आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या महिलेने बिहारच्या ‘महादलित’ लोकांना घाणीच्या साम्राज्यातून बाहेर काढत चांगल आयुष्य दिलंय…


 

राहण्यासाठी मातीचे बनलेले एक छोटे घर. खाण्यासाठी नाल्यांमध्ये फिरणारे उंदीर. शरीर झाकण्यासाठी कापडाचे फाटलेले तुकडे. ही कोणत्याही दुःखद चित्रपटाची कथा नसून आधुनिक भारतातील एका गावाची खरी कहाणी आहे. या गावातील लोकांचे जीवन इतके वाईट होते की त्याचे शब्दात वर्णन करणे खूप कठीण होते. पिढ्यानपिढ्या या जातीच्या लोकांना अंधारी जीवन जगण्यास भाग पाडले गेले.

महादलित म्हणवल्या जाणाऱ्या या लोकांनी सर्व आशा सोडल्या होत्या की तेव्हाच सुधा वर्गीस त्यांच्या आयुष्यात आल्या.  आज त्यांच्यामुळेच हा मागासलेला समाज चांगल्या उद्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

new google

एम्बुलेंस के लिए तडपती रह जाती हैं महादलित महिलाएं | फॉरवर्ड प्रेस

MG Motor India आणि The Better India, UN Women च्या सहयोगाने त्यांच्या Changemaker मोहिमेत, जगाला अशा ‘विशेष महिला’ ची ओळख करूनदिली जात आहे ज्यांनी सर्व अडचणींवर मात करत जगाला विशेष असा संदेश दिला आहे.

चला तर मग जाणून घेऊया सुधा वर्गीस यांनी मुसाहार जातींच्या लोकांमध्ये कश्या पद्धतीने सुधारणा घडवून आणली.

केरळच्या एका चांगल्या आणि पूर्ण कुटुंबात जन्मलेल्या सुधा वर्गीस त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच लोकांना मदत करण्यात गुंतल्या होत्या. त्या द सिस्टर्स ऑफ नोट्रे डेम संस्थेत काम करायच्या. या संस्थेने 1965 मध्ये त्यांना बिहारमधील एका कॉन्व्हेंट शाळेत पाठवले. या अगोदर त्या ना बिहारला गेल्या होत्या आणि ना त्यांनी कधी गरीबी आणि भेदभाव पाहिला होता.

ज्या ठिकाणी त्यांची शाळा होती त्या ठिकाणी खूप गरीब लोक राहत होते. सुधा आणि त्यांच्यासारख्या इतर कॅथलिक नन्स त्या गरीबांना मदत करायच्या. याच काळादरम्यान सुधाला ‘मुसहर जाती’ बद्दल माहिती मिळाली, ज्यांना बिहारमध्ये “महादलित” म्हणूनही ओळखले जाते. तिला कळले की मुसाहर लोक सामान्य गरीबांपेक्षाही अत्यंत गरीब आहेत आणि  हालाखीचे जीवन जगत आहेत.!

त्यांची एकूण अवस्था पाहिल्यानंतर सुधा यांनी त्यांची परिस्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला.

तिला समजले की जर गरीबांना योग्य प्रकारे मदत करायची असेल तर प्रथम त्यांना त्यांच्यासोबत राहावे लागेल आणि त्यांच्या समस्या समजून घ्याव्या लागतील. हाच हेतू मनात धरून त्यांनी आपले सामान बांधले आणि “जामसौत” गाव पाटणा येथे रवाना झाल्या. या गावात जवळपास पूर्णच लोक मुसहर जातीचे आहेत..

मुसहर जातीच्या गावात जीवन जगणे म्हणजे युद्ध लढण्यासारखे होते! वीज आणि पाणी तर दूरच अगदी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था नव्हती. जेव्हा सुधा तेथे पोहचल्या तेव्हा त्यांना तिथे राहण्यासाठी सुद्धा जागा मिळत नव्हती. बऱ्याच प्रयत्नांनी दुसऱ्या दिवशी त्यांना एके ठिकाणी राहण्यास जागा मिळाली.


हेही वाचा…

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक

रागाच्या भरात खेळाडूच्या कानाखाली मारल्यामुळे मांजरेकरांना आपली नोकरी गमवावी लागली होती.


ज्या जागेत सुधा राहत होती ती जागाही त्यांच्याच गावातील इतर जागांसारखी घाणीच्या साम्राज्याने घेरलेली होती.गावातील महिलांसोबत शौचालयात जाण्यासाठी त्यांना दररोज पहाटे 4 वाजता उठायचे होते. त्या गावात ना स्वच्छ पाणी होते ना चांगले अन्न.

