आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आरएसएसची तुलना तालिबानशी केल्यामुळे गीतकार जावेद अख्तर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय…!


गीतकार जावेद अख्तर हे सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनलेत.ते प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करायला लाजत नाही, ज्यामुळे त्यांना काही वेळा अडचणींना सामोरे जावे लागते. आरएसएसची तालिबानसोबत तुलना केल्यामुळे गीतकार जावेद अख्तर पुन्हा एकदा ते अडचणीत सापडले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात टिप्पणी करतांना जावेद अख्तर यांनी मर्यादा ओलांडली असा आरोप आरएसएसने मागेच केला होता. परंतु आता हे वक्तव्य गुन्हा दाखल होण्याजोगे आहे असा निष्कर्ष निघून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलंय..

 जावेद अख्तर

new google

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. जावेद अख्तर यांच्याविरोधात मुलंद पोलीस ठाण्यात वकील संतोष दुबे यांनी एफआयआर दाखल केला आहे. हा एफआयआर आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.


हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक

रागाच्या भरात खेळाडूच्या कानाखाली मारल्यामुळे मांजरेकरांना आपली नोकरी गमवावी लागली होती


वकील संतोष दुबे यांनी पीटीआयला दिलेल्या संभाषणात म्हटले आहे की, मी यापूर्वी जावेद अख्तर यांना कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगितले होते पण त्यांनी काहीही केले नाही. आता माझ्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

100 कोटींचे नुकसान भरपाईची दावा.

अधिवक्ता संतोष दुबे यांनी यापूर्वी म्हटले होते की, जर जावेद अख्तर यांनी बिनशर्त लेखी माफी आणि नोटीसला सात दिवसांच्या आत प्रतिसाद दिला नाही तर ते नुकसानभरपाई म्हणून 100 कोटी रुपये मागून त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करतील. ते म्हणाले होते की जावेद अख्तर यांनी केलेले वक्तृत्व आयपीसीच्या कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत गुन्हा आहे.

जावेद अख्तर

काय म्हणाले होते जावेद अख्तर?

जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की आरएसएसचे समर्थन करणाऱ्या लोकांची मानसिकता तालिबानसारखीच आहे. या संघाचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. आरएसएसला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये आणि तालिबानींमध्ये काय फरक आहे? जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतरच अनेकांनी त्यांना लक्ष्य केले. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले.

आता कायदेशीर गुन्हा दाखल झाल्यामुळे जावेद अख्तर यांना हे प्रकरण चांगलच महाग पडणार असल्याचं बोललं जातंय..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here