशी पोहचली यावर चर्चा सुरू झाली आहे.हेही वाचा…

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक

रागाच्या भरात खेळाडूच्या कानाखाली मारल्यामुळे मांजरेकरांना आपली नोकरी गमवावी लागली होती.


सोशल मीडियावर नेटकरी काय म्हणतात?

सुनंदन लेले यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काही युजर्सने ब्रिटिशांनी ही खुर्ची चोरून नेली असावी असे उपरोधिकपणाने म्हटले. तर, काहींनी ब्रिटिशांनी खुर्चीसुद्धा सोडली नाही, असेही एका युजरने म्हटले. तर काही ट्विटर युजर्सने ही बाब आश्चर्यजनक असल्याचे म्हटले.

ट्विटर युजर्स ओमकार माळी यांच्या ट्विटला उत्तर देताना एका युजरने म्हटले की, स्क्रॅपमधून सस्टनेबल डिझाईन करणारे आर्किटेक्टने ही खुर्ची घेतली असावी असे म्हटले. अरेबिक आणि देवनागरी लिपीचे आकर्षण वाढत असल्याचे त्यांनी म्हटले.


आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here