क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या व लेख वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका.

====

या भारतीय फलंदाजाची फलंदाजी पाहून भारावला गौतम गंभीर, केली चक्क विराट कोहली,रोहित शर्मासोबत तुलना..!


आयपीएलच्या 53 व्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. मात्र, हा विजय असूनही पंजाबचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर  झाला आहे. या सामन्यात पंजाबसाठी सर्वात आनंददायक गोष्ट म्हणजे त्यांचा कर्णधार केएल राहुलने केलेली स्फोटक फलंदाजी. राहुलच्या त्या खेळीने सर्वच क्रिकेट रासिंकांच मन जिंकलाय.

चेन्नईने दिलेले 135 धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने अवघ्या 13 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. या दरम्यान पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल याने 42 चेंडूत 98 धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये 7 चौकार आणि आठ उंच षटकार होते.


हेही वाचा…

new google

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक


केएल राहुलची ही फलंदाजी पाहून भारताचा माजी सलामीवीर आणि महान फलंदाज गौतम गंभीर देखील स्वत: ला मागे ठेवू शकले नाहीत आणि या फलंदाजासाठी अनेक उत्तम शब्द बोलला. या अतुलनीय खेळीनंतर गंभीरने केएल राहुलची तुलना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माशी केली.

गौतम गंभीर

ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “जर तुम्ही याप्रमाणे फलंदाजी करू शकता, तर तुम्ही अशी फलंदाजी का करत नाही? जर त्याने अशी फलंदाजी आयपीएलच्या सुरवातीपासून केली असती तर त्याला पाहून असे वाटले असते की त्याच्याकडे विराट कोहली आणि रोहित शर्मापेक्षा अधिक क्षमता आहे.मी हे फक्त स्तुती म्हणून म्हणत नाही  कारण मी केएल राहुलला आज हे करताना पाहिले आहे पण तो त्याच्यामध्ये आधीच आहे. त्याच्याकडे इतर कोणत्याही भारतीय फलंदाजांपेक्षा जास्त शॉट्स आहेत आणि त्याने आज पुन्हा तेच केले.

पुढे बोलताना गौतम गंभीर म्हणाला की जर केएल राहुल असेच खेळत राहिला तर लोक ज्या प्रकारे कोहली आणि रोहित शर्माबद्दल बोलतात ते पंजाब किंग्जच्या कर्णधाराबद्दल बोलतील. गंभीर म्हणाला की जर केएल राहुलने सुरुवातीपासून अशीच फलंदाजी केली असती तर पंजाब किंग्स देखील प्लेऑफसाठी पात्र ठरले असते.

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवूनही पंजाब किंग्सला प्लेऑफ मध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. आयपीएल 2021मधून त्यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here