अचानक सर्व्हर बंद पडल्यामुळे फेसबुकला तब्बल इतक्या कोटींचा फटका बसलाय…


ऑनलाईन युगात सध्या तरुण पिढीचा सर्वांत जास्त वेळ हा सोशल मिडीयावर जातोय. यात फेसबुक,ट्वीटर, इंस्टाग्राम प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या सोशल साईटपैकी एक आहेत. ह्याच साईटच सर्वर अचानक डाऊन झाल्यामुळे लोकांमध्ये चांगलीच धावपळ उडाली होती.

4 ऑक्टोबर रोजी दुपारी अचानक जगभरातील फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम ठप्प झालं होतं. सर्वत्र युझर्सचा गोंधळ सुरु होता. अशातच आता यामागील कारण समोर आलं आहे. व्हाॅट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर देखील फेसबुकचं स्वामित्व आहे. धक्कादायक बाब म्हणजे जगप्रसिद्ध फेसबुकचे सर्व्हर एक, दोन नव्हे तर तब्बल सात तास डाऊन झाले होते.

 फेसबुक

फेसबुकचे DNS अर्थात डोमेन नेम सिस्टीम फेल झाल्याने व्हाॅट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झालं होतं. DNS कोणत्याही वेबसाईटला आयपी अॅड्रेसमध्ये ट्रान्सलेट करतो. यामुळे युझरला त्याला हव्या त्या पेजला पोहचण्यास मदत होते. हे DNS फेल होण्यामागचं कारण फेसबुकचे BGP म्हणजेच बाॅर्डर गेटवे प्रोटोकाॅल आहे. डीएनएस, बीजीपी रुटच्या मदतीने आपलं काम करतो. मात्र बीजीपी फेल होण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


हेही वाचा…

new google

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक

रागाच्या भरात खेळाडूच्या कानाखाली मारल्यामुळे मांजरेकरांना आपली नोकरी गमवावी लागली होती


सर्व्हर फेल झाल्यामुळे जगभरातील नागरिकांनाच नव्हे तर फेसबुक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देखील मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. सर्व्हर डाऊन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे अॅक्सेस कार्ड देखील काम करणं बंद झालं होतं. सर्व्हर डाऊन झाल्याने तसेच कर्मचाऱ्यांचे देखील अॅक्सेस कार्ड काम करणं बंद झाल्याने फेसबुकने त्यांच्या कॅलिफोर्नियाच्या सँटा क्लारा डेटा सेंटरवर एक टीम पाठवली.

बंद पडलेलं सर्व्हर मॅन्युअली रिसेट करण्यासाठी हे प्रयत्न सुरु होते. तिथंसुद्धा अॅक्सेस कार्ड काम करत नसल्याने कर्मचाऱ्यांना रुमचे लाॅक तोडून रुममध्ये जावं लागलं. यामुळे फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी माईक स्करोपफेरनं ट्विट करत सर्वांची माफी मागितली.

फेसबुक

दरम्यान, अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर फेसबुक सेवा पुन्हा सुरळीत सुरु झाली. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 3 वाजून 24 मिनिटांनी फेसबुक सुरु झाले. तर मध्यरात्री 4 वाजता व्हाॅट्सअॅपच्या सेवा सुरु झाल्या. या समस्येमुळे एकूण 596 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तसेच इंटरनेटवरील ग्लोबल ऑब्झर्व्हरी ‘नेटब्लाॅक्स’च्या अंदाजानुसार जगाच्या अर्थव्यवस्थेला या समस्येमुळे तब्बल 1192.9 कोटींपेक्षा अधिक नुकसान झालं आहे.

फेसबुकच्या मालकीच्या असणाऱ्या इतर साईटही यामुळे बंद पडल्या होत्या तब्बल सात तासानंतर ह्या साईट सुरु करण्यामध्ये त्यांना यश आलं पण तोपर्यंत फेसबुक कंपनीचे करोडोंचे नुकसान झाले होते.

वापरकेर्तेही झाले परेशान..

अचानक फेसबुक, इंस्टाग्राम काम करत नसल्यामुळे सुरवातीला काही लोकांनी आपला मोबाईल बंद करून चालू करणे, सीम बदलून  पाहणे यांसारखे उद्योग केले .हे करूनही फेसबुक चालत नसल्याचं कळाल्यावर तेही थोड्या वेळासाठी परेशान झाले होते. नंतर फेसबुककडून ऑफिशियल रित्या सर्वर डाऊन असल्याचं जाहीर झाल्यावर वापरकर्त्याना नक्की काय झालं होत हे कळाले..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here