समाजातील एक वर्ग अशा वाईट परिस्थितीत का जगत आहे हे सुधाला सुरवातीला कळाले नाही. पण मुसहर जातीचे ‘महादलित’ असणे ही त्यांची खरी समस्या होती हे मात्र  त्यांना गावात आल्यावरच कळाले होते.त्यांना त्यांचे हक्क मिळत नाहीत किंवा त्यांना त्यांचे अधिकार माहीत नव्हते. मुसहर जातीची मुले शाळेत गेली नाहीत,कारण तिथे त्यांना अस्पृश्य म्हणवून वर्गापासून दूर ठेवले गेले. बऱ्याच मुलांना बेंचवर बसण्याचीही परवानगी नव्हती.

दुसरीकडे वडिलांना मजुरीशिवाय दुसरा कोणताही व्यवसाय नव्हता. येथेही त्यांच्याशी भेदभाव केला जात असे आणि त्यांना इतरांपेक्षा कमी मोबदला देण्यात येत असे. या भेदभावाच्या विरोधात मुसहर लोक काहीच बोलू शकत नाहीत.

हे सर्व जाणून घेतल्यानंतर सुधाला वाटले की ती या लोकांना मदत करायला हवी आणि त्यातूनच त्यांच्या नवीन प्रवास सुरू झाला.

मुसहर लोकांचे जीवन सुधारण्यासाठी सुधा यांनी मुलींच्या शिक्षणापासून सुरुवात केली. सुरुवातीला सुधा घरोघरी जाऊन मुलीशी बोलली आणि त्यांचे मन वळवले जेणेकरून ते तिला अभ्यासासाठी पाठवू शकतील. सुधा गावातील मुलींना तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आवश्यक शिक्षण देत असतं.

त्यांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले कायदे आणि त्यांचा अभ्यास स्वतः सुधाने रात्रभर जागून केला जेणेकरून काही कायदेशीर अडचण आल्यास त्या गावातील लोकांना वाचवू शकतील.

1987 मध्ये सुधा यांनी एक एनजीओ देखील सुरू केली,ज्याचे नाव ‘नारी गुंजन’ होते. म्हणजे ‘महिलांचा आवाज’. याद्वारे त्यांना महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांविषयी सांगून महिलांना पुढे घेऊन जायचे होते. याद्वारे आज अनेक स्त्रिया घर चालवण्यासाठी काही पैसे कमवू शकतात. सुधाने आज सुमारे 750 महिलांना ‘किचन गार्डनिंग’शी जोडले आहे.

महादलित

एवढेच नाही तर आज मुसहर महिलांचा स्वतःचा ‘महिला बँड’ देखील आहे.

लोकांनी तिच्या सायकलवर फिरणाऱ्या सुधा वर्गीसला ‘सायकल दीदी’ नावाने हाक मारायला सुरुवात केली. त्यांनी गावकऱ्यांना त्यांचे हक्क,स्वच्छता आणि चांगले जीवन याबद्दल सांगितले. यासोबतच अनेक शासकीय योजनांमध्ये गावकरीही जोडले गेले.

त्यांच्या आगमनानंतर गावातील परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. त्यांना जो बदल आणायचा होता तो दिसत होता.
गावासाठी शाळा बांधून बदलाची सुरुवात झाली. अल्पावधीत सुधाच्या स्वयंसेवी संस्थेमध्ये सुमारे 850 बचत गट जोडले गेले. यानंतरच त्यांची स्वयंसेवी संस्था बिहारच्या पाच जिल्ह्यांमध्ये पोहोचू शकली.

सुधाला मुलींना अभ्यासापासून वेगळ्या गोष्टी शिकवायच्या होत्या. घरोघरी जाऊन हे काम करणे थोडे कठीण होते म्हणून त्यांनी शाळा उघडण्याचा विचार केला. यानंतर 2005 मध्ये त्यांनी पहिली शाळा ‘प्रेरणा’ सुरू केली. या शाळेत मुलींना खेळ, अभ्यास, हस्तकला आणि कराटे यासारख्या गोष्टी शिकवल्या जात.

यातील बहुतांश मुली अशा होत्या ज्यांच्या कुटुंबातील कोणीही शाळेत गेले नव्हते.

शाळेत जाताना गावातील मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. एवढेच नव्हे तर पुढे जाण्याचा आग्रहही त्यांच्यामध्ये दिसून आला. 2011 मध्ये झालेल्या गुजरात स्कूल गेम्समध्ये प्रेरणा शाळेच्या मुलींनीही भाग घेतला. तिने कराटेची अशी कामगिरी दाखवली की त्या मुलींनी 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 14 कांस्य जिंकले.

सुधा यांच्या प्रयत्नाने कधी घाणीच्या साम्राज्यात राहणारे लोक आज ताठ मानेने जगत आहेत.


आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here