आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मुलाला बाहेर काढण्यासाठी शाहरुख खानने लालवा सर्वांत महागडा वकील, एका वेळेस घेतो एवढी फीस..


बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आणखी काही जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. सुरवातीला फक्त चौकशी सुरु आहे असं सांगणाऱ्या त्यांच्या वडिलांना धक्का तेव्हा बसला जेव्हा एनसीबीने शाहरुखच्या मुलासह अन्य मोठ्या उद्योगपतींच्या मुलांना कायदेशीर अटक करून कोर्टात हजर करण्याची तयारी सुरु केली.

शाहरुखने आपल्या मुलाला जामीन मिळावा यासाठी  सर्वांत महागडा वकील लावलाय. सध्या न्यायालयात हा वकील न्यायधीशांसमोर आर्यनची बाजू मांडतोय.

हा वकील दुसरा तिसरा कोणी नसून देशातील सर्वांत महागडा वकील सतीश मानेशिंदे आहे. ज्यांनी आजपर्यत अनेक मोठ्या केसेस लढवून जिंकल्या सुद्धा आहेत. रिया चक्रवर्ती, संजय दत्त अश्या अनेक बॉलीवूड स्टार्सना त्यांनी वेळोवेळी बाहेर काढलंय…

new google

हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक

रागाच्या भरात खेळाडूच्या कानाखाली मारल्यामुळे मांजरेकरांना आपली नोकरी गमवावी लागली होती


कोण आहेत सतीश मानेशिंदे?

कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय परिवारात जन्मलेले सतीश मानेशिंदे हे आज भारतातील एक ‘हाय प्रोफाईल क्रिमिनल लॉयर’ म्हणून ओळखल्या जातात. सतीश मानेशिंदे यांनी अनेक राजनेता, चित्रपट कलाकार आणि काही प्रसिध्द व्यक्तींसाठी खटले लढले आहेत. सतीश मानेशिंदे यांनी अनेक बहुचर्चित आणि वादग्रस्त प्रकरणांमध्ये वकिली केली आहे. यामुळे लोकं त्या वादग्रस्त प्रकरणाबद्दल आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळे विचार मांडत असले तरीही सतीश मानेशिंदे हे आज एक सर्वात महागडे ‘सेलिब्रेटी लॉयर’ बनले आहेत.

सतीश मानेशिंदे यांनी त्यांची एलएलबीची पदवी हि ‘कर्नाटका युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’ येथून मिळवली होती. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर ते वकिलीमध्ये करिअर बनवण्यासाठी १९८३ मध्ये मुंबईला आले. येथूनच त्यांचा सर्वात महागडे वकील बनण्याचा प्रवास सुरु झाला होता. त्यांनी प्रसिध्द वकील रामजेठ मलानी यांच्या सोबत जुनिअर लॉयर म्हणून तब्बल दहा वर्षांपर्यंत इंटर्नशिप केली होती.

रामजेठ मलानी हे त्याकाळी भारतातील सर्वात महागडे वकील होते त्यांची फीस २५ लाख पर अपिरेंस एव्हढी होती. रामजेठ मलानी यांनी देशातील मोठ मोठ्या नेत्यांचे प्रकरने न्यायालयात निकाली लावले होते. मलानी यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे हत्या प्रकरण, लालूप्रसाद यादव, बीएस येदयुराप्पा, जयललीथा, हर्षद मेहता स्टोक मार्केट घोटाळा, लालकृष्ण अडवाणी, आसाराम बापू यांसारखे अनेक बहुचर्चित प्रकरने हाताळली होती.

रामजेठ मलानी यांच्या सोबत काम करत राहिल्यामुळेच सतीश मानेशिंदे हे त्यांच्या कामामध्ये अधिकच एक्स्पर्ट झाले होते. यामुळे आता त्यांच्या ओळखी मोठमोठे नेते आणि व्यावासाहिक यांच्यासोबत होत होत्या. नंतर सतीश मानशिंदे यांनी मलानी यांना सोडून आपल्या स्वतंत्र केसेस हाताळन्यास सुरुवात केली होती.

