आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..


बॉलीवूड आणि ड्रग्सचे कनेक्शन अगोदरपासूनच लोकांना माहिती आहे. अनेक बॉलीवूड सेलेब्स या प्रकरणामध्ये अटक सुद्धा झाले होते. काही महिन्यापूर्वीच अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह, दीपिका पादुकोण, रकुलप्रीत सिंह यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींनाही एनसीबीच्या चौकशीला सामोरी जावे लागले होते.

आता अश्याच ड्रग्स प्रकरणात बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा अडकला आहे..

एनसीबीने शनिवारी रात्री मोठी कारवाई करत क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये बॉलिवूडच्या मोठ्या स्टारचा मुलगासुद्धा असल्याचं समोर येतं. अद्याप याबाबत एनसीबीने अधिकृत माहिती दिलेली नाही.

new google

 शाहरुख खान

मात्र इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या मुलाची चौकशी सुरु असल्याचं म्हटलं पण त्याच्यावर गुन्हा दाखल नसल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर एनसीबीच्या कारवाईवेळचा व्हिडिओ आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा त्याच कपड्यांमध्ये असलेला फोटो शेअर करून त्यालाच अटक करण्यात आलाच्या दावा नेटकऱ्यांकडून करण्यात येतोय.


हेही वाचा…

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक

रागाच्या भरात खेळाडूच्या कानाखाली मारल्यामुळे मांजरेकरांना आपली नोकरी गमवावी लागली होती.


आता एनसीबीची ड्रग्ज प्रकरणी कारवाई आणि शाहरुख खानच्या मुलाच्या नावाची चर्चा सुरु असताना याआधी किंग खानने केलेल्या एका वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. मुलगा आर्यन खानबद्दल एक चकित करणारं वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की माझ्या मुलाने सेक्स करावं आणि ड्रग्स घ्यावीत.शाहरूख खान एका मुलाखतीत मुलगा आर्यन बद्दल असा बोलला होता त्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले होते. मी माझ्या जवानीत जे काम करू शकलो नाही ते माझ्या मुलाने करावे असं तो म्हणाला होता.

शाहरूख खान १९९७ मध्ये आपल्या पत्नीसोबत सिमी ग्रेवाल च्या टॉक शो ला गेला होता. तेव्हा नुकताच त्याच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला होता. त्यावेळी त्यांच्या मुलाबाबत विचारणा केली होती. सिमीने शाहरूखला त्याच्या त्याच्या मुलाच्या भविष्याबाबत विचारल्यानंतर त्याने माझ्या मुलाने मला माझ्या जवानीत परिस्थितीमुळे आणि सुविधा नसल्याने जे करता आले नाही ते ते करावे,असे तो म्हणाला होता.

शाहरुख खान

शाहरुख सिमी ग्रेवाल ला म्हणाला होता की ”माझा मुलगा जेव्हा ३-४ वर्षाचा होईल तेव्हा मी त्याला सांगेन की तो बिनधास्त मुलींमागे जाऊ शकतो, ड्रग्स घेऊ शकतो, सेक्स करू शकतो. त्याने हे कमी वयातच सुरू करायला पाहिजे. मला वाटतं की आर्यन बाहेर गेल्यावर मुलींनी त्याची तक्रार माझ्याकडे केली पाहिजे.” असं शाहरूख खान म्हणाला होता. सध्या आर्यन चे फोटोला सोशल मिडियावर खूप पसंती मिळत आहे. त्याची पदवी पूर्ण झाली असून लोकं त्याच्या बॉलिवुड मधील पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here