आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पक्षासाठी महत्वाच्या असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाच स्थान देण्यात आलेलं नाहीये..


कोणत्याही पक्षासाठी राजकीय दृष्ट्या सर्वांत  महत्वाची असते ती म्हणजे पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी. राष्ट्रीय कार्यकारणीत अनेक राज्यातील महत्वाच्या नेत्यांना स्थान देण्यात येते. आज भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा जे पी जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. ज्यात प्रामुख्याने केलेले बदल विचार करण्यास भाग पाडणारे आहेत..

जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात प्रथमच मोठ्या प्रमाणात फेररचना करण्यात आलीय.  भाजपचीतब्बल 80 जणांची जम्बो कार्यकारिणी आज जाहीर झाली. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत कुणाची नव्यानं एन्ट्री, तर कुणाला डच्चू? हीच चर्चा सुरु झाली आहे.


हेही वाचा…

new google

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


राष्ट्रीय पातळीवर कार्यकारिणीतून वगळलं गेलेलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे वरुण गांधी आणि मेनका गांधी. वरुण गांधी हे लखीमपूर घटनेवर सातत्यानं जाहीरपणे आवाज उठवत होते आणि नेमकं त्याचवेळी त्यांचं नाव राष्ट्रीय कार्यकारिणीतून गायब झालेलं आहे. तर महाराष्ट्रातून सरप्राईज एन्ट्री आहे चित्रा वाघ यांची. काय आहेत या कार्यकारिणीची वैशिष्ट्ये पाहूयात.

नारायण राणे

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 80 सदस्य आहेत तर 50 विशेष निमंत्रित आणि 179 पदाधिकारी आहेत ज्यात मुख्यमंत्री, प्रभारी आदींचा समावेश आहे.आधीच्या कार्यकारिणीत असलले वरुण गांधी, मेनका गांधी, चौधरी विरेंद्र सिंह यांना नव्या यादीतून वगळले.राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांची थेट राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्ण लागलीय. तर पीयुष गोयल, नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे इतर कॅबिनेट मंत्री कार्यकारिणीत असताना नारायण राणे यांना मात्र कार्यकारिणीत स्थान दिसत नाहीय.

नारायण राणेंना भाजपनं केंद्रात मंत्रिपद दिलं. मात्र, पक्षासाठी महत्वाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना स्थान दिसत नाहीय. महाराष्ट्राचे इतर सर्व कॅबिनेट मंत्री कार्यकारिणीत आहेत, इतकंच काय ज्योतिरादित्य शिंदे, आश्विनी वैष्णव यांच्यासारखे राणेंसोबतच मंत्रिपदाची शपथ घेतलेले आणि बाहेरून पक्षात आलेलेही कार्यकारिणीत आहेत. मात्र, या दोन्ही निकषांतूनही राणेंना स्थान मिळालं नसल्याचं दिसतंय.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र कुठे?

नितीन गडकरी, पीयुष गोयल, प्रकाश जावडकेर, विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत.

विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर हे आधीप्रमाणे याही कार्यकारिणीत राष्ट्रीय मंत्री म्हणून कायम.

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे विधानसभा, विधानपरिषदेचे गटनेतेही कार्यकारिणीवर.

महाराष्ट्रातून आशिष शेलार, सुधीर मुनंगटीवार, लड्डाराम नागवानी हे विशेष आमंत्रित आहेत.

राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून 26 जणांच्या यादीत महाराष्ट्रातल्या हीना गावित एकमेव आहेत.

जे पी नड्डा यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जुन्या कार्यकारिणीत काही बदल झाले होते. पण ते बदल फार मोठे नव्हते. आता नड्डांच्या नेतृत्वातली ही पहिली कार्यकारिणी म्हणता येईल. भाजपच्या या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पहिली बैठक 7 नोव्हेंबरला दिल्लीत होणार आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीआधी होणारी ही बैठक त्या दृष्टीनंही तिचं महत्व अधिक असेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here