शाहरुख खान

सतीश मानेशिंदे यांच्या जीवनात सर्वात मोठा बदल झाला तो बॉलीवूड मधील प्रसिध्द अभिनेता संजय दत्त याची १९९३ मधील बॉम्बस्फोट केस त्यांना मिळाल्या नंतर. हे प्रकरण हाताळल्यामुळे त्यांचे करिअर हे यशाच्या शिखरावर पोहचले होते आणि ते सर्वत्र चर्चेचा विषय बनले होते. सर्वांनाच माहित आहे या प्रकरणामध्ये संजय दत्तला शिक्षा पण झाली होती. या केसनंतर सतीश मानेशिंदे यांना मोठमोठ्या सेलिब्रिटी कडून अटेंशन मिळू लागले. यानंतर त्यांनी अभिनेता सलमान खान याचीही केस हाताळली होती.

यासोबतच सतीश मानेशिंदे यांनी मोठमोठ्या राजानेत्यांची मोठमोठी प्रकरने हाताळली आहेत जशे कि, मुंबई पोलीस इन्स्पेक्टर दया नायक यांची केस, शोबन मेहता मॅच फिक्सिंग केस, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची पत्नी सुजाता निकलजे हिची केस, बिंदू दारा सिंग याची बेटिंग केस, एव्हढेच नाही तर त्यांनी राखी सावंतची सुसाईड अबेटमेंटची केस सुद्धा हाताळली होती.

सतीश मानशिंदे यांच्याबद्दल असेही म्हटले जाते कि त्यांची बोलण्याची शैली हि सर्वांपेक्षा वेगळी आहे त्यासोबतच ते ज्याप्रमाणे साक्ष आणि पुरावे न्यायाधीशासमोर मांडतात हे त्यांच्या सफलतेचे सर्वात मोठे कारण आहे. कोर्टात त्यांचा बोलण्याचा अॅटीट्युड हा त्यांना सर्वात युनिक बनवतो.

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात सुद्धा यांनीच रियाला बाहेर काढले होते.

सुशांत सिंग प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीने सुद्धा त्यांना आपला वकील म्हणून नेमले आहे. सतीश मानशिंदे हे सामान्यतः हाय प्रोफाईल केसच घेतात हे त्यांच्या आजपर्यंतच्या केसेस बघितल्यावर कळते आणि यामुळेच ते भारतातील सर्वात महागडे सेलिब्रेटी वकील आहेत.

दहा वर्ष पहिले मानेशिंदे हे १० लाख रुपये फीस पर हेअरिंग साठी घेत होते. आजच्या वेळी त्यांची फीस किती आहे हे कोणालाही माहित नाही परंतु काही लोकांच्या मते त्यांची आजची फीस हे २० ते २५ लाख पर हेअरिंग एव्हढी असू शकते. त्यांची आजची संपती हि ६०० ते ७०० कोटी रुपये एव्हढी आहे असेही म्हटले जाते.

लोकांच्या मनात सतीश मानशिंदे यांच्याबद्दल अलग अलग विचार आहेत, काही लोकांच्या मते त्यांनी अनेक चुकीच्या केसेस आणि चुकीच्या माणसांसाठी काम केले आहे यामुळेच आज ते प्रसिध्द आहेत, तर काहींच्या मते हि त्यांच्या व्यवसाह्याशी निगडीत गोष्ठ आहे आणि प्रत्येक वकिलाला प्रत्येक प्रकारचे केस हाताळावे लागतात.

शाहरुखचा मुलगा आर्यन जरी आज तुरुंगाच्या बाहेर येणार असला तरीही त्याला बाहेर काढण्यासाठी शाहरुख खानने फार मोठी किंमत मोजली आहे. एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार जवळपास ७ ते १० कोटी रुपये शाहरुखने खर्च केल्याचा अंदाज लावण्यात येतोत..